Fighter Film Advance Booking: दीपिका- हृतिकच्या 'फायटर'ने रिलीजआधीच केली छप्परफाड कमाई; फक्त तीन दिवसांत कमावले इतके कोटी

Fighter Film: हृतिक रोशन आणि दीपिका पदुकोण स्टारर 'फायटर' चित्रपटाने रिलीजच्या आधीच लाखो तिकीटांची विक्री करत कोट्यवधींचा टप्पा गाठला आहे.
Fighter Film Advance Booking
Fighter Film Advance BookingSaam Tv
Published On

Fighter Film Advance Booking

सिद्धार्थ आनंद दिग्दर्शित 'फायटर' (Fighter) चित्रपट येत्या २५ जानेवारीला हा चित्रपट रिलीज होणार आहे. सध्या चित्रपटाची सोशल मीडियावर जोरदार चर्चा होताना दिसत आहे. हृतिक रोशन (Hrithik Roshan) आणि दीपिका पदुकोण (Deepika Padukone) स्टारर चित्रपटाने रिलीजच्या आधीच लाखो तिकीटांची विक्री करत कोट्यवधींचा टप्पा गाठला आहे.

Fighter Film Advance Booking
Hanuman Day 11 Collection: बॉक्स ऑफिसवर ‘हनुमान’चा बोलबाला, चित्रपटाची दुसऱ्या आठवड्यामध्ये यशस्वी घोडदौड

चित्रपटाच्या ॲडव्हान्स बुकिंगला २० जानेवारीपासून सुरुवात झाली आहे. प्रेक्षकांना हा मोस्ट अवेटेड चित्रपट 2D, 3D, IMAX 3D आणि 4DX 3D या पद्धतीने पाहायला मिळणार आहे. प्रजासत्ताक दिनाच्या मुहूर्तावर हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर रिलीज होणार आहे. प्रजासत्ताक दिन आणि त्यानंतर विकेंडलाही या चित्रपटाला प्रेक्षकांकडून दमदार प्रतिसाद मिळण्याची शक्यता आहे.

सॅकनिल्कच्या अहवालानुसार, 'फायटर'चे संपूर्ण देशभरामध्ये ८६९९ शो आहेत. चित्रपटाच्या ॲडव्हान्स बुकिंगला सुरुवात होताच तीन दिवसांत 'फायटर' चित्रपटाने संपूर्ण देशामध्ये १ लाख १४ हजार ३२७ तिकिटांची विक्री केली आहे. चित्रपटाने ॲडव्हान्स बुकिंगमध्ये आतापर्यंत ३.७ कोटी रुपयांचा व्यवसाय केला आहे. 'फायटर' या चित्रपटाची निर्मिती २५० कोटी रुपयांमध्ये करण्यात आली आहे. रिलीजआधीच चित्रपटाने १० ते २० कोटींची कमाई केली आहे. हा ॲडव्हान्स बुकिंगचा आकडा अजून वाढण्याची शक्यता आहे. दीपिका पदुकोण, रणवीर सिंह आणि शाहिद कपूरच्या 'पद्मावत' चित्रपटाने ॲडव्हान्स बुकिंगमध्ये २४ कोटींची कमा केली होती.

Fighter Film Advance Booking
Shilpa Shetty: राम मंदिरात जाऊन शिल्पा शेट्टीने घेतलं दर्शन, पण एका कृत्यामुळे झाली ट्रोल; VIDEO व्हायरल

काही ट्रेड ॲनालिस्टच्या मते, 'फायटर' चित्रपट 'पद्मावत' चित्रपट रेकॉर्ड ब्रेक करू शकतो. प्रजासत्ताक दिनाच्या मुहूर्तावर २५ जानेवारीला चित्रपट थिएटरमध्ये रिलीज होणार आहे. चित्रपटात हृतिक रोशनसोबत दीपिका पदुकोण, अनिल कपूर मुख्य भूमिकेत दिसणार आहे. त्यासोबतच ऋषभ साहनी, अक्षय ओबेरॉय, करण सिंग ग्रोवर, आकर्ष अलग आणि संजीदा शेख ही स्टारकास्ट सुद्धा चित्रपटामध्ये मुख्य भूमिकेत दिसणार आहे. फायटरचे दिग्दर्शन सिद्धार्थ आनंद यांनी केले असून वायकॉम 18 स्टुडिओच्या बॅनरखाली चित्रपटाची निर्मिती केली आहे.

Fighter Film Advance Booking
Mogalmardini Chhatrapati Tararani: आपल्या तलवारीच्या पातीवर दिल्लीच्या पातशहालाही नमवणारी "मोगलमर्दिनी छत्रपती ताराराणी" येतेय, चित्रपटाची रिलीज डेट आली समोर

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com