'धुरंधर' 5 डिसेंबर 2025 ला थिएटरमध्ये रिलीज झाला.
आता बॉक्स ऑफिसवर 'धुरंधर २' ची हवा पाहायला मिळत आहे.
रणवीर सिंहचा 'धुरंधर' लवकरच टिव्हीवर पाहायला मिळणार आहे.
सध्या सर्वत्र रणवीर सिंहचा बोलबाला पाहायला मिळत आहे. 'धुरंधर २' पाहण्यासाठी थिएटर हाऊसफुल झाले आहेत. 'धुरंधर: द रिव्हेंज' बॉक्स ऑफिसवर धुमाकूळ घालत आहे. आदित्य धर दिग्दर्शित 'धुरंधर २' चित्रपटाने 'धुरंधर ' चा देखील रेकॉर्ड ब्रेक केला आहे. आता 'धुरंधर ' च्या चाहत्यांसाठी मोठी आनंदाची बातमी समोर आली आहे. 'धुरंधर' आता टीव्हीवर पदार्पण करण्यास सज्ज झाला आहे.
एकीकडे लोक 'धुरंधर २' पाहण्यासाठी चित्रपटगृहांकडे गर्दी करत आहेत, दुसरीकडे आता तुम्ही 'धुरंधर ' घरबसल्या पाहू शकणार आहात. 'धुरंधर'चा वर्ल्ड टीव्ही प्रीमियर होणार आहे. मीडिया रिपोर्टनुसार, 'धुरंधर'चा वर्ल्ड टीव्ही प्रीमियर ३० मे रोजी संध्याकाळी ७ वाजता स्टार गोल्ड, स्टार गोल्ड २ आणि कलर्स सिनेप्लेक्सवर (Star Gold, Star Gold 2, and Colors Cineplex) एकाच वेळी दाखवला जाईल.याचा अर्थ चित्रपट एकाच वेळी तीन वेगवेगळ्या चॅनल्सवर प्रसारित होणार आहे. त्यामुळे चाहते आता खूपच खुश असल्याचे दिसत आहे.
'धुरंधर'च्या प्रीमियरची तयारी सध्या सुरू आहे. मार्च महिना संपताना टीव्ही प्रीमियरची घोषणा झाली आहे. 'धुरंधर' 5 डिसेंबर 2025 रिलीज झाला. 'धुरंधर'मध्ये अक्षय खन्नाने आपल्या हटके स्टाइलने सर्वांचे मन जिंकले. 'धुरंधर' हा चित्रपट केवळ हिंदी भाषेत प्रदर्शित झाला होता, तर 'धुरंधर: द रिव्हेंज' हा चित्रपट पाच वेगवेगळ्या भाषांमध्ये चित्रपटगृहांमध्ये प्रदर्शित झाला आहे. हिंदी व्यतिरिक्त, हा चित्रपट तमिळ, तेलुगू, मल्याळम आणि कन्नड या भाषांमध्येही प्रदर्शित करण्यात आला आहे.
'धुरंधर 2' मध्ये रणवीर सिंहच्या प्रसिद्धीत मोठी वाढ झाली आहे. रहमान डकैतच्या मृत्यूनंतर पुढे काय घडते, याचा उलगडा 'धुरंधर 2'मध्ये होतो. 'धुरंधर 2' चित्रपटाची कथा भारताचा गुप्तहेर असलेल्या आणि पूर्वी 'जसकीरत सिंह रंगी' म्हणून ओळखल्या जाणाऱ्या हमझा अली माझारीच्या प्रवासाची आहे. Sacnilk च्या रिपोर्टनुसार, 'धुरंधर 2' चित्रपटाने जगभरात १,३९० कोटी पार कमाई केली आहे.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.