रितेश देशमुखचा 'बिग बॉस मराठी ६' शो शेवटच्या टप्प्यावर आला आहे.
घरातून बाहेर पडलेल्या एका सदस्याने बिग बॉसवर गंभीर आरोप केले आहे.
बिग बॉसच्या बाहेर येताच अभिनेत्रीची तब्येत बिघडली.
रितेश भाऊ होस्ट करत असलेला 'बिग बॉस मराठी ६' आता शेवटच्या टप्प्यावर आला आहे. येत्या रविवारी (19 एप्रिलला) बिग बॉसचा ग्रँड फिनाले पार पडणार आहे. सर्वत्र 'बिग बॉस मराठी ६'च्या ग्रँड फिनालेची चर्चा सुरू असताना एका प्रसिद्ध अभिनेत्री आणि बिग बॉस स्पर्धक सोनाली राऊतने बिग बॉसवर गंभीर आरोप केले आहेत. तिने सोशल मीडियावर केलेली पोस्ट सध्या चांगलीच चर्चेत आहे.
सोनाली राऊतने 'बिग बॉस मराठी ६'च्या घराबाबत, घरातील अस्वच्छतेबाबत प्रश्न उपस्थित केले आहेत. घरातील अस्वच्छतेमुळे तिला स्केबीज झाल्याचे तिने पोस्टमध्ये शेअर करून सांगितले आहे. सोनालीने एक व्हिडीओ शेअर केला आहे, ज्यात तिच्या अंगावर पुरळ, लाल चट्टे दिसत आहे. व्हिडीओतील फोटोंमध्ये सोनालीच्या पाठीवर आणि पायावर पुरळ आणि लाल चट्टे पाहायला मिळत आहे. तिने या पोस्टला कॅप्शन देऊन अनेक प्रश्न उपस्थित केले आहे.
"रिॲलिटी टीव्ही म्हणजे आपला जीव धोक्यात घालणे नव्हे...मी विश्वासाने बिग बॉस मराठी ६ मध्ये प्रवेश केला, मात्र मला खूप वाईट अनुभव आला. बिग बॉसच्या घरातील अत्यंत अस्वच्छ परिस्थितीमुळे खरुजसारखा स्केबीज (Scabies) संसर्गजन्य त्वचारोग झाला. स्वयंपाकघरात उंदीर आणि झुरळांसोबत राहिले...तो एक भयानक अनुभव होता. आता जबाबदारीची वेळ आली आहे. या ग्लॅमरच्या पलीकडे झोपेची कमतरता आणि शून्य स्वच्छतेचे एक भीषण वास्तव आहे. मला टॉवेल आणि अगदी रेझरसारख्या मूलभूत गरजेच्या वस्तू इतरांसोबत वाटून घेण्यास भाग पाडले गेले, ज्यामुळे त्वचेचा संसर्ग झाला. कोणालाही आपल्या करिअर आणि आरोग्यापैकी एकाची निवड करावी लागू नये..."
सोनाली राऊतने शेअर केलेल्या व्हिडीओवर नेटकरी भरभरून कमेंट्स करत आहेत. तिला काळजी घेण्याचा सल्ला देत आहेत. तर दुसरीकडे लोक तिला ट्रोल देखील करत आहेत. सोनाली राऊत एका महिन्याभराच्या आतच बिग बॉसच्या घरातून बाहेर आली होती. आता 'बिग बॉस मराठी ६' मधील पाच सदस्य शेवटच्या टप्प्यावर आले आहेत. ज्यांची नावे तन्वी कोलते, राकेश बापट, अनुश्री माने, विशाल कोटियन आणि दिपाली सय्यद अशी आहेत.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.