From China With Love: ऑनलाइन घोटाळ्यांपासून सावधान!; सतर्कतेचा इशारा द्यायला येतोय ‘फ्रॉम चायना विथ लव्ह’

From China With Love Marathi Movie: ‘फ्रॉम चायना विथ लव्ह या चित्रपटाचा ट्रेलर लॉच सोहळा पुण्यात अगदी दणक्यात साजरा झाला. ऑनलाईन मनी फ्रॉड या विषयावर हा चित्रपट आधारित आहे.
From China With Love
From China With LoveSaam Tv
Published On

From China With Love: सध्या ऑनलाइन घोटाळ्यांचे प्रमाण लक्षणीयरीत्या वाढले आहे. घोटाळेबाज फसवणुकीसाठी नवनवीन युक्त्या वापरत आहेत. ऑनलाइन खरेदीकडे लोकांचा वाढता कल बघता, घोटाळेबाज ऑनलाइन ग्राहकांची फसवणूक करण्यासाठी नवनवीन युक्त्या शोधत आहेत. या घोटाळ्यांमुळे अनेकांची बँक खातीदेखील रिकामी झाली आहेत. हे सायबर चोरटे लोकांचा पैसा लुटण्यासाठी वेगवेगळी तंत्रे अवलंबताना दिसतात. सायबर चोरट्यांच्या यूपीआय घोटाळ्याने नागरिकांची डोकेदुखी वाढवली आहे. अनेकांची घरं उध्वस्त झाली आहेत.

या सर्व प्रकारात जेव्हा सर्वसामान्य नागरिक अडकतो तेव्हा तो याचा नेमका कसा सामना करतो याचं उत्तम उदाहरण म्हणजे फ्रॉम चायना विथ लव्ह हा चित्रपट होय. नुकताच ‘फ्रॉम चायना विथ लव्ह या चित्रपटाचा ट्रेलर लॉच सोहळा पुण्यात अगदी दणक्यात साजरा झाला. यावेळी चित्रपटाची संपूर्ण टीम उपस्थित होती.

From China With Love
Celebrity MasterChef: सुराल सिमर का फेम दीपिका कक्करने मध्येच सोडला 'सेलिब्रिटी मास्टरशेफ' शो; कारण ऐकून चाहते चिंतेत

ऑनलाईन मनी फ्रॉड सध्याचं एक अदृश्य चक्रव्यूह आहे. ज्यात माणूस खूप सहजतेने अडकतो पण त्यातून बाहेर येण्याचा मार्ग काही त्याला सापडत नाही. एखादी सर्वसामान्य व्यक्ती जेव्हा या सगळ्यात अडकते तेव्हा काय काय घडतं आणि ते तुमच्या सोबत घडू नये असं वाटत असेल तर हा सिनेमा आवर्जून पाहायला हवा.

From China With Love
Chhatrapati Shivaji Maharaj: छत्रपती शिवाजी महाराजांच्या पत्नींची नावं काय?

‘अनिकेत वाघ क्रिएशन’ अंतर्गत बनलेल्या या चित्रपटाचे दिग्दर्शन,अभिनय,लेखन आणि निर्माता अशी चौफेर धुरा अनिकेत वाघ याने उत्तमरित्या सांभाळली आहे. अनिकेत वाघसह चित्रपटात अंकुश मांडेकर,सिद्धेश्वर झाडबुके, गायत्री बनसोडे, सोनाली भांगे, निलेश होले, प्रसाद खेडकर आदी कलाकारांची फौज पाहायला मिळतेय. तर चित्रपटाच्या संगीताची जबाबदारी प्रशांत फासगे यांनी सांभाळली आहे. तसेच चित्रपटाचे शीर्षक गीत कश्मिरा खोत हिने स्वरबद्ध केले आहे. तुम्हाला या ऑनलाइन फ्रॉडमध्ये अडकायचे नसल्यास नेमक काय करावं हे पाहण्यासाठी येत्या २८ फेब्रुवारी २०२५ ला जवळच्या चित्रपटगृहात जाऊन नक्की पाहा "फ्रॉम चायना विथ लव्ह".

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com