Virendra Sehwag On Adipurush: ‘कटप्पानं बाहुबलीला का मारलं?’ आदिपुरुष पाहून सेहवागला उत्तर कळालं

Virendra Sehwag Comment On Adipurush: चित्रपटावर सर्वच स्तरातून टीका होत असताना आता क्रिकेट जगतातूनही चित्रपटावर टीका करण्यात आली आहे.
Virender Sehwag Reaction On Adipurush Movie
Virender Sehwag Reaction On Adipurush MovieSaam Tv
Published On

Virender Sehwag Reaction On Adipurush Movie:ओम राऊत दिग्दर्शित ‘आदिपुरुष’ चित्रपट प्रदर्शित झाल्यापासून बराच चर्चेत आहे. प्रभास, क्रिती सेनॉन, सैफ अली खान, सनी सिंग आणि देवदत्त नागे यांची प्रमुख भूमिका असलेला चित्रपट प्रदर्शित होऊन एक आठवडा झाला आहे. चित्रपटावर सर्वच स्तरातून टीका होत असताना आता क्रिकेट जगतातूनही चित्रपटावर टीका करण्यात आली आहे. भारतीय संघाचा माजी खेळाडू वीरेंद्र सेहवाग याने सोशल मीडियावरून चित्रपटावर टीका केली आहे.

Virender Sehwag Reaction On Adipurush Movie
Adipurush 9th Day Collection: ट्रोल होणारा ‘आदिपुरुष’ लवकरच गाशा गुंडाळणार? नवव्या दिवशी केली केवळ ‘इतकी’च कमाई

भारतीय संघाचा माजी खेळाडू वीरेंद्र सेहवागने ‘आदिपुरुष’ चित्रपट पाहिल्यानंतर सोशल मीडियावर चित्रपटाबद्दल आपली प्रतिक्रिया दिली आहे. या चित्रपटाबाबत सेहवागने त्याच्या खास शैलीत ट्वीट करत चित्रपटाच्या निर्मात्यांचा खरपूस समाचार घेतला. ‘रामायण’ वर आधारित असलेल्या ‘आदिपुरुष’ चित्रपटाला सध्या सर्वच स्तरातून विरोध कायम होत आहे.

वीरेंद्र सेहवागने चित्रपट पाहिल्यानंतर ट्विट केले की, “आदिपुरुष चित्रपट पाहिल्यानंतर कट्टप्पाने बाहुबलीला का मारले, या प्रश्नाचे मला उत्तर कळाले.” सेहवागचे हे ट्विट सोशल मीडियावर सध्या तुफान व्हायरल होत आहे. व्हिएफएक्स, चित्रपटातील पात्र, संवाद आणि अनेक गोष्टींमुळे चित्रपटाविरोधात बरीच टीका केली जात आहे.

Virender Sehwag Reaction On Adipurush Movie
Arshad Warsi On Munna Bhai 3: ‘मुन्नाभाई ३’ बद्दल ‘सर्किट’ने दिली महत्वाची माहिती, ऐकून चाहत्यांची होऊ शकते निराशा

चित्रपटाच्या निर्मितीसाठी जवळपास ६०० कोटींचा खर्च लागला होता. चित्रपटाचे दिग्दर्शन ओम राऊतने केले असून चित्रपटाची निर्मिती ओम राऊत, भूषण कुमार, क्रिशन कुमार, राजेश मोहनन, प्रसाद सुतार यांनी केले आहे. चित्रपटातील सर्वच कलाकारांच्या भूमिकेमुळे प्रेक्षक बरेच नाराज आहेत, त्यामुळे चित्रपटाला बराच ट्रोलिंगचा सामना करावा लागत आहे.

चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर नवव्या दिवशी ५.५ कोटींची कमाई केली होती. तर शुक्रवारी अर्थात आठव्या दिवशी चित्रपटाने ३.४ कोटींचा व्यवसाय केला आहे. आठव्या दिवशी प्रमाणे नवव्या दिवशीचीही परिस्थिती सारखीच आहे. शनिवार- रविवार वीकेंडमुळे प्रेक्षक थोडी गर्दी करतील, अशी अपेक्षा होती, मात्र काही तरी वेगळंच चित्र दिसत आहे.

Virender Sehwag Reaction On Adipurush Movie
Kamal Haasan In Project K : कमल हसनची 'Project K'मध्ये एन्ट्री ; टीजर शेअर करत अमिताभ बच्चनचे हटके वेलकम

नुकतंच ऑल इंडिया सिने वर्कर्स असोसिएशनने केंद्रीय गृहमंत्र्यांना पत्र लिहित चित्रपटाच्या निर्मात्यांवर तक्रार दाखल करण्याची मागणी केलीय. चित्रपट बॉक्स ऑफिसवर प्रदर्शित होताच नकारात्मक रिव्ह्यू आणि वादग्रस्त संवादांमुळे चित्रपट बराच वादाच्या भोवऱ्यात अडकला होता. चित्रपटाने पहिल्या दिवशी १४३ कोटींची जगभरात कमाई केली होती. आता दुसऱ्या आठवड्यातच हा चित्रपट कमाईच्या बाबतीत ३०० कोटींचा आकडाही पार करेल की नाही असा सवाल उपस्थित केला जातोय.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com