Shreya Maskar
भात शिजवण्यापूर्वी १० मिनिटे तांदूळ पाण्यात भिजवून ठेवा.
भात करण्यापूर्वी ४ ते ५ वेळा तांदूळ पाण्याने व्यवस्थित धुवून घ्या जेणेकरून स्टार्च निघून जाईल.
स्टार्चमुळे भात अधिक चिकट होतो.
तांदूळापेक्षा चारपट जास्त पाणी घाला.
भात शिजवताना त्यात मीठ, तेल आणि लिंबाची फोड घाला.
भात शिजायला २०-२५ मिनिटे लागतात.
भात चिकट होऊ नये म्हणून तुम्ही त्यात तूप देखील टाकू शकता.
भात खाण्यापूर्वी छान मोकळा करून ताटात ठेवा.