Don 3 Movie: रणवीर सिंगच्या 'डॉन 3'मध्ये नव्या अभिनेत्रीची एन्ट्री; आयटम साँगने प्रेक्षकांची झोप उडवणार

Ranveer Singh Don 3 Movie: बॉलिवूडचा बिनधास्त अभिनेता रणवीर सिंगचे दोन जबरदस्त चित्रपट लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहेत. रणवीर सिंगचा सिंघम अगेन २०२४मध्ये प्रदर्शित होण्याची सर्वत्र चर्चा सुरू आहे. तर २०२५ पासून रणवीर 'डॉन ३'च्या शूटिंगला सुरुवात करणार आहे.
Ranveer Singh Don 3 Movie
Don 3 In Ranveer Singhcanva
Published On

बॉलिवूड अभिनेता रणवीर सिंग त्याच्या अभिनयामुळे आणि त्याच्या मस्तीमुळे नेहमी चर्चेत असतो. रणवीर सिंगच्या अभिनयामुळे त्याने अनेक चाहत्यांची मनं जिंकली आहेत. सिंबा, बाजीराव मस्तानी आणि रामलीला सारख्या चित्रपटांमुळे रणवीरने बॉलिवूडमध्ये त्याचं नाव टॉप अभिनेत्यांमध्ये कोरलं आहे. रणवीरच्या तीन आगामी चित्रपटांमुळे सध्या त्याची सोशल मीडियावर प्रचंड चर्चा होताना पाहायला मिळत आहे. डॉन ३, शक्तिमान आणि सिंघम रिटनमध्ये रणवीर मुख्य भूमिका साकारताना दिसणार आहे.

Ranveer Singh Don 3 Movie
Don 3 Movie: 'डॉन 3'मध्ये कियारा आडवाणीची एन्ट्री, रणवीर सिंगसोबत पहिल्यांदाच स्क्रीन करणार शेअर; VIDEO व्हायरल

रणवीरच्या 'रॉकी और रानी की प्रेम कहानी' या चित्रपटाला प्रेक्षकांकडून भरभरुन प्रतिसाद मिळाला होता. काही दिवसांपूर्वी रणवीर दिग्दर्शक प्रशांत वर्माच्या 'हनुमान' या चित्रपटामध्ये मुख्य भमिकेत दिसण्याची चर्चा होती. चित्रपटाचे काम सुरू झाले. 'हनुमान' या चित्रपटाची घोषणा देखील करण्यात आली होती. मात्र काही कारणांमुळे रणवीरने या प्रोजेक्टला करण्यास नकार दिला ज्यामुळे दिग्दर्शकाचं मोठे नुकसान झाले.

रणवीर सिंगच्या सिंघम अगेनची शूटिंग काही दिवसापूर्वीच पुर्ण येथे झाली आहे. रणवीरच्या घरी लवकरच छोट्या पाहुण्याचं आगमन देखील होणार आहे, त्यामुळे परिवारासोबत अनेकदा रणवीर क्वालिटी टाईम घालवताना दिसेल. 'डॉन ३' च्या शूटिंगपूर्वी एक मोठी अपडेट समोर आलीय. माहितीनुसार, डॉन ३ चित्रपटाच्या शुटिगला ऑगस्ट किंवा सप्टेंबरमध्ये सुरुवात होणार आहे. रणवीर २०२५ मध्ये प्रदर्शित होणाऱ्या 'शक्तिमान' या चित्रपटाच्या कामामध्ये देखील व्यस्थ असेल. एका मुलाखाती दरम्यान फरहान अख्तरने डॉन ३ बद्दल मोठा खुलासा केला आहे. फरहान अख्तरने सांगितले की, '' डॉन ३ या चित्रपटाचे काम पुढे ढकलण्यात आले आहे. त्यासोबतच डॉन ३ मध्ये नव्या कलाकाराची एंन्ट्री होणार आहे.''

'डॉन 3'मध्ये कोणाची एन्ट्री?

डॉन ३ मध्ये कियारा अडवाणी रणवीर सिंगसोबत मुख्य भूमिका साकारताना दिसणार आहे. माहितीनुसार, कियारा अडवाणीला डॉन ३ साठी १३ करोड रुपयांचं मानधन मिळणार आहे. आश्चर्याची बाब म्हणजे नुकताच नागा चैतन्यशी साखरपुडा करणारी अभिनेत्री शोभिता धुलिपाला हिचीही डॉन ३ चित्रपटामध्ये एन्ट्री होणार आहे. नागा चैतान्यसोबत साखरपुडा झाल्यानंतर शोभिताचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाले होते. त्यानंतर सोशल मीडियावर शोभिताच्या नावाची चर्चा मोठ्या प्रमाणात झाली होती.

Edited By: Nirmiti Rasal

Ranveer Singh Don 3 Movie
Kiara Advani ने 'Don 3'साठी घेतलं तगडं मानधन, रक्कम ऐकून बसलेल 440 व्होल्टचा झटका

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com