Famous Actress Death : "शिवा मला तुझ्यासोबत घेऊन जा..."; प्रसिद्ध अभिनेत्रीच्या निधनानंतर शेवटची पोस्ट व्हायरल

Actress Divyanka Sirohi Last Post : प्रसिद्ध अभिनेत्रीचे अचानक हृदयविकाराच्या झटक्याने निधन झाले. तिची शेवटची पोस्ट सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे.
Actress Divyanka Sirohi Last Post
Famous Actress DeathSAAM TV
Published On
Summary

प्रसिद्ध अभिनेत्रीचे हार्ट अटॅकने निधन झाले.

अभिनेत्रीची शेवटची पोस्ट व्हायरल होत आहे.

अभिनेत्रीने वयाच्या ३० व्या वर्षी अखेरचा श्वास घेतला.

मनोरंजन विश्वातून धक्कादायक बातमी समोर आली. प्रसिद्ध हरियाणवी अभिनेत्री दिव्यांका सिरोहीने वयाच्या ३० व्या वर्षी अखेरचा श्वास घेतला. अभिनेत्रीचे हृदयविकाराच्या झटक्यामुळे निधन ( २१ एप्रिल २०२६ ) झाले. अभिनेत्रीच्या निधनाने चाहत्यांना मोठा धक्का बसला आहे. अभिनेत्रीचे इन्स्टाग्राम 1.3 मिलियन फॉलोअर्स आहेत.

अभिनेत्रीवर मनोरंजन क्षेत्रातील कलाकार, मित्रमंडळी , चाहत्यांनी श्रद्धांजली वाहिली. अशात अभिनेत्रीची शेवटची पोस्ट तुफान व्हायरल होत आहे. अभिनेत्रीच्या या पोस्टवर चाहते कमेंट्सचा वर्षाव करत आहे. तिच्यासाठीचे प्रेम आणि निधनाचे दुःख व्यक्त करत आहेत.

अभिनेत्री दिव्यांका सिरोहीने इंस्टाग्राम अकाउंटवर एक पोस्ट पिन केली होती, ज्याच्या कॅप्शनची चर्चा सर्वत्र रंगलीआहे. दिव्यांकाची ही पोस्ट जून २०२३ मधील आहे. यामध्ये त्यांनी निळ्या रंगाचे जॅकेट आणि मरून रंगाची पगडी घातली आहे. तिने या पोस्टला "POC: शिवा, मला तुझ्यासोबत घेऊन जा" असे कॅप्शन दिले होते. अभिनेत्रीच्या निधनानंतर ही पोस्ट खूप व्हायरल झाली आहे. या पोस्टवरून असे दिसून येते की त्या भगवान शिवाच्या मोठ्या भक्त होत्या. तसेच हा फोटो केदारनाथ मंदिराजवळील आहे.

मीडिया रिपोर्टनुसार, दिव्यांका सिरोही ही मूळची उत्तर प्रदेशातील बुलंदशहर येथील होती. ती आपल्या कुटुंबासह गाझियाबाद येथे राहायची. अभिनेत्रीने मेरठ येथील चौधरी चरण सिंग विद्यापीठातून BCA चे शिक्षण पूर्ण केले आणि त्यानंतर सिक्कीममधून MBA ची पदवी प्राप्त केली. तिच्या पश्चात तिचा भाऊ हिमांशू आणि बहिणी दिपांशू आणि जसमीत असा परिवार आहे. दिव्यांकाला लहानपणापासूनच अभिनय आणि नृत्याची प्रचंड आवड होती. दिव्यांकाने ५० हून अधिक हरियाणवी गाण्यांमध्ये काम केले आहे.

Actress Divyanka Sirohi Last Post
Famous Actress : ऑडिशनदरम्यान प्रायव्हेट व्हिडीओ बनवला, अडल्ट साइटवर टाकून..., प्रसिद्ध अभिनेत्रीने सांगितला थरारक अनुभव

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com