प्रसिद्ध ट्रॅव्हल इन्फ्लुएन्सरचे निधन झाले आहे.
कुटुंबीयांनी इन्स्टाग्राम पोस्ट करून ही बातमी दिली आहे.
प्रसिद्ध ट्रॅव्हल इन्फ्लुएन्सरने 32 व्या वर्षी अखेरचा श्वास घेतला आहे.
प्रसिद्ध इन्फ्लुएन्सरचे निधन झाल्याची माहिती समोर आली आहे. दुबईस्थित प्रसिद्ध ट्रॅव्हल इन्फ्लुएन्सर अनुनय सूदने वयाच्या 32 व्या वर्षी अखेरचा श्वास घेतला आहे. तो एक उत्तम फोटोग्राफर देखील होता. त्याच्या कुटुंबीयांनी इन्स्टाग्राम पोस्ट करून ही बातमी दिली आहे. अनुनय शेवटचा विन लास वेगास येथे फिरायला गेला होता. त्याच्या शेवटच्या पोस्टमध्ये तेथील फोटो पाहायला मिळत आहे.
जगातील अनेक सुंदर ठिकाणे त्यांनी अनुनय आपल्या कॅमेऱ्यात कैद केली होती. त्यांच्या कुटुंबाने सोशल मीडियावर पोस्ट करून त्याचा चाहत्यांना या कठीण काळात त्यांच्या गोपनीयतेचा आदर करण्याची विनंती केली आहे. तसेच घराजवळ गर्दी न करण्याचे आवाहन केले आहे. त्यांच्या या पोस्टवर कमेंट करून चाहते दुःख व्यक्त करताना दिसत आहेत.
अनुनय सूद हा प्रसिद्ध ट्रॅव्हल इन्फ्लुएन्सर आहे. त्याचे इन्स्टाग्रामवर 1.4 मिलियन फॉलोअर्स आहेत. तर युट्यूबवर लाखांच्या घरात सब्सक्राइबर्स आहेत. अनुनय सूद सोशल मीडियावर खूप सक्रिय असायचा. आपल्या फिरण्याचे फोटो आणि व्हिडीओ तो कायम पोस्ट करायचा. त्याचे फोटो, रील्स आणि व्लॉग्स खूप व्हायरल व्हायचे. त्याला फिरायला नवीन संस्कृती पाहायला खूप आवडायचे.
अनुनय सूदने 2022, 2023 आणि 2024 मध्ये फोर्ब्स इंडियाच्या टॉप 100 डिजिटल स्टार्सच्या यादीत स्थान मिळवले होते. मीडिया रिपोर्टनुसार, अनुनय दुबईत फोटोग्राफर होता. तो एक मार्केटिंग फर्म चालवत होता. ट्रॅव्हलिंगमुळे त्याला खूप प्रसिद्ध मिळाली. अनुनयच्या अचानक जाण्यामुळे त्याच्या कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. तसेच चाहत्यांना देखील मोठा धक्का बसला आहे.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.