Dhurandhar 2 : बॉक्स ऑफिसवर धुमाकूळ घालणारा धुरंधर २ ऑनलाइन लीक; इंटरनेट विश्वात कल्ला, डायरेक्टर अ‍ॅक्शन मोडमध्ये

Dhurandhar 2 Leaked On Youtube : ‘धुरंधर: द रिव्हेंज’ हा सुपरहिट चित्रपट यूट्यूबवर पायरेटेड स्वरूपात लीक झाल्याने निर्मात्यांची चिंता वाढली आहे. १००० कोटींची कमाई करणाऱ्या या चित्रपटावर पायरेसीचा परिणाम होण्याची भीती व्यक्त केली जात आहे.
Dhurandhar 2 : बॉक्स ऑफिसवर धुमाकूळ घालणारा धुरंधर २ ऑनलाइन लीक; इंटरनेट विश्वात कल्ला, डायरेक्टर अ‍ॅक्शन मोडमध्ये
Dhurandhar 2 Leaked On YoutubeSaam tv
Published On
Summary
  • ‘धुरंधर: द रिव्हेंज’ चित्रपट ८४६.८७ कोटींवर

  • यूट्यूबवर पायरेटेड व्हर्जन लीक झाल्याची घटना

  • प्रेक्षकांच्या तक्रारीनंतर व्हिडिओ हटवण्यात आला

  • पायरेसीमुळे चित्रपटाच्या टीममध्ये चिंता

नुकताच प्रदर्शित झालेला आणि प्रेक्षकांना भुरळ घालणारा धुरंधर: द रिव्हेंज हा चित्रपट सध्या चर्चेचा विषय ठरला आहे. हा चित्रपट प्रदर्शित झाल्यानंतर काही दिवसांच्या कालावधीत सुपर हिट झाला. धुरंधरने गेल्या ११ दिवसांत ८४६.८७ कोटी इतकी कमाई केली आहे, तर भारतात त्याचं ग्रॉस कलेक्शन १०११.९५ कोटी रुपये इतकं आहे. मात्र आता या चित्रपटाचं व्हर्जन यूट्यूबवर अपलोड करण्यात आल्याचे म्हटले जात आहे. त्यामुळे चित्रपटाची टीम चिंतेत आली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, एका युट्युब चॅनेलवरून धुरंधर: द रिव्हेंज हा संपूर्ण चित्रपटाचं पायरेटेड व्हर्जन लीक करण्यात आला होता. हे लक्षात येताच प्रेक्षकांनी तात्काळ चित्रपटाचे दिग्दर्शक, आदित्य धर यांना सोशल मीडियावर टॅग करून या प्रकरणाची माहिती दिली. अनेक वापरकर्त्यांनी हा व्हिडिओ काढून टाकण्याची मागणी केली आहे.

Dhurandhar 2 : बॉक्स ऑफिसवर धुमाकूळ घालणारा धुरंधर २ ऑनलाइन लीक; इंटरनेट विश्वात कल्ला, डायरेक्टर अ‍ॅक्शन मोडमध्ये
Ashok Kharat : भोंदू अशोक खरातचं इंटरनॅशनल कनेक्शन; परदेशात पैसा पाठवण्यासाठी हवाल्याचा वापर?

चित्रपट लीक झाल्याची बातमी पसरताच, मोठ्या संख्येने नेटकऱ्यांनी प्लॅटफॉर्मवर त्या व्हिडिओची तक्रार केली. यानंतर, तो पायरेटेड व्हिडिओ तात्काळ काढून टाकण्यात आला. भारतात, कॉपीराइट कायद्यानुसार चित्रपटांची पायरेसी हा एक गंभीर गुन्हा मानला जातो. परवानगीशिवाय चित्रपट डाउनलोड करणे, शेअर करणे किंवा अपलोड करणे हा दंड आणि तुरुंगवासाच्या शिक्षेस पात्र गुन्हा आहे.

Dhurandhar 2 : बॉक्स ऑफिसवर धुमाकूळ घालणारा धुरंधर २ ऑनलाइन लीक; इंटरनेट विश्वात कल्ला, डायरेक्टर अ‍ॅक्शन मोडमध्ये
Gold Rate : ऐन लग्नसराईत चांदीच्या दरात मोठी घसरण, सोन्याच्या किमतीतही मोठा बदल; वाचा सुवर्णनगरीतील आजचे दर

चित्रपटाचे दिगदर्शक यांनी चित्रपट रिलीज होण्यापूर्वीच, दिग्दर्शक आदित्य धर यांनी प्रेक्षकांना स्पॉइलर्स शेअर न करण्याचे आणि पायरसी टाळण्याचे विशेष आवाहन केले होते. त्यांनी सांगितले की, संपूर्ण टीमने हा चित्रपट बनवण्यासाठी खूप वेळ आणि मेहनत घेतली आहे आणि प्रेक्षकांनी त्या मेहनतीचा आदर करावा असे त्यांनी आवाहन केले होते. मात्र चित्रपट लीक झाल्याने आता चिंता व्यक्त केली जात आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com