बॉलिवूडचा (Bollywood) सुपरस्टार रणबीर कपूर (Ranbir Kapoor), रश्मिका मंदान्ना (Rashmika Mandanna) आणि बॉबी देओलचा (Bobey Deol) 'अॅनिमल' (Animal Movie) चित्रपट बॉक्स ऑफिसवर सूसाट आहे. या चित्रपटाला प्रेक्षकांकडून खूप चांगली पसंती मिळत आहे. फक्त बॉक्स ऑफिसच नाही तर जगभरामध्ये हा चित्रपट दमदार कमाई करताना दिसत आहे. या चित्रपटाच्या कमाईचा आकडा दिवसेंदिवस वाढतच चालला आहे. अशामध्ये हा चित्रपट एकापाठोपाठ एक रेकॉर्ड मोडत आहे. ११ दिवसांत या चित्रपटाने ७०० कोटींपार कलेक्शन केले आहे. ('साम टीव्ही'चं व्हॉट्सअॅप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)
'अॅनिमल' चित्रपट इतर चित्रपटांना मागे टाकत चांगली कमाई करताना दिसत आहे. हा चित्रपट भारतामध्ये ५०० कोटींच्या कमाईचा आकडा पार करण्यासाठी अवघे काही आकडे दूर राहिला आहे. येत्या काही दिवसांमध्ये तो इतकी कमाई देखील करेल असा अंदाज आहे. तर वर्ल्डवाइड कलेक्शनमध्ये देखील 'अॅनिमल'ची जादू पाहायला मिळत आहे. वर्ल्डवाइड कलेक्शनमध्ये ७५० कोटीचा आकडा पार करण्यासाठी देखील हा चित्रपट काही अंतर दूर आहे. वर्ल्डवाइड कलेक्शनच्या बाबतीत हा चित्रपट दिवसेंदिवस नवा आश्चर्यकारक आकडा पार करत आहे.
संदीप रेड्डी वंगा यांच्या दिग्दर्शनाखाली तयार करण्यात आलेल्या या चित्रपटाने ११व्या दिवशी एका दिवसांत २०.५२ कोटी रुपयांचे वर्ल्डवाइड कलेक्शन केले आहे. या आकड्यासह या चित्रपटाचे एकूण वर्ल्डवाइड कलेक्शन ७३७.९८ कोटी रुपये इतके झाले आहे. महत्वाचे म्हणजे, १० व्या दिवशी 'अॅनिमल'ने 'गदर २ चा रेकॉर्ड मोडला. ७१७.४६ कोटींची कमाई करून या चित्रपटाने सनी देओलच्या 'गदर २' चित्रपटाचा जगभरातील विक्रम मोडला. 'गदर २' ने ६८५ कोटींची कमाई केली होती.
आता 'अॅनिमल' चित्रपट आमिर खानच्या 'पीके'चा रेकॉर्ड तोडण्यापासून अवघे काही अतंर दूर आहे. पीके चित्रपटाचे वर्ल्डवाइड कलेक्शन ७६९ कोटी रुपये इतके होते. आता हा चित्रपट पीकेचा रेकॉर्ड मोडेल का हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे. या चित्रपटामध्ये मुख्य भूमिकेत रणबीर कपूरसह, रश्मिका मंदान्ना, बॉबी देओल आणि अनिल कपूर आहेत. सर्वच कलाकारांच्या अभिनयाने आणि लूकने प्रेक्षकांचे मन जिंकले आहे. चित्रपटाची निर्मिती जवळपास १०० कोटींमध्ये झालेली असून पहिल्या दोन दिवसांच्या कमाईतूनच निर्मितीचा खर्च वसूल झाला आहे.
- पहिला दिवस- ११६ कोटी
- दुसऱ्या दिवशी - २३६ कोटी
- तिसरा दिवस- ३५६ कोटी
- चौथा दिवस- ४२५ कोटी
- पाचव्या दिवशी- ४८१ कोटी
- सहावा दिवस - ५२७.६ कोटी
- सातवा दिवस- ५६३.३ कोटी
- आठवा दिवस - ६००.६७ कोटी
- नववा दिवस -६६०.८९ कोटी
- दहावा दिवस - ७१७.४६ कोटी
सकाळ+चे सदस्य व्हा
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.