Taarak Mehta Ka Ooltah Chashmah: 'तारक मेहता का उल्टा चष्मा' बंद होणार? मालिकेतील रिटा रिपोर्टनेरने दिली मोठी माहिती

तारक मेहता का उल्टा चष्मा'चे टीआरपी घसरण्याचे कारण त्याची गुणवत्ता नसून प्रेक्षकांचा बदलेल दृष्टिकोनातील आहे.
Taarak Mehta Ka Ooltah Chashmah
Taarak Mehta Ka Ooltah ChashmahSaam Tv
Published On: 

Taarak Mehta Ka Ooltah Chashmah TRP Down: 'तारक मेहता का उल्टा चष्मा' ही टीव्हीवरील एक लोकप्रिय विनोदी मालिका आहे. या मालिकेतील अनेक कलाकार मालिका सोडून जात असल्याने चर्चेत आहे. अलीकडेच या मालिकेचे दिग्दर्शक मालव राजदा यांनी मालिकेला निरोप दिला आहे. दरम्यान मालिकेच्या टीआरपीमध्येही घट झाली आहे.

'तारक मेहता का उल्टा चष्मा' या मालिकेतून अनेक कलाकार बाहेर पडत आहेत. तसेच मालिकेचा टीआरपी देखील घसरला आहे. यामुळे अनेकांना वाटतंय की 'तारक मेहता का उल्टा चष्मा' ही मालिका बंद होईल. पण या मालिकेत रीटा रिपोर्टरची भूमिका साकारणारी अभिनेत्री प्रिया आहुजाचा यावर विश्वास बसत नाही. तिच्या एक जुन्या मुलाखतीचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. ही मुलाखत तिने जवळपास वर्षभरापूर्वी दिली होती.

Taarak Mehta Ka Ooltah Chashmah
Bigg Boss Marathi 4: अवघ्या काही तासातच कळणार महाविजेता, 'या' टॉप ५ स्पर्धकांमध्ये रंगणार चुरस...

प्रियाने या मुलाखतीमध्ये सांगितले होते की, 'तारक मेहता का उल्टा चष्मा'चे टीआरपी घसरण्याचे कारण त्याची गुणवत्ता नसून प्रेक्षकांचा बदलेल दृष्टिकोनातील आहे. ती म्हणाली, "मला टीआरपीचा खेळ कधीच समजला नाही, पण 'तारक मेहता का उल्टा चष्मा' बंद होण्याच्या मार्गावर आहे हे मला मान्य नाही."

प्रिया पुढे म्हणाली, "टीआरपीमध्ये चढ-उतार होत राहतात. कारण आजकाल प्रेक्षक फक्त टीव्ही मालिकांपुरतेच मर्यादित राहिलेले नाहीत, तर ते इतरही अनेक गोष्टी पाहत आहेत. त्यामुळेच ते मालिका तिच्या रोजच्या वेळेत टीव्ही पाहत नाहीत, जर टीव्हीवरील वेळेत मालिका पाहता अली नाही ते अॅप्सवर जाऊन मालिका पाहतात."

प्रिया यावेळी दया भाभीची भूमिका साकारणारी दिशा वकानी आणि शोमधून बाहेर पडलेल्या इतर कलाकारांबद्दलही बोलले. ती म्हणाली, "होय, प्रेक्षकांचा एक विशिष्ट वर्ग असा असू शकतो जो तुम्ही साकारलेल्या पात्रांशी एकनिष्ठ असतो. मला वाटते की 'तारक मेहता का उल्टा चष्मा' मालिकेवर प्रेक्षकांची निष्ठा खूप जास्त आहे... कारण 90 टक्के प्रेक्षक ही मालिका नियमितपणे पाहतात."

प्रिया आहुजा ही दिग्दर्शक मालव राजदा यांची पत्नी आहे, तिने अलीकडेच 'तारक मेहता का उल्टा चष्मा' सोडला आहे. दोघांनी 2011 मध्ये लग्न केले होते. तिने या मालिकेला अलविदा केला आहे. नुकताच मालव राजदानेही तारक मेहता का उल्टा चष्माला निरोप दिला आहे.

मालव आणि प्रिया यांच्याशिवाय या मालिकेमध्ये दया भाभीची भूमिका साकारणारी दिशा वकानी बऱ्याच दिवसांपासून मालिकेतून गायब आहे. या मालिकेमध्ये तारक मेहताची भूमिका करणाऱ्या शैलेश लोढा यांनी देखील मालिकेला रामराम केला आहे. टप्पूची भूमिका साकारणाऱ्या भव्य गांधी आणि त्याच्या जागी आलेला राज अनादकट यांच्यासह इतर अनेक सेलिब्रिटीही १४ वर्षांपासून सुरू असलेल्या या मालिकेपासून पासून दूर झाले आहेत.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.