Bollywood Singer : अरिजीत सिंहनंतर बॉलिवूडचा आणखी एक प्रसिद्ध संगीतकार घेणार Retirement? 'त्या' पोस्टने रंगली चर्चा

Singer Retirement From Commercial Music : अरिजीत सिंहनंतर बॉलिवूडचा आणखी एक सुप्रसिद्ध संगीतकार रिटायरमेंट घेणार असल्याची चर्चा रंगली आहे. गायकाने एक खास पोस्ट शेअर केली आहे.
Singer Retirement From Commercial Music
Bollywood Singersaam tv
Published On
Summary

प्रसिद्ध संगीतकार व्यावसायिक संगीतातून घेणार रिटायरमेंट

सोशल मीडियावर शेअर केलेल्या पोस्टने चर्चेला उधाण

अलिकडेच अरिजीत सिंहने देखील व्यावसायिक संगीतातून निवृत्ती घेतली आहे.

बॉलिवूडचे प्रसिद्ध संगीतकार प्रीतम चक्रवर्ती १४ जून ला वाढदिवस होता. वाढदिवसानिमित्त त्यांनी सोशल मीडियावर एक खास पोस्ट शेअर केली. ज्याने सोशल मीडियावर त्यांच्या निवृत्तीची चर्चा रंगली आहे. गेल्या दोन दशकांहून अधिक काळ हिंदी चित्रपटसृष्टीच्या संगीताला नवी ओळख प्रीतम चक्रवर्ती यांनी दिली आहे. त्यांच्या गाण्याचे, संगीताचे लाखो चाहते दिवाने आहेत. अलिकडेच गायक अरिजीत सिंहने देखील व्यावसायिक संगीतातून निवृत्ती घेतली आहे. प्रीतम चक्रवर्ती यांच्या पोस्टमध्ये नेमकं काय, जाणून घेऊयात.

प्रीतम चक्रवर्ती यांची पोस्ट

"सर्व शुभेच्छांबद्दल धन्यवाद...

प्रत्येकाला वैयक्तिकरित्या उत्तर देऊ शकत नाही, परंतु कृपया माझे प्रामाणिक कृतज्ञता स्वीकारा...

आज, मी स्वत:ला काही वर्षे वेगळ्या पद्धतीने जगण्यासाठी भेट देण्याचा निर्णय घेतला आहे. मी काय गमावले ते पकडण्यासाठी.

एखाद्या अशा नवीन प्रवासाला सुरुवात करण्याची वेळ आली आहे, जो बऱ्याच काळापासून प्रलंबित ठेवला होता.

मेनस्ट्रीम एक उत्तम राइड आहे. पण शोध न केलेल्या रस्त्यांबद्दल मला नेहमीच जास्त उत्सुकता असते.

सर्व प्रेम आणि समर्थनासाठी धन्यवाद... नेहमी..."

संगीतकार प्रीतम चक्रवर्ती आता ५५ वर्षांचे झाले आहेत. रोमँटिक असो वा पार्टी प्रीतम यांचे प्रत्येक गाणे सर्वांच्या ओठांवर असते. त्याने अरिजीत सिंहसोबत असंख्य सुपरहिट गाणी संगीतबद्ध केली आहेत. रश्मिका मंदानाच्या 'कॉकटेल २' ची गाणी देखील प्रीतम यांनी संगीतबद्ध केली आहेत. 'कॉकटेल २' चित्रपट १९ जूनला थिएटरमध्ये रिलीज होणार आहे. प्रीतम चक्रवर्ती यांच्या पोस्टवर चाहते भरभरून कमेंट्स करत आहेत.

संगीतकार प्रीतम चक्रवर्ती यांना अनेक पुरस्कारांनी गौरवण्यात आले आहे. त्यांनी आजवर केसरिया, चन्ना मेरेया, हवाएं, तुम से ही, तू जाने ना, तेरा होने लगा हूँ, शायद, कबीरा, बदतमीज दिल, बलम पिचकारी, दिल्लीवाली गर्लफ्रेंड, सुभा होना ना दे, धूम अगेन, ए दिल है मुश्किल, तुम मिले आणि दिल इबादत अशी अनेक गाणी संगीतबद्ध केली आहेत.

Singer Retirement From Commercial Music
Sanchita Ugale Video : प्रसिद्ध अभिनेत्रीची अकाली एक्झिट; आत्महत्येच्या काही तासाआधीची पोस्ट व्हायरल, आनंदी आयुष्यात अचानक काय झालं?

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com