Charles Shobharaj: ड्रग्स, मैत्री, प्रेम; चार्ल्स शोभाराजचे सिनेसृष्टीशी कनेक्शन...

'बिकिनी किलर' या नावाने प्रसिद्ध असलेले 'चार्ल्स शोभराज' हे गुन्हेगारी जगतातील प्रसिद्ध नाव आहे.
Charles Shobhraj
Charles ShobhrajSaam Tv
Published On

Charles Shobharaj: 'बिकिनी किलर' या नावाने प्रसिद्ध असलेले 'चार्ल्स शोभराज' हे गुन्हेगारी जगतातील प्रसिद्ध नाव आहे. नावातच सर्वत्र कायम दरारा. किशोरवयीन वयात गुन्हेगारीच्या जगात प्रवेश करताच चार्ल्स शोभराजने महिलांना टार्गेट करत त्यांच्याशी मैत्रीचे नाते बनवत त्यांना ड्रग्ज देऊन त्यांची हत्या करायचा. संपूर्ण जगभरात त्याने असंख्य खून, इतर गुन्हे करत पोलिसांना चकवा देत जगभ्रमंती केली.

Charles Shobhraj
Upcoming web series 2023: नवीन वर्षात चित्रपटप्रेमींसाठी खास मेजवानी, अनेक बहूप्रतिक्षित वेबसीरिजचे येणार आगमी भाग...

नेपाळच्या सर्वोच्च न्यायालयाने त्याच्या सुटकेचा आदेश दिला होता. चार्ल्स शोभराज 2003 पासून नेपाळच्या तुरुंगातच होता. 2003 मध्ये चार्ल्स शोभराजला दोन परदेशी महिलांच्या हत्येप्रकरणी दोषी ठरवत जन्मठेपेची शिक्षा सुनावण्यात आली होती. आता चार्ल्स शोभराजची १९ वर्षांनंतर तुरुंगातून सुटका होत असताना त्याच्या जीवनावर आधारित काही चित्रपटांची चर्चा केली जात आहे.

Charles Shobhraj
Jhoome Jo Pathaan Song Out: शाहरुख- दीपिकाचे नव्या गाण्यात जबरदस्त ठुमके, 'झुमे जो पठान' गाण्यातील रोमान्स पाहून नजर हटेना...

चार्ल्स शोभराजच्या जीवनावर अनेक वेब सिरीज आणि चित्रपटही बनवले गेले, ज्यांची खूप चर्चाही झाली होती. या 'बिकिनी किलर'च्या आयुष्यावर एक डॉक्युमेंट्रीही बनवण्यात आली होती. पण 'द सर्पेंट' या वेब सीरिजने त्याला फारच प्रकाशझोतात आणले. 'बिकिनी किलर' व्यतिरिक्त चार्ल्स शोभराजची 'द स्प्लिटिंग किलर' आणि 'द सर्पंट' म्हणूनही ओळख कायम होती.

Charles Shobhraj
Kantara For Oscars: 'कांतारा'च्या शिरपेचात आणखी एक मानाचा तुरा, चित्रपटाचा ऑस्करच्या यादीत समावेश

चार्ल्स शोभराज फॅशन करण्यात फारच माहिर असल्याने त्याला 'सर्पेंट' असे बोलायचे. एका मुलाखतीत रणदीप हुड्डा यांनी सांगितले होते की, अमिताभ बच्चन यांच्या 'डॉन' चित्रपटातील प्रसिद्ध डायलॉग (डॉन का इंतजार तो ११ मुल्कोंकी पुलिस कर रही है) हा शोभराजच्या जीवनावर आधारित घेण्यात आला आहे.

सध्या चार्ल्स शोभराज आता पुन्हा एकदा तुरुंगाबाहेर पडत असल्याच्या कारणाने का होईना चर्चेत आला आहे. २०२१ मध्ये 'द सर्पेंट' ही वेबसिरीज रिलीज झाली होती. नक्की त्या वेबसीरिजची काय कथा आहे? त्यात चार्ल्स शोभराजची भूमिका कोणी केली होती याची चर्चा पुन्हा एकदा होत आहे.

Charles Shobhraj
Urfi javed : उर्फी जावेदला बलात्काराची धमकी देणारा अटकेत; कोण आहे ती व्यक्ती?

'द सर्पंट'ची कथा

'द सर्पंट' या कथेत चार्ल्स शोभराजने केलेल्या गुन्हेगारी विश्वातील काही निवडक कथा चित्रित करण्यात आले आहे. आठ भागांच्या या वेबसीरिजमध्ये फ्रेंच-अल्जेरियन अभिनेता तहर रहीमने चार्ल्स शोभराजची भूमिका साकारली होती. ही कथा एका फ्रेंच सिरीयल किलरची आहे जो ड्रग्स देत पर्यटकांची हत्या करतो.

पर्यटकांना मारल्यानंतर, तो त्यांचे पासपोर्ट आणि इतर कागदपत्रांवर डल्ला मारत यांच्या ओळखीच्या माध्यमातून दुसऱ्यांची हत्या करायचा. त्याच्या अटकेची कथा 'द सर्पेंट' या वेब सीरिजमध्ये दाखवण्यात आली असून २००३ मध्ये अटकेच्या एक दिवस आधी काठमांडूमध्ये होता.

Charles Shobhraj
Avatar: The Way of Water: 'अवतार 2' मधील किरी 14 वर्षाची नसून..., अभिनेत्रीने केला मोठा खुलासा

चार्ल्स शोभराजची ओळख

व्हिएतनामी वंशाचे चार्ल्स शोभराज यांचा जन्म 1944 मध्ये झाला होते. त्याचे वडील भारतीय होते, तर आई व्हिएतनामची होती. चार्ल्स शोभराज 1963 मध्ये पहिल्यांदा तुरुंगात टाकण्यात आले होते. त्यानंतर त्याला पॉईसी तुरुंगात ठेवण्यात आले. या तुरुंगात भयंकर कैदी होते आणि चार्ल्स शोभराज त्यांच्यामध्ये राहून आणखीनच धोकादायक बनला होता, असे सांगितले जाते. येथून सुटका झाल्यानंतर चार्ल्स शोभराजने उच्च शिक्षित, उच्चभ्रू लोकांना लक्ष्य करण्यास सुरुवात केली.

Charles Shobhraj
Govinda Birthday: गोविंदाला 'या' घटनांनी शिकवला आयुष्यभराचा धडा, जाणून घ्या त्याच्या करिअरमधील 'त्या' घडामोडी

यामध्ये तहर रहीम चार्ल्स शोभराजच्या भूमिकेत, बॉलिवूड आणि टीव्ही अभिनेता अली खानने नारंदा नाथ तुलीच्या भूमिकेत, अभिनेता प्रवेश राणा नेपाळी पोलिस अधिकारी तर अभिनेता दर्शन जरीवाला या वेबसीरिजमध्ये हॉटेल मॅनेजरच्या भूमिकेत होता. ही वेबसीरिज नेटफ्लिक्सवर एप्रिल २०२१ मध्ये प्रदर्शित झाली होती. या वेबसीरिजचे दिग्दर्शन हंस हर्बट्सने केले होते.

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com