Upcoming web series 2023: नवीन वर्षात चित्रपटप्रेमींसाठी खास मेजवानी, अनेक बहूप्रतिक्षित वेबसीरिजचे येणार आगमी भाग...

२०२२ प्रमाणे २०२३ हे वर्ष ही प्रेक्षकांचे मनोरंजन करणार आहे. आगामी वर्षात ओटीटीवर जबरदस्त चित्रपट आणि वेबसीरिज प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.
Upcoming WebSeries 2022
Upcoming WebSeries 2022Saam Tv
Published on

Upcoming web series 2023: २०२० पासून जगभरातील सर्वच प्रेक्षक ओटीटीवर चित्रपट पाहत होते. या काळात अनेक चित्रपटांना आणि वेबसीरिजला चांगलाच प्रतिसाद मिळाला होता. प्रेक्षकांनी ओटीटीला दिलेली पसंदी पाहता बरेच दिग्दर्शक आपला चित्रपट ओटीटीवर प्रदर्शित करण्याचा अट्टाहास करीत असतात. २०२२ प्रमाणे येणारे २०२३ हे आगामी वर्ष ही बरेच प्रेक्षकांचे मनोरंजन करणार आहे.

आगामी वर्षात ओटीटीवर जबरदस्त चित्रपट आणि वेबसीरिज प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. या वर्षात इंडियन पोलिस फोर्स, मिर्झापूर सीझन ३, द फॅमिली मॅन सीझन ३ या आणि याहून अधिक दर्जेदार वेबसीरिज येत्या आगामी वर्षात प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहेत. चला तर एक नजर टाकूया कोणकोणत्या वेबसीरिज प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहेत.

Mirzapur Season 3
Mirzapur Season 3Saam Tv

मिर्झापूर सीझन ३ (Mirzapur Season 3)

प्रसिद्ध मिर्झापूर मालिकेचा तिसरा सीझन लवकरच भारतात OTT प्लॅटफॉर्मवर येणार आहे. अॅमेझॉन प्राइम व्हिडिओने स्वतः याबाबत एक सूचना दिली आहे. 2023 च्या सुरुवातीला ही वेबसीरिज प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.

The Family Man Season 3
The Family Man Season 3Saam Tv

द फॅमिली मॅन सीझन 3 (The Family Man Season 3)

OTT वरील मनोज बाजपेयी यांची सर्वात लोकप्रिय वेबसीरिज फॅमिली मॅनचा पुढील सीझन लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. या वेब सीरिजने अॅमेझॉनवरील टॉप रेटेड वेब सीरिजपैकी एक असल्याचा मान मिळावला आहे. त्याच्या दोन्ही भागांमध्ये जबरदस्त अॅक्शन, ड्रामा आणि सस्पेन्स दाखवण्यात आला होता. आता येत्या पुढील भागात काय असणार याची उत्सुकता सर्वांनाच आहे.

Paatal Lok Season 2
Paatal Lok Season 2Saam Tv

पाताल लोक सीझन २ (Paatal Lok Season 2)

पाताल लोकचा पुढील सीझन येत्या आगामी वर्षात अॅमेझॉन प्राईम व्हिडीओवर प्रदर्शित होणार आहे. या सीझनमध्ये अभिनेता जयदीप अहलावत दिसणार आहे. ज्याने पहिल्या सीझनमध्येही प्रेक्षकांची मने जिंकली होती. आगामी सीझन कथेत काही नवे ट्विस्ट आणणार असल्याचे सांगण्यात येत आहे.

Aashram Season 4
Aashram Season 4Saam Tv

आश्रम सीझन ४ (Aashram Season 4)

बॉबी देओलची असलेली नकारात्मक भूमिकेने ओटीटीवर प्रेक्षकांनी खूपच पसंदी दर्शवली. या वेबसीरिजचे तीनही सीझन प्रेक्षकांना फारच आवडले असून आता पुढच्या सीझनचीही प्रेक्षक आतुरतेने वाट पाहत आहेत. हा चौथा सीझनही पुढील वर्षी म्हणजेच २०२३ मध्ये प्रदर्शित होणार आहे.

Indian Police Force
Indian Police ForceSaam Tv

इंडियन पोलिस फोर्स (Indian Police Force)

रोहित शेट्टी दिग्दर्शित इंडियन पोलीस फोर्स ही वेबसीरिज एका तरुण पोलिस अधिकाऱ्याची कथा सांगणार आहे. मुख्य बाब म्हणजे या मालिकेतून सिद्धार्थ मल्होत्रा ​​आणि शिल्पा शेट्टी ओटीटीवर पदार्पण करणार आहेत. ही वेबसीरिज 2023 मध्ये अॅमेझॉन प्राईम व्हिडीओवर प्रदर्शित होणार आहे.

Scam 2003
Scam 2003Saam Tv

स्कॅम २००३ (Scam 2003)

२००३ मध्ये झालेल्या एका घोटाळ्यावर आधारित वेबसीरिज येत्या आगामी वर्षात येणार आहे. हंसल मेहता यांनी केलेल्या घोटाळ्यावर ही वेबसीरिज आहे. ही मालिता सोनी लिव्हवर प्रदर्शित होणार आहे. याआधी स्कॅम १९९२ या वेबसीरिजनेही ओटीटीसह सोशल मीडियावर चांगलाच धुमाकूळ घातला होता.

Heeramandi
HeeramandiSaam Tv

हीरामंडी (Heeramandi)

संजय लीला भन्साळी दिग्दर्शित हीरामंडी या वेबसिरीजची सध्या सोशल मीडियावर बरीच चर्चा होत आहे. ही गोष्ट देशाच्या फाळणीपूर्वीची आहे. यात अनेक राजकीय मुद्दे दाखवण्यात आले आहे. ही वेबसीरिज येत्या आगामी वर्षात Netflix प्लॅटफॉर्मवर प्रदर्शित होणार आहे.

Choona
Choona Saam Tv

चुना (Choona)

नवीन वर्षाच्या मुहूर्तावर नेटफ्लिक्सवर ही चुना वेब सिरीज प्रदर्शित करण्याची चर्चा सुरु होती, पण अद्यापही तारीख जाहीर करण्यात आली नाही. या मालिकेत दमदार कलाकार जिमी शेरगिल, नमित दास आणि मोनिका पनवार हे मुख्य भूमिकेत दिसणार आहे.

Rocket Boys 2
Rocket Boys 2Saam Tv

रॉकेट बॉईज सीझन 2 (Rocket Boyz Season 2)

'रॉकेट बॉईज'चा दुसरा सीझन पुढील वर्षी 2023 मध्ये रिलीज होणार आहे. पहिल्या सीझनमध्ये जिम सरभ वैज्ञानिक डॉ. होमी भाभा यांच्या भूमिकेत दिसला होता. तर इश्वाक सिंग यांनी डॉ. विक्रम साराभाई यांची भूमिका साकारली होती. सोनी लिव्हवर ही वेबसीरिज प्रदर्शित झाली असून तिला प्रेक्षकांकडून चांगलाच प्रतिसाद दिला होता.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com