Shocking : धक्कादायक! प्रसिद्ध मॉडेलवर धारदार शस्त्राने हल्ला करत संपवलं, जिम ट्रेनर घरातला घुसला अन्...

Delhi Crime News : पश्चिम दिल्लीतील तिलक नगरमध्ये मुस्कान या तरुणीची घरात चाकूने वार करून हत्या झाल्याची घटना समोर आली आहे. जिम ट्रेनर इमरानवर संशय असून पोलीस सीसीटीव्हीच्या आधारे तपास करत आहेत.
delhi model Muskaan murder news
delhi model Muskaan murder newsAI Image
Published On
Summary
  • पश्चिम दिल्लीतील तिलक नगरमध्ये प्रसिद्ध मॉडेल मुस्कानची हत्या

  • घटनेच्या वेळी मुस्कान घरात एकटी होती

  • प्राथमिक तपासात जिम ट्रेनरने हत्या केल्याचे समोर

  • पोलीस पुढील तपास करत आहेत

पश्चिम दिल्लीतील तिलक नगर परिसरात एका तरुणीची चाकूने वार करून हत्या करण्यात आल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. घरात ती एकटी असल्याचा फायदा घेत अज्ञात आरोपीने तिच्यावर चाकूने अनेक वार केले. गंभीर जखमी अवस्थेत तिला तातडीने जवळच्या रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र उपचारादरम्यान तिचा मृत्यू झाला.

मिळालेल्या माहितीनुसार, मृत तरुणीचे नाव मुस्कान असल्याचे समोर आले आहे. ती शिक्षण घेत होती आणि पार्टटाइम मॉडेलिंगही करत होती. घटनेच्या वेळी मुस्कान घरात एकटीच होती. याच संधीचा फायदा घेत आरोपी घरात शिरला आणि तिच्यावर हल्ला करून घटनास्थळावरून फरार झाला. या प्रकरणाच्या प्राथमिक तपासात इमरान नावाच्या तरुणावर संशय व्यक्त केला जात आहे.

delhi model Muskaan murder news
Diabetes Diet : फक्त ५ सेकंदांत जाणून घ्या, डायबिटीजच्या रुग्णांनी कोणती कडधान्य खाऊ नयेत

कुटुंबीयांच्या माहितीनुसार, इमरान मुस्कानला आधीपासून ओळखत होता. मुस्कान ज्या जिममध्ये व्यायामासाठी जात होती, तिथे इमरान जिम ट्रेनर म्हणून काम करत असल्याचे सांगितले जात आहे. मुस्कानचा मित्र अमन याने माध्यमांशी बोलताना सांगितले की, इमरान बराच काळ मुस्कानचा पाठलाग करत होता आणि तिला त्रास देत होता. यापूर्वीही त्याने मुस्कानला त्रास दिल्याचा दावा अमनने केला. त्यामुळे हल्ल्याची माहिती मिळताच कुटुंबीयांचा संशय इमरानवर गेला.

delhi model Muskaan murder news
Korean Skincare Tips : कोरियन मुलींसारखा नॅचरल ग्लो हवा आहे? महिनाभर खा 'हे' ६ पदार्थ

अमनच्या म्हणण्यानुसार, इमरान सुमारे सायंकाळी ५.४० वाजता मुस्कानच्या घरात शिरला असावा. घराजवळील सीसीटीव्ही फुटेजमध्ये त्याची हालचाल कैद झाली असून मुस्कानचा भाऊ आकाश याने फुटेजमधील व्यक्तीची ओळख इमरान म्हणून केल्याचे सांगितले जात आहे. घटनेनंतर पोलिसांनी तपास सुरू केला असून आरोपी इमरानचा शोध घेतला जात आहे. परिसरातील सीसीटीव्ही फुटेज तपासून हल्लेखोराच्या हालचालींचा माग काढण्याचे काम सुरू आहे. या हत्येमागील नेमका हेतू काय होता, याचाही पोलीस तपास करत आहेत. आरोपी सापडल्यानंतरच या प्रकरणातील अनेक प्रश्नांची उत्तरे स्पष्ट होणार आहेत.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com