Dhurandhar 2 OTT : आता थिएटरमध्ये नाही तर घरबसल्या बघा 'धुरंधर २', ओटीटीवर कुठे अन् कधी पाहता येणार?

Dhurandhar The Revenge OTT Release Update : जगभरात धुमाकूळ घालणारा रणवीर सिंहचा 'धुरंधर २' चित्रपट ओटीटीवर कधी येणार, जाणून घेऊयात.
Dhurandhar The Revenge OTT Release Update
Dhurandhar 2 OTTSAAM TV
Published On
Summary

'धुरंधर: द रिव्हेंज' चित्रपट 19 मार्च 2026 ला प्रेक्षकांच्या भेटीला आला आहे.

'धुरंधर २' चित्रपट आदित्य धर दिग्दर्शित आहे.

'धुरंधर २' चित्रपट लवकरच ओटीटीवर पाहायला मिळणार आहे.

आदित्य धरचा 'धुरंधर २' चित्रपट रिलीज आधीपासून वादाच्या भोवऱ्यात अडकला होता. अनेक वाद होऊन देखील या चित्रपटाला बॉक्स ऑफिसवर उदंड प्रतिसाद मिळाला. प्रेक्षक आदित्य धर आणि रणवीर सिंहचे मोठे चाहते झाले आहेत. सर्वत्र आदित्य धरच्या दिग्दर्शनाचे कौतुक होत आहे. 'धुरंधर 2' चित्रपटाची कथा भारताचा गुप्तहेर असलेल्या आणि पूर्वी 'जसकीरत सिंह रंगी' म्हणून ओळखल्या जाणाऱ्या हमझा अली माझारीच्या प्रवासाची आहे. 'धुरंधर: द रिव्हेंज' चित्रपट 19 मार्च 2026 ला रिलीज झाला आहे. आता सोशल मीडियावर 'धुरंधर २' च्या ओटीटी रिलीजची चर्चा पाहायला मिळत आहे.

'धुरंधर २: द रिव्हेंज' ओटीटी रिलीज

ET च्या वृत्तानुसार, 'धुरंधर २: द रिव्हेंज' चित्रपट थिएटर रिलीजनंतर जिओ हॉटस्टार या ओटीटी प्लॅटफॉर्मवर रिलीज होणार आहे. 'धुरंधर २: द रिव्हेंज' चा पहिला भाग 'धुरंधर' हा नेटफ्लिक्सवर प्रदर्शित झाला होता. रणवीर सिंहचा 'धुरंधर २' चित्रपट मे २०२६ च्या शेवटच्या आठवड्यात किंवा जून २०२६ च्या पहिल्या आठवड्यात ओटीटीवर प्रदर्शित होण्याची शक्यता आहे. मात्र अद्याप कोणतीही अधिकृत घोषणा झाली नाही. चाहते 'धुरंधर २' च्या ओटीटी रिलीजची उत्सुकतेने वाट पाहत आहेत.

जिओ हॉटस्टारने 'धुरंधर २: द रिव्हेंज' चित्रपटाचे ओटीटी राइट्स सुमारे १२० ते १५० कोटी रुपयांना विकत घेतल्याचे समजते. 'धुरंधर २: द रिव्हेंज' चित्रपटाला बॉक्स ऑफिसवर बक्कळ यश मिळत आहे. 'धुरंधर २' ने भारतीय बॉक्स ऑफिसवर १,०३३.३७ कोटी पार आणि जगभरात १,६४१.२१ कोटी पार कमाई केली आहे. 'धुरंधर २: द रिव्हेंज'ने अनेक मोठ्या चित्रपटांचे रेकॉर्ड ब्रेक केले आहेत.

'धुरंधर' चित्रपट

'धुरंधर २: द रिव्हेंज' चा पहिला भाग 'धुरंधर' 5 डिसेंबर 2025 रिलीज झाला होता. या चित्रपटातील अक्षय खन्नाचे FA9LA गाणे खूप गाजले. यात रणवीर सिंगसोबत सारा अर्जुन, सारा अर्जुन, आर. माधवन, अर्जुन रामपाल, संजय दत्त, अक्षय खन्ना हे कलाकार झळकले. 'धुरंधर' २०२५ च्या सुपरहिट चित्रपटांच्या यादीत येतो.

Dhurandhar The Revenge OTT Release Update
Actress Mother Death : मातृछत्र हरपले! प्रसिद्ध अभिनेत्रीच्या आईचे निधन, बॉलिवूडवर शोककळा

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com