Govinda Birthday Special: बॉलिवूडचा सुपरस्टार गोविंदाचा हा ५९ वाढदिवस आहे. गोविंदाने त्याच्या डान्स, एक्स्प्रेशन आणि अभिनयाने सर्वांना त्याच्यावर प्रेम कार्याला भाग पाडले. ८० आणि ९०च्या दशकात त्याने एकापेक्षा एक दर्जेदार चित्रपटांमध्ये काम केले आहे. आज त्याच्या वाढदिवसानिमित्त जाणून घेऊया त्याच्याविषयी.
गोविंदा १३-१४ वर्षाचा असल्यापासून चित्रपटात काम कारण्यासाठी धडपड करत होता. त्याच्या आईचा त्याने अभिनय करण्यावर विरोध होता. त्यामुळे आईपासून लपून गोविंदा फिल्म स्टुडिओमध्ये फेऱ्या मारत होता. गोविंदाचे वडील अभिनेते होते आणि आणि आई गायिका तरीही चित्रपट येण्यासाठी त्याला खूप संघर्ष करावा लागला.
गोविंदाला आधीपासूनच डान्सची आवड होती. १९८३ साली मिथुन चक्रवर्तीच्या 'डिस्को डान्सर' चित्रपट प्रदर्शित झाल्यानंतर गोविंदाने त्या चित्रपटातील गाण्यावर तासन तास सराव केला. त्यानंतर त्याने त्याच्या डान्सचा व्हिडिओ रेकॉर्ड केला आणि त्याच्या व्हीएचएस प्रत्येक स्टुडिओमध्ये दिला. या व्हिडिओनंतर गोविंदाला त्याची पहिली अॅड फिल्म मिळाली. गोविंदाला अध्यात्मिक मालिका महाभारतमध्ये अभिमन्यूची भूमिका देखील मिळाली होती. परंतु त्यापूर्वी त्याला 'तन बदन' चित्रपट मिळाला होता.
गोविंदाने अनेक चित्रपटांसाठी ऑडिशन दिले होते. परंतु त्या काळी कोणताच चित्रपट निर्माता नवीन अभिनेत्याला कास्ट करण्याची जोखीम घेण्यास तयार नव्हता. एक दिवस गोविंदाने त्याच्या मामांना त्याच्या डान्स आणि अॅक्शन सीन्सची कॅसेट पाठवली. मामा आनंद गोविंदाच्या टॅलेंटवर इतके खूश झाले की त्यांनी आपल्या चित्रपटाचा विषय बदलला आणि त्याला त्याच्या चित्रपटात कास्ट करण्याचा निर्णय घेतला. आनंदने गोविंदाला त्यांची स्क्रिप्ट दाखवली तेव्हा गोविंदाने विचारले की या चित्रपटाचा हिरो कोण आहे. मामा गोविंदाला म्हणाले, डोळे बंद कर, मग सांगेन. गोविंदाने डोळे मिटताच मामा आनंदने त्याला जोरदार चापट मारली आणि म्हणाले की तू या चित्रपटाचा हिरो आहेस.
चित्रपटांमध्ये यशस्वी होण्याआधी गोविंदाची आर्थिक परिस्थिती बेताची होती. एकदा गोविंदा त्याच्या आईला सोडण्यासाठी रेल्वे स्टेशनला गेला होता. स्टेशनवर इतकी गर्दी होती की गोविंदाला त्याच्या आईला ट्रेनमध्ये बसवता आले नाही. पाच गाड्या गेल्या तरीही गर्दी कमी होईना. गोविंदाला आईला इतका वेळ तात्कळत ठेवणे योग्य वाटले नाही. त्याने लगेच नातेवाईकांकडून पैसे उसने घेतले आणि आईसाठी फर्स्ट क्लासचं तिकीट काढलं आणि तिला ट्रेनमध्ये बसवलं.
'तन बदन' हा गोविंदाचा पहिला चित्रपट होता, पण त्याआधी त्याचा 'इल्झाम' चित्रपट प्रदर्शित झाला होता. जो त्याचा पहिला चित्रपट ठरला. आवरगी आणि महा-संग्राम यांसारख्या क्लासिक्समध्ये चित्रपटांमध्ये अभिनय करून गोविंदा स्टारडमवर पोहोचला. गोविंदाने चित्रपटसृष्टीत येताच पहिल्याच वर्षी 49 चित्रपट साइन केले होते.
१९८९ च्या जंगबाजमध्ये गोविंदा राजकुमार सोबत दिसला होता. या शूटिंगदरम्यान राजकुमारने नवोदित गोविंदाचा खूप अपमान केला होता. गोविंदा शूटिंग वेळी नवीन शर्ट घालून आला होता, जो राजकुमारला खूप आवडला होता. स्तुती ऐकून गोविंदा व्हॅनिटीकडे गेला आणि लगेच शर्ट काढून राजकुमारला दिला. काही वेळाने जेव्हा गोविंदा सेटवर आला तेव्हा त्याने राजकुमारला त्या शर्टची नाक पुसताना दिसला. गोविंदाला याने खूप अपमानास्पद आणि वाईट वाटले.
गोविंदा आणि अमरीश पुरी 'दो कैदी' आणि 'फर्ज की जंग' या चित्रपटात एकत्र दिसले होते. एका चित्रपटादरम्यान दोघांमध्ये एवढी वादावादी झाली की अमरिशने गोविंदाच्या कानाखाली आवाज काढला. एके दिवशी सकाळी ९ च्या शूटिंग शेड्यूलमध्ये गोविंदा संध्याकाळी ६ वाजता पोहोचला. तर अमरीश पुरी सकाळी ९ वाजल्यापासून वाट पाहत बसले होते. गोविंदा येताच अमरिशने त्याला बरंच काही सुनावलं. वाद इतका वाढला की अमरीशने गोविंदाला जोरात कानाखाली मारली. तेव्हापासून गोविंदाने कधीही त्याच्यासोबत काम केले नाही.
5 जानेवारी 1994 रोजी गोविंदाच्या कारचा मोठा अपघात झाला होता. या अपघातात गोविंदाच्या डोक्याला खोलवर दुखापत झाली आणि मोठ्या प्रमाणात रक्तस्त्राव झाला होता. तेव्हा गोविंदाच्या 'खुद्दार' या चित्रपटाचे शूटींग सुरू होते. गंभीर दुखापत होऊनही गोविंदाने शूटिंग रद्द केले नाही. त्याने डॉक्टरांकडून उपचार करून घेतले आणि थेट सेटवर पोहोचला. त्या दिवशी गोविंदाने मध्यरात्रीपर्यंत शूटिंग केले.
'तन बदन' या पहिल्या चित्रपटाच्या शूटिंगदरम्यान गोविंदाची भेट सुनीताशी झाली. सुमित गोविंदाचे मामा आनंद सिंग यांची मेहुणी होती. आनंद त्याच्या चित्रपटाचे दिग्दर्शक होते. दोघे प्रेमात पडले आणि 11 मार्च 1987 रोजी दोघांनी लग्न केले. गोविंदा इंडस्ट्रीत नवीन असल्याने लग्नाचे प्रकरण समोर आले तर त्याचा त्याच्या करिअरवर वाईट परिणाम होईल असे त्याला वाटत होते. अशा परिस्थितीत त्यांनी 4 वर्षे आपले लग्न लपवून ठेवले.गोविंदाला टीना आणि यशवर्धन ही दोन मुले आहेत. जेव्हा गोविंदाने 1991 मध्ये आपल्या मुलीचा वाढदिवसानिमित्त एक भव्य पार्टी दिली होती. तेव्हा पार्टीतील छायाचित्रे पाहून त्याच्या लग्नाची आणि मुलांची बातमी ऐकून सर्वांनाच धक्का बसला.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.