Famous Influencer Death: प्रसिद्ध सोशल मीडिया इन्फ्लुएंसरचं ३६ व्या वर्षी निधन; पोटाच्या कॅन्सरशी झुंज ठरली अपयशी

Social media influencer: फिटनेस इन्फ्लुएंसर कार्ली डग्लस हिचं वयाच्या 36 व्या वर्षी स्टेज 4 पोटाच्या कॅन्सरमुळे निधन झालं. तिच्या कुटुंबीयांनी शेअर केलेली भावनिक पोस्ट सोशल मीडियावर व्हायरल होत असून तिच्या संघर्षाची सर्वत्र चर्चा सुरू आहे.
Famous Influencer Death
Famous Influencer Deathsaam tv
Published On

फिटनेस सोशल मीडिया इन्फ्लुएंसर कार्ली डग्लस हिचं वयाच्या अवघ्या 36व्या वर्षी निधन झालंय. तीन मुलांची आई असलेल्या कार्लीने काही महिन्यांपूर्वीच स्वतःला चौथ्या टप्प्यातील पोटाचा कॅन्सर झाल्याची माहिती दिली होती. या धक्कादायक निदानानंतर अवघ्या तीन महिन्यांत तिची कॅन्सरशी झुंज अपयशी ठरली. तिच्या निधनानंतर कुटुंबीयांनी सोशल मीडियावर शेअर केलेली भावनिक पोस्ट सध्या मोठ्या प्रमाणात व्हायरल होतेय.

शेवटच्या क्षणांपर्यंत मुलांसोबत राहिली कार्ली

कार्लीच्या कुटुंबीयांनी शेअर केलेल्या पोस्टमध्ये तिच्या शेवटच्या दिवसांबद्दल आणि कॅन्सरविरुद्ध दिलेल्या संघर्षाबद्दल माहिती दिलीये. स्टेज 4 पोटाच्या कॅन्सरचं निदान झाल्यानंतरही तिने जगण्याची आशा कधीच सोडली नाही. कठीण परिस्थितीतही ती धैर्याने उभी राहिली. तिचा देवावरील विश्वास कायम होता आणि भेटणाऱ्या प्रत्येकाला ती श्रद्धा आणि सकारात्मकतेचा संदेश देत असे.

Famous Influencer Death
Rakhi Sawant: 'काय हा प्रकार...'; राखी सावंतचा नवा रेड ड्रेस लूक पाहून नेटकरी हैरान, VIDEO व्हायरल

कुटुंबीयांच्या म्हणण्यानुसार, 13 जून 2026 रोजी कार्लीने अखेरचा श्वास घेतला. त्या वेळी तिच्या जवळ तिची लाडकी मुलं होती आणि त्यांच्या सहवासातच तिने या जगाचा निरोप घेतला.

आनंदी स्वभावामुळे सर्वांची लाडकी होती

कुटुंबीयांनी पोस्टमध्ये कार्लीच्या स्वभावाबद्दल सांगताना म्हटलंय की, ती जणू आनंदाचे दुसरं नाव होती. तिच्या चेहऱ्यावर कायम हास्य असायचं आणि तिचं हसणं आजूबाजूच्या लोकांनाही आनंद देत असे. जो कोणी तिच्या संपर्कात आला त्याला तिच्याकडून प्रेम आणि आपुलकीच मिळाली.

तिची तीन मुलं रिव्हर, फे, आणि टाउन्स हेच तिच्या आयुष्यातील सर्वात मोठं सुख होतं. मुलांसोबत घालवलेला प्रत्येक क्षण ती मनापासून जगत होती. त्यांच्या हसण्यात, खेळण्यात आणि सहवासात तिचा खरा आनंद होता. आई होणं हेच तिच्यासाठी सर्वात मोठा सन्मान आणि समाधानाचं कारण होतं.

पती डेव्हिडसोबतचं नातं होतं अतूट

कार्लीच्या कुटुंबीयांनी तिच्या पती डेव्हिडबद्दलही भावना व्यक्त केल्या. त्यांच्या मते, डेव्हिड हा केवळ तिचा पती नव्हता, तर तिचा सर्वात जवळचा मित्र होता. रोज संध्याकाळी तो घरी येण्याची ती आतुरतेने वाट पाहायची. दोघांचं नातं खूप घट्ट आणि प्रेमळ होतं. त्यांच्या आयुष्यातील प्रत्येक क्षणात हे प्रेम दिसून येत असे. घरातील वातावरणही या प्रेमामुळे अधिक सुंदर बनलं होतं.

Famous Influencer Death
Prasad Vedpathak: 'हा माझा शेवटचा व्हिडीओ...'; सोशल मीडिया इन्फ्लुएन्सर प्रसाद वेदपाठक ढसाढसा रडला, हात जोडत म्हणाला...

आई-वडिलांवरही होते प्रचंड प्रेम

कार्लीच्या आयुष्यात तिच्या आई-वडिलांचं स्थान खूप महत्त्वाचं होतं. कुटुंबीयांनी सांगितलं की, ती आपल्या पालकांवर मनापासून प्रेम करत होती. विशेषतः तिच्या आईसोबत तिचं अतिशय खास नातं होतं. तिची आई ही फक्त पालक नव्हती, तर तिची सर्वात जवळची मैत्रीण होती. आयुष्यातील प्रत्येक चांगल्या-वाईट प्रसंगी आईने तिला आधार दिला. त्यामुळे तिच्या जाण्याने कुटुंबीयांवर मोठा दुःखाचा डोंगर कोसळला आहे.

पोस्टमध्ये असंही म्हटलंय की, कार्लीच्या जाण्याने निर्माण झालेली पोकळी कधीच भरून निघणार नाही. मात्र तिच्या कुटुंबीयांना विश्वास आहे की, ती आता दुःख आणि वेदनांपासून मुक्त झाली आहे आणि अधिक शांत, आनंदी अवस्थेत आहे.

Famous Influencer Death
Dia Mirza: 'हवामान बदलाला पुरुषच जबाबदार'; दिया मिर्झाच्या विधानावरून वादाची ठिणगी उडाली, स्पष्टीकरण देत म्हणाली...

कॅन्सरच्या लढ्याचे व्हिडीओ करायची शेअर

कार्ली डग्लस सोशल मीडियावर तिच्या कॅन्सरविरुद्धच्या लढ्याबद्दल नियमितपणे माहिती देत होती. उपचारांदरम्यानचे अनुभव, भावनिक क्षण आणि आशावादी संदेश ती तिच्या फॉलोअर्ससोबत शेअर करत असे. तिच्या निधनानंतर अनेकांनी तिच्या आठवणींना उजाळा दिला. एका चाहत्याने लिहिलंय की, कॅन्सरचे निदान झाल्यानंतरही कार्लीने आयुष्याकडे पाहण्याचा दृष्टिकोन बदलला नाही. ती शेवटपर्यंत प्रेम, विश्वास आणि सकारात्मकतेचा संदेश देत राहिली.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com