Shreya Maskar
बाळाच्या डायपर बॅगमध्ये हँड सॅनिटायझर ठेवा. प्रवासात हात धुवायला मिळाले नाही तर हँड सॅनिटायझरचा वापर करता येतो.
बाळासाठी जास्तीचे एक , दोन कपडे ठेवा. यात मोजे, टोपी आणि हातमोजे यांचा समावेश करा.
सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे बॅगमध्ये जास्तीचे डायपर ठेवा.
डायपर बदलण्यापूर्वी बाळाला पुसण्यासाठी वेट वाइप्स सोबत ठेवा.
दुधाची आणि पाण्याची बॉटल,बेबी फूडसोबत ठेवा.
बाळाचे मनोरंजन होण्यासाठी त्याचे आवडते खेळण कायम सोबत राहू द्या.
बाळाला कुठेही फिरायला घेऊन जात असाल तर औषधे सोबत ठेवा. बाळच्या बॉडी लोशन क्रीम बॅगमध्ये ठेवा.
वरील सर्व गोष्टींची नीट काळजी घेतल्यास तुम्ही बाळासोबत बिनधास्त प्रवास करू शकता.