Marathi Suspense Thriller : सतीश राजवाडे पुन्हा एकदा 'इन्स्पेक्टर घारगे'च्या भूमिकेत; 'अ परफेक्ट मर्डर'ची प्रेक्षकांमध्ये प्रचंड उत्सुकता

Satish Rajwade as Inspector Gharge in A Perfect Murder play: मराठी रंगभूमीवर खिळवून ठेवणाऱ्या कथानकाने प्रेक्षकांच्या मनावर राज्य करणारे थ्रिलर नाटक म्हणजेच 'अ परफेक्ट मर्डर'. या नाटकात प्रेक्षकांचे लाडके अभिनेते सतीश राजवाडे पुन्हा एकदा इन्स्पेक्टर घारगे यांच्या दमदार भूमिकेत पाहायला मिळणार आहेत.
Satish Rajwade as Inspector Gharge in A Perfect Murder play
Satish Rajwade as Inspector Gharge in A Perfect Murder playsaam tv
Published On: 

मराठी चित्रपटसृष्टीत आणि नाट्यसृष्टीत आपल्या अष्टपैलू अभिनयाने आणि दिग्दर्शनाने प्रेक्षकांच्या मनावर राज्य करणारे लोकप्रिय अभिनेते व दिग्दर्शक सतीश राजवाडे पुन्हा एकदा एका वेगळ्या आणि रोमांचक भूमिकेतून प्रेक्षकांच्या भेटीस येत आहेत. 'अ परफेक्ट मर्डर' (A Perfect Muder) या आगामी प्रोजेक्टची सध्या सर्वत्र जोरदार चर्चा सुरू असून, यात ते पुन्हा एकदा लोकप्रिय 'इन्स्पेक्टर घारगे' ही आयकॉनिक भूमिका साकारताना दिसणार आहेत. या बातमीमुळे प्रेक्षकांमध्ये आणि विशेषतः थ्रिलर प्रेक्षकांमध्ये कमालीची उत्सुकता निर्माण झाली आहे.

इन्स्पेक्टर घारगेचे पुनरागमन

सुमारे ३५० हून अधिक यशस्वी प्रयोग पूर्ण केले आणि त्यातले सतिश यांनी जवळपास १२० प्रयोगांमध्ये अभिनय केला आहे. या भूमिकेत पुन्हा परतण्याबाबत सतीश राजवाडे सांगतात, ‘अ परफेक्ट मर्डर’ हे असंच एक नाटक आहे, ज्याच्या माध्यमातून मी तब्बल १९ वर्षांनंतर पुन्हा मराठी रंगभूमीवर परतलो होतो. या भूमिकेसाठी मला त्या वर्षी सर्वोत्कृष्ट सहाय्यक अभिनेत्याचे सर्व पुरस्कार मिळाले होते. हा असा एक पात्राचा प्रवास आहे, जो माझ्या मनाशी कायमचा जोडला गेला आहे. पुन्हा त्याच युनिटसोबत आणि त्याच भूमिकेत परतणं हा एक अद्भूत आणि भावनिक अनुभव आहे. या प्रवासात प्रिया आमची अत्यंत जवळची मैत्रीण आणि सहकलाकार होती, जिची उणीव आम्हाला कायम जाणवेल.

Satish Rajwade as Inspector Gharge in A Perfect Murder play
Aadi Anant Movie: आजोबा-नातवाच्या नात्यातील हळवा प्रवास; अशोक सराफ- संकर्षण कराडेचा 'आदि-अनंत' लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला

सस्पेन्स आणि थ्रिलरचा अनुभव

कोणत्याही कलाकारासाठी कमबॅक करणे जितके खास असते, तितकेच ते आव्हानात्मकही असते, ते पुढे म्हणतात, लोकांच्या अपेक्षा वाढलेल्या असतात, पण हेच आव्हान एका अभिनेत्याला अधिक सतर्क ठेवतं. भूमिकेची लांबी किती आहे यापेक्षा ती पडद्यावर किंवा मंचावर किती प्रभाव पाडते, हे महत्त्वाचे असते. इन्स्पेक्टर घारगे ची भूमिका मला तो प्रभाव पाडण्याची उत्तम संधी देते. थिएटर हे प्रेक्षकांच्या थेट प्रतिसादाचे माध्यम असल्यामुळे मिळणारी तात्काळ ऊर्जा हा एक वेगळाच आनंद असतो'अ परफेक्ट मर्डर' हे नावच या प्रोजेक्टमधील गूढ आणि थरारक अनुभवाची साक्ष देतो. यामध्ये एका कट कारस्थानाचे रहस्य उलगडताना प्रेक्षकांना खिळवून ठेवणारी कथा यात पाहायला मिळणार आहे.

प्रेक्षकांमध्ये वाढलेली उत्सुकता

सोशल मीडियावर या घोषणेपासूनच चर्चांना उधाण आले असून, या प्रोजेक्टची कथा, इतर कलाकारांची फौज आणि रिलीज डेट कधी जाहीर होणार, याकडे सर्वांच्या नजरा लागल्या आहेत.

Satish Rajwade as Inspector Gharge in A Perfect Murder play
Famous Actor Death : तेजस्वी तारा हरपला; प्रसिद्ध अभिनेत्याचे वयाच्या ३४व्या वर्षी निधन, मनोरंजन विश्वात हळहळ

सतीश राजवाडे यांचा अभिनय आणि दिग्दर्शन

अभिनयासोबतच दिग्दर्शनातही आपला खास ठसा उमटवणारे सतीश राजवाडे या प्रोजेक्टला एका वेगळ्याच स्थरावर नेतील, अशी खात्री त्यांच्या चाहत्यांनी व्यक्त केली आहे.

मराठी मनोरंजन विश्वात जेव्हा कधी सस्पेन्स आणि थ्रिलरचा विषय निघतो, तेव्हा सतीश राजवाडे यांच्या कामाची प्रकर्षाने आठवण येते. एकंदरीतच, 'अ परफेक्ट मर्डर'च्या निमित्ताने सतीश राजवाडे एक नवा आणि खिळवून ठेवणारा थरार अनुभव देण्यासाठी सज्ज झाले आहेत. आता हा थरार प्रेक्षकांच्या पसंतीस कसा उतरतो आणि कोणता नवा गुंता सोडवण्यात इन्स्पेक्टर घारगे यशस्वी होतात, हे पाहणे कमालीचे ठरणार आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com