प्रसिद्ध फॅशन डिझायनरवर दुःखाचा डोंगर कोसळला.
फॅशन डिझायनरच्या आईचे निधन झाले आहे.
वयाच्या 94 व्या वर्षी डिझायनरच्या आईने अखेरचा श्वास घेतला.
मनोरंजन विश्वातून दुःखद बातमी समोर आली आहे. प्रसिद्ध फॅशन डिझायनरच्या आईचे निधन झाले. बॉलिवूडचा प्रसिद्ध फॅशन डिझायनर मनीष मल्होत्राची आई म्हणजे सुदर्शन मल्होत्रा यांनी वयाच्या 94 व्या वर्षी अखेरचा श्वास घेतला आहे. मनीष मल्होत्राच्या आईच्या निधनाची बातमी समजताच अवघे बॉलिवूड मनीष मल्होत्राच्या निवासस्थानी पोहचले.
मनीष मल्होत्रा यांच्या आईचे निधन गुरुवारी संध्याकाळी झाले. सणासुदीलाच मनीष मल्होत्राच्या घरावर दुःखाचा डोंगर कोसळला. मनीष मल्होत्रा यांच्या आईवर आज (शुक्रवारी- 20 मार्च) अंत्यसंस्कार केले जातील. मनीष मल्होत्राचे आपल्या आईसोबत खूप खास नाते होते. तो कायम सोशल मीडियावर आपल्या आईसोबतचे फोटो शेअर करून प्रेम व्यक्त करायचा. आईच्या अशा अचानक जाण्याने मल्होत्रा कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे.
मुंबईत मनीष मल्होत्राच्या घराबाहेर अनेक कलाकार दिसत आहे. त्यांचे व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत. मनीष मल्होत्राच्या दुःखाद सहभागी होण्यासाठी ऐश्वर्या राय, अभिषेक बच्चन, कियारा अडवाणी, सिद्धार्थ मल्होत्रा, वरुण धवन, करिश्मा कपूर, झोया अख्तर, मलायका अरोरा, अर्जुन कपूर, करण जोहर, अनन्या पांडे, सोनाली बेंद्रे, रवीना टंडन, संजय कपूर, महीप कपूर आणि शनाया कपूर असे अनेक कलाकार त्यांच्या घरी पोहचले. कलाकारांनी मनीष यांच्या घरी जाऊन त्यांच्या आईचे अंतिमदर्शन घेतले.
मनीष मल्होत्रा हे भारतातील एक प्रसिद्ध फॅशन डिझायनर आहेत. बॉलिवूडच्या कलाकारांचे कपडे ते कायम डिझाइन करताना दिसतात. बॉलिवूडसोबत त्यांचे घरगुती संबंध आहेत. त्यांनी अनेक हिट चित्रपटांसाठी कपडे डिझायन केले आहे. कलाकार आपल्या महत्त्वाचे समारंभांसाठी मनीष मल्होत्रा यांच्याकडून कपडे डिझाइन करून घेतात. त्यांना अनेक पुरस्कारही मिळाले आहेत.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.