Kamal Haasan In Project K : कमल हसनची 'Project K'मध्ये एन्ट्री ; टीजर शेअर करत अमिताभ बच्चनचे हटके वेलकम

Amitabh Bachchan - Kamal Haasan : वैजयंती मूव्हीजने त्यांच्या अधिकृत ट्विटर पेजवर कमल हासनच्या कास्टिंगची घोषणा शेअर केली.
Kamal Haasan Hospitalised
Kamal Haasan HospitalisedSaam Tv
Published On

Amitabh Bachchan Tweeted For Kamal Haasan : ज्येष्ठ अभिनेते कमल हासन नाग अश्विनच्या बहुभाषिक साय-फाय चित्रपट 'प्रोजेक्ट के'चा भाग झाले आहेत. 'प्रोजेक्ट के'च्या निर्मात्यांनी रविवारी हे जाहीर केले आहे. प्रभास आणि दीपिका पदुकोण यांच्या प्रमुख भूमिका असलेल्या या चित्रपटात अमिताभ बच्चन आणि दिशा पटानी देखील मुख्य भूमिकेत दिसणार आहेत. या चित्रपटाचे दिग्दर्शन नाग अश्विन करत आहेत.

या बिग बजेट चित्रपटाची निर्मिती वैजयंती मुव्हीजचे संस्थापक सी आसवानी दत्त यांनी केली आहे. प्रॉडक्शन हाऊस वैजयंती मूव्हीजने त्यांच्या अधिकृत ट्विटर पेजवर कमल हासनच्या कास्टिंगची घोषणा शेअर केली. ट्विटमध्ये लिहिले आहे की, “सर्वश्रेष्ठ अभिनेते कमल हसन यांचे स्वागत. आमचा प्रवास आता युनिव्हर्सल झाला आहे. #ProjectK."

Kamal Haasan Hospitalised
Karishma Kapoor Net Worth : चित्रपटांपासून दूर असलेली करिश्मा आहे गर्भश्रीमंत ; संपत्ती ऐकून शॉक व्हाल!

कलाम हसन यांच्या नावाची घोषणा करताना निर्मात्यांनी त्यांच्या चित्रपटांच्या अनेक क्लिप एकत्र केल्या आहेत आणि चित्रपटामध्ये उलगा नायगन (युनिव्हर्सल हिरो) म्हणून त्याची ओळख करून दिली.

अमिताभ बच्चन यांनी कमल यांचे या टीममध्ये स्वागत केले. रविवारी ट्विट करत अमिताभ यांनी लिहिले आहे, "स्वागत आहे कमल.. तुमच्यासोबत पुन्हा काम करत आहे.. थोडा उशीर झाला!"

कमल हसनला 150 कोटींची ऑफर खर्च मिळाली होती का?

काही आठवड्यांपूर्वी, निर्मात्या अश्विनी दत्तने कमल हसनला प्रोजेक्ट केमध्ये नकारात्मक भूमिकेसाठी 150 कोटींची ऑफर दिल्याच्या बातम्या पसरल्या होत्या. चित्रपटाच्या युनिटमधील एका विश्वसनीय सूत्राने हिंदुस्तान टाईम्सला दिलेल्या माहितीनुसार कमल हासन यांच्याशी संपर्क साधण्यात आला होता. पण त्यांनी 150 कोटी रुपयांच्या ऑफरबद्दलच्या बातम्यांचे खंडन केले. (Latest Entertainment News)

प्रोजेक्ट के

प्रॉडक्शन हाऊसच्या स्थापनेच्या 50 व्या वर्षी सी आसवानी दत्त या प्रकल्पाला सुरुवात केली आहे. हा चित्रपट 12 जानेवारी 2024 रोजी तेलगू, हिंदी, तमिळ, कन्नड आणि मल्याळम भाषेत सिनेमागृहात प्रदर्शित होणार आहे.

प्रोजेक्ट के हा एक सायन्स फिक्शन थ्रिलर स्टोरी आहे. हा चित्रपट बिग बजेटमध्ये बनवला जात आहे. महानती फेम प्रभास आणि नाग अश्विन यांचा हा एकत्र पहिला चित्रपट आहे. दीपिका आणि प्रभासचे सिल्हूट पोस्टर्सने चित्रपटाची उत्सुकता वाढवली आहे.

राणा दग्गुबती 'प्रोजेक्ट के'विषयी काय म्हणाला ?

प्रभासचा बाहुबली चित्रपटातील सहकलाकार राणा दग्गुबती म्हणाला की, तेलगू इंडस्ट्रीला या चित्रपटाकडून खूप अपेक्षा आहेत. इंडिया टुडे कॉन्क्लेव्ह साउथ 2023 मध्ये तो म्हणाला, “आम्ही एकेमकांचे चित्रपट साजरे करतो. प्रोजेक्ट के नावाचा आणखी एक चित्रपट आहे, ज्याचे दिग्दर्शन नाग अश्विन प्रभास, अमिताभ बच्चन आणि दीपिका पदुकोण यांच्यासोबत करत आहेत.

या चित्रपट आम्ही तेलुगुमध्ये प्रदर्शित होण्याची खूप आतुरतेने वाट पाहत आहोत. हा चित्रपट बाहुबली आणि आरआरआर या दोन्ही चित्रपटाचे रेकॉर्ड तोडेल असे मला वाटते. मी खरोखरच त्या चित्रपटाची वाट पाहत आहे आणि तो तेलुगु (सिनेमा) मधील एक जागतिक चित्रपट बनू शकेल."

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com