Dilip Kumar Sister Dies: दिलीप कुमार यांच्या बहिणीचं निधन: मेहबूब स्टुडिओशी होतं खास कनेक्शन

Saeeda Khan Death: दिवंगत अभिनेते दिलीप कुमार यांची बहीण 'सईदा' यांचे निधन झाले आहे.
Dilip Kumar And Saeeda Khan
Dilip Kumar And Saeeda Khan

Dilip Kumar Sister Saeeda Khan Passed Away:

दिवंगत अभिनेते दिलीप कुमार यांची बहीण 'सईदा' यांचे निधन झाले आहे. सईदा प्रसिद्ध चित्रपट निर्माते मेहबूब खान यांचा मुलगा इकबाल खान यांच्या पत्नी होत्या. गेल्या अनेक महिन्यापासून सईदा आजारी असल्याचे त्यांच्या जवळच्या नातेवाईकांनी सांगितले.

Dilip Kumar And Saeeda Khan
Captain Miller Released Date Out: धनुषच्या 'कॅप्टन मिलर'ची रिलीज डेट जाहीर: प्रदर्शनापूर्वीच चित्रपटाने कमवले २५ कोटी

सईदा खान यांच्या निधनाने त्यांच्या संपूर्ण कुटुंबावर दुःखाचा कोसळला आहे. दिलीप कुमार यांची पत्नी सायरा बनो यांनी अद्याप सईदा खान यांच्या निधनावर अद्याप कोणतीही प्रतिक्रिया दिलेली नाही.

ईटाइम्सला सईदा यांच्या जवळच्या सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, इकबाल यांच्या निधनानंतर त्यांची मुलगी इल्हाम आणि मुलगा साकिब सईदा यांचा सांभाळ करत होते. इकबाल यांचे २०१८ साली निधन झाले. ते मेहबूब स्टुडिओचे एक ट्रस्टी होते.

मीडिया अहवालानुसार, सईदा भाऊ दिलीप कुमार यांच्या खूप जवळ होत्या. त्या शेवटच्या मेहबूब स्टुडिओमधील एका कार्याक्रमात दिसल्या होत्या. फेडरेशन ऑफ वेस्टर्न इंडिया सिने एम्प्लॉईजला १० लाखांचा चेक देण्यासाठी एक कार्यक्रम आयोजित केला होता. या कार्यक्रमासाठी सईदा तेव्हा उपस्थित होत्या. (Latest Entertainment News)

Dilip Kumar And Saeeda Khan
Fukrey 3 Leaked: 'फुकरे 3' ला मोठं नुकसान! प्रदर्शनापूर्वीच लीक: सोशल मीडियावर फ्री लिंकचे स्क्रीनशॉर्ट व्हायरल

Read the latest Marathi news and watch Live Streaming on Saam TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education at Saam TV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv Marathi news Channel app for Android and IOS.

साम आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुकट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, साम टीव्हीच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Saam TV Marathi News | साम टीव्ही
saamtv.esakal.com