money laundering case : राज कुंद्रा यांना मोठा दिलासा; कोर्टाकडून परदेश प्रवासाची परवानगी

money laundering case : उद्योगपती राज कुंद्रा यांना मोठा दिलासा मिळालाय. त्यांना कोर्टाकडून परदेश प्रवासाची परवानगी मिळाली आहे.
court
money laundering caseSaam tv
Published On
Summary

मनी लाँड्ररिंग प्रकरणातील राज कुंद्रा यांना मिळाला मोठा दिलासा

कोर्टाकडून मिळाली परदेशात जाण्याची परवानगी

ईडीने केला होता अर्जाला विरोध

संजय गडदे, साम टीव्ही

मनी लाँड्ररिंग प्रकरणातील आरोपी उद्योगपती राज कुंद्रा यांना विशेष न्यायालयाने जून ते जुलै २०२६ या कालावधीत व्यावसायिक कारणांसाठी विविध देशांत प्रवास करण्याची परवानगी दिली आहे. अंमलबजावणी संचालनालयाने (ईडी) या अर्जाला तीव्र विरोध करत, कुंद्रा परदेशात जाऊन फरार होण्याची किंवा जामिनाच्या अटींचे उल्लंघन करण्याची शक्यता असल्याचा युक्तिवाद केला होता.

court
Maharashtra News Live Update: - महागडा मोबाईल नदीपात्रात पडला, थेट गोताखोरांना बोलावून मध्यरात्री राबवली शोधमोहीम

न्यायालयाने ईडीचा आक्षेप फेटाळून लावत कुंद्रांच्या बाजूने निर्णय दिला. न्यायालयाने नमूद केले की, आर्थिक गुन्हे शाखेने (EOW) कुंद्रांविरोधातील लुकआऊट सर्क्युलर (LOC) यापूर्वीच रद्द केले आहे. तसेच, आतापर्यंत कुंद्रांनी त्यांना दिलेल्या स्वातंत्र्याचा गैरवापर केल्याचा कोणताही पुरावा नोंदीवर नाही.न्यायालयाने आपल्या आदेशात म्हटले की, परदेश प्रवासाचा अधिकार हा भारतीय संविधानाने दिलेल्या मूलभूत अधिकाराचा एक भाग आहे. त्यामुळे योग्य अटींच्या अधीन राहून कुंद्रांना परदेशात जाण्याची परवानगी देण्यात येत आहे.

न्यायालयाने राज कुंद्रांना ७ जून ते २७ जुलैदरम्यान हाँगकाँग, दुबई, टोकियो, लॉस एंजेलिस, टोरोंटो आणि मेलबर्न येथे प्रवास करण्यास मंजुरी दिली आहे. यासाठी त्यांना एक लाख रुपयांची सुरक्षा रक्कम जमा करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत.तसेच, भारतातून रवाना होण्यापूर्वी संपूर्ण प्रवासाचा तपशील, निवासाचा पत्ता, संपर्क क्रमांक आणि कार्यरत ई-मेल आयडी तपास अधिकाऱ्यांकडे सादर करणे बंधनकारक करण्यात आले आहे.

court
Maharashtra News Live Update: नीट पेपरफुटी प्रकरणातील पालकांवर सीबीआयचे लक्ष

परतल्यानंतर तात्काळ तपास अधिकाऱ्यांना भेट देऊन न्यायालयात अनुपालन अहवाल सादर करण्याचेही आदेश देण्यात आले आहेत. आरोप निश्चितीची प्रक्रिया सुरू झाल्यास कुंद्रांनी तत्काळ भारतात परतणे आवश्यक असेल, असे न्यायालयाने स्पष्ट केले.

दरम्यान, ईडीचा हा मनी लॉन्डरिंग खटला महाराष्ट्र व दिल्ली पोलिसांनी व्हेरिएबल टेक प्रायव्हेट लिमिटेड आणि इतर संबंधित व्यक्तींविरोधात दाखल केलेल्या एफआयआरवर आधारित आहे. बिटकॉइन गुंतवणुकीवर दरमहा १० टक्के परताव्याचे आमिष दाखवून मोठ्या प्रमाणात निधी उभारण्यात आला आणि गुंतवणूकदारांची फसवणूक केल्याचा आरोप या प्रकरणात करण्यात आला आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com