Kantara: २०२२ या वर्षात अनेक बॉलिवूड चित्रपट फ्लॉप झाले, बॉयकॉट ट्रेंडने बऱ्याच चित्रपटांवर चांगलीच नामुष्की ओढवली. परंतू जरी इतके काही असले तरी काही चित्रपटांनी अनेक रेकॉर्ड मोडीत काढत चांगला गल्ला जमवला. या शर्यतीत दाक्षिणात्य चित्रपट देखील होते. दाक्षिणात्य चित्रपटांनी कोरोना महामारीनंतर आपल्या रेकॉर्ड ब्रेक कमाईत चांगलीच यशस्वी घोडदौड केली. अनेक चित्रपट असे आहेत ज्यांनी भल्याभल्या कलाकारांना धुळ चारत आपले नाव हीट चित्रपटांच्या यादीत आणले.
रिषभ शेट्टी दिग्दर्शित ‘कांतारा’ या दाक्षिणात्य चित्रपटाने यंदा भारतीय चित्रपटसृष्टी गाजवली. चित्रपट प्रदर्शित होताच २०२२ मधील हीट चित्रपटांच्या यादीत आपले स्थान कमवले. या चित्रपटाने अनेक रेकॉर्डतोड कमाई करत जगभरातल्या प्रेक्षकांना अक्षरशः आपले वेड लावले. आता हा चित्रपट ऑस्करच्या शर्यतीतही सामील झाला आहे.
चित्रपटाचे दिग्दर्शक रिषभ शेट्टीला चित्रपटाच्या दिग्दर्शनावरून आणि त्यात केलेल्या कमाईवरून सर्वत्र कौतुक केले गेले. या चित्रपटाच्या कथेने प्रेक्षकांना वेगळा विचार करण्यास भाग पडलं. चित्रपटगृहानंतर आता ओटीटीवरही हा चित्रपट उत्कृष्ट कामगिरी करत आहे. त्यामुळेच आता या चित्रपटाचे नाव ऑस्करसाठी देण्यात आले आहे.
मिळालेल्या माहितीनुसार चित्रपटाची निर्मिती करणाऱ्या होम्बले प्रोडक्शन्सचे संस्थापक विजय किरांगदुर म्हणतात, " ‘कांतारा’ या चित्रपटाचं ऑस्करसाठी नॉमिनेशन व्हावं यासाठी आम्ही अर्ज केला आहे. पण यावर अजून अंतिम निर्णय होणं बाकी आहे. ‘कांतारा’ हा चित्रपट त्याच्या कथेमुळे जगभरात आपली वेगळी ओळख निर्माण करू शकतो, याची आम्हाला खात्री आहे."
एस. एस. राजमौली दिग्दर्शित ' आर आर आर चित्रपटाचे ऑस्कर साठी नाव सुचवण्यात आले होते, पण निवड करण्यात आली नाही. आता सर्व चित्रपटप्रेमींचे ' कांतारा' चित्रपटाची निवड होते का याकडे सर्वांचेच लक्ष लागले होते.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.