'Bigg Boss 19'च्या घरात प्रणित मोरेचं कमबॅक? मिळाली मोठी हिंट

Bigg Boss 19-Pranit More : 'बिग बॉस 19' मधून मोठी अपडेट समोर आली आहे. घरात प्रणित मोरेची धमाकेदार एन्ट्री होणार असल्याचे बोले जात आहे. सविस्तर माहिती जाणून घ्या.
Bigg Boss 19-Pranit More
Bigg Boss 19SAAM TV
Published On
Summary

अचानक तब्येत बिघडल्यामुळे प्रणित मोरची 'बिग बॉस 19' मधून एक्झिट झाली.

प्रणित मोरच्या शोमधून जाण्यामुळे चाहत्यांना मोठा धक्का बसला आहे.

प्रणित मोर 'बिग बॉस 19'च्या घरात पुन्हा येणार असल्याची माहिती समोर आली आहे.

गेल्या आठवड्यात 'बिग बॉस 19'च्या (Bigg Boss 19) घरातून सर्वांचे लाडका महाराष्ट्रीयन भाऊ प्रणित मोरेची एक्झिट झाली. त्याच्या घराबाहेर जाण्यामुळे प्रेक्षक खूप नाराज झाले आहेत. मात्र तब्येत बिघडल्यामुळे प्रणित मोरेला बिग बॉसचे घर सोडावे लागले आहे. तसेच मीडिया रिपोर्टनुसार, प्रणित मोरेला (Pranit More) डेंग्यू झाला असल्यामुळे त्याची तब्येत बिघडली. मात्र प्रणित मोरेच्या टीमकडून मिळालेल्या माहितीनुसार त्याची प्रकृती ठीक होत आहे.

'वीकेंड का वार' ला मालती , कुनिका , अशनूर आणि अभिषेकने सलमानला विचारले की, "प्रणित मोरे परत येईल का?" त्यावर सलमान खानने नकारार्थी मान डोलावली. आता 'बिग बॉस 19'ची माहिती देणाऱ्या पेज अनुसार 'बिग बॉस 19'च्या घरात प्रणित मोरे पुन्हा येणार आहे. यामुळे चाहत्यांना मोठा आनंद झाला आहे. अहवालांनुसार प्रणित मोरेने बिग बॉसच्या घरात एन्ट्री घेतली आहे. दुसरीकडे अशी देखील चर्चा पाहायला मिळत आहे की, प्रणित मोरेला सिक्रेट रुममध्ये पाठवण्यात आले आहे. मात्र अद्याप कोणतीही अधिकृत माहिती समोर आली नाही. प्रणित मोरेच्या शोमधील एक्झिटमुळे गौरव खन्ना आणि मालती चहर खूप दुःखी झाले आहेत.

या आठवड्यात 'बिग बॉस 19'च्या घरातून बाहेर जाण्यासाठी पाच सदस्य नॉमिनेट झाले आहेत. यात फरहाना भट्ट, गौरव खन्ना, नीलम गिरी, अभिषेक बजाज आणि अशनूर कौर यांचा समावेश आहे. आता बिग बॉसच्या घरातून कोण जाणार हे 'वीकेंड का वार' मध्ये पाहायला मिळेल. तसेच प्रणित मोरेची 'बिग बॉस 19'च्या घरातील रि-एन्ट्रीचेही अपडेट मिळतील. 'वीकेंड का वार'मध्ये सलमान खान कोणाची शाळा घेणार? कोणाचे कौतुक करणार हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.

प्रणित मोरेने बिग बॉसच्या घरात असताना देखील आपल्या कॉमेडीने प्रेक्षकांना खूप हसवले आहेत. नेटकरी सोशल मीडियावर अनेक फोटो, व्हिडीओ पोस्ट करून, आपल्या कमेंट्सच्या माध्यमातून प्रणित मोरे पुन्हा घरात यावा, अशा मागणी करत आहे. प्रेक्षकवर्ग मोठ्या प्रमाणात प्रणित मोरेची आठवण काढताना दिसत आहे.

Bigg Boss 19-Pranit More
Veen Doghatli Hi Tutena : समर-स्वानंदीचं लग्न मोडणार? 'वीण दोघांतली ही तुटेना'मध्ये मोठा ट्विस्ट, पाहा VIDEO

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com