'कारगिल विजय दिवस' ही भारताच्या इतिहासातील महत्त्वाची घटना आहे. 26 जुलै 1999 च्या कारगिल युद्धात भारताने पाकिस्तानवर विजय मिळवला. हाच ऐतिहासिक दिवस म्हणून संपूर्ण देशात 'कारगिल विजय दिवस' म्हणून साजरा होतो. याच युद्धावर अनेक सिनेमे बनवले गेले. बॉलीवूडने अनेक आकर्षक चित्रपट आणि अनेक ओटीटी मालिकांमधून या नायकांना श्रद्धांजली वाहिली आहे. आपल्या भारतीय जवानांची शौर्यगाथा सांगणारे हे कोणते सिनेमे आणि वेबसिरिज आहेत ?, जाणून घ्या.
1.LOC कारगिल :
LOC कारगिल या सिनेमाचे तपशीलवार नाट्यमय असले तरी युद्धाचा लेखाजोखा आणि सैन्याच्या कारवायांचा समावेश आहे. विशेष म्हणजे आतापर्यंतचा सर्वात मोठा म्हणजे चार तासांपेक्षा अधिक कालावधीचा हा सिनेमा आहे. हा चित्रपट भारताच्या लष्करी इतिहासातील एका महत्त्वपूर्ण घटनेचे वर्णन करतो. LOC कारगिल 2003 मध्ये प्रदर्शित झाला आहे. संजय दत्त, अजय देवगण, सैफ अली खान, सुनील शेट्टी आणि अभिषेक बच्चन यांचा कास्टमध्ये समावेश आहे. भारतीय लष्कराच्या यशस्वी ‘ऑपरेशन विजय’वर आधारित आहे.
संजय कपूर, मनोज बाजपेयी आणि अक्षय खन्ना यांनीही भूमिका साकारलेल्या आहेत. कारगिलच्या युद्धावर आधारित हा एक उल्लेखनीय सिनेमा आहे.
2. धूप :
2003 मध्ये आलेला धूप हा सिनेमा अश्विनी चौधरी यांनी दिग्दर्शित केला आहे. या चित्रपटात ओम पुरी, यशपाल शर्मा आणि गुल पनाग यांनी मुख्य भूमिका साकारली आहे.
कारगिल युद्धादरम्यान शहीद झालेल्या कॅप्टन अनुज नय्यर यांच्या जीवनावर कथा आधारित आहे. कपूर कुटुंबाचा मुलगा रोहित आणि त्याच्या बलिदानाला मान्यता आणि सन्मान मिळावा यासाठी त्यांनी केलेल्या लढ्यासाठी ते झगडत असतात. हा सिनेमा म्हणावे तसे व्यावसायिक यश मिळवू शकला नाही. मात्र, संवदेनशील चित्रण, लिखाण आणि उल्लेखनीय अभिनय यासाठी समीक्षकांनी भरभरुन सिनेमाला प्रेम दिले.
3. लक्ष्य :
2004 मध्ये प्रदर्शित झालेल्या लक्ष्य या सिनेमाचे दिग्दर्शन फरहान अख्तर यांनी केले आहे. कारगिल युद्धाच्या पार्श्वभूमीवर आधारित एक नवीन युगाची कथा यामध्ये पाहायला मिळते. या चित्रपटात हृतिक रोशन, अमिताभ बच्चन आणि प्रिती झिंटा मुख्य भूमिकेत आहेत. करण शेरगिलची भूमिका हृतिक रोशनने साकारली आहे. सुरुवातीला लहरीपणाने भारतीय सैन्यात तो भरती होतो. लष्करी जीवनातील कठोरतेशी तो संघर्ष करतो. आणि करणला शेवटी त्याचा उद्देश सापडतो. यातूनच तो एक जबाबदार नेता बनतो. रिलीज झाल्यानंतरही अनेक वर्षांनी आजही प्रेक्षकांच्या मनात हा सिनेमा घर करुन आहे.
4. टँगो चार्ली :
2005 मध्ये टँगो चार्ली प्रदर्शित झाला आणि त्याचे दिग्दर्शन मणिशंकर यांनी केले. या चित्रपटात बॉबी देओल, अजय देवगण, संजय दत्त, सुनील शेट्टी, नंदना सेन आणि तनिषा देखील ही कास्ट झळकली. तरुण चौहान यांची भूमिका बॉबी देओलने साकारली. कारगिल युद्धाच्या लढाईचे गौरव करणाऱ्या अनेक युद्ध चित्रपटांप्रमाणे, टँगो चार्ली सैनिकांच्या कठोर जीवनाचे वर्णन करतो. यात आघात, नुकसान, सौहार्द आणि हिंसेचा सामना करताना माणुसकी टिकवून ठेवण्यासाठी कसा संघर्ष असतो याचं वर्णन करण्यात आले आहे. सैनिकांचे जीवन आणि त्यांनी देशासाठी केलेले बलिदान यावर विचार करायला लावणारा, आत्मपरीक्षण करायला भाग पाडणारा सिनेमा आहे.
5. गुंजन सक्सेना: कारगिल गर्ल
2020 मध्ये 'गुंजन सक्सेना: द कारगिल गर्ल' सिनेमा प्रेक्षकांच्या भेटीला आला. या चित्रपटातआयएएफची महिला पायलट गुंजन सक्सेना यांच्या जीवनाचे चित्रण करण्यात आले आहे.
चित्रपटामध्ये गुंजनची भूमिका जान्हवी कपूरने साकारली. तर तिच्या वडिलांची भूमिका पंकज त्रिपाठी यांनी साकारली. गुंजन सक्सेना युद्ध लढणाऱ्या पहिल्या भारतीय महिला वायुसेना पायलट बनल्या. भारताला विजय मिळवून देण्यात त्यांनी प्रमुख भूमिका बजावली. या चित्रपटात जान्हवी कपूर, अंगद बेदी , पंकज त्रिपाठी मुख्य भूमिकेत दिसले. हा चित्रपट पुरुषप्रधान असलेल्या क्षेत्रात आव्हानांना तोंड देत कुशल पायलट बनण्याचे स्वप्न असलेल्या एका तरुण मुलीच्या प्रवासाचं कथन करतो.
6. शेरशाह
2021 मध्ये शेरशाह रिलिज धाला. ही कथा कारगिलमध्ये शहीद झालेल्या कॅप्टन विक्रम बत्रा यांच्या बायोपिकवर आधारित आहे. कॅप्टन विक्रम बत्राच्या भूमिकेत सिद्धार्थ मल्होत्रा झळकला. पाकिस्तानच्या सैनिकांना पळून जाण्यास कॅप्टन विक्रम बत्रा यांनी भाग पाडलं आणि ते नेमकं कसे? ते सिनेमात पाहायला मिळते. या चित्रपटात सिद्धार्थ मल्होत्रा आणि कियारा अडवाणी मुख्य भूमिकेत झळकले आहेत. कारगिल युद्धाच्या अस्सल चित्रणासाठी शेरशाहला समीक्षकांची प्रशंसा मिळाली. ॲक्शन सीक्वेन्स उत्तमरित्या साकारले गेले असून खूप भावनिक आहेत.
7. जीत की जिद :
विशाल मंगलोरकर यांनी जीत की जिद याचं दिग्दर्शिन केले आहे आणि 2021 मध्ये सात भागांची ही मालिका रिलिज झाली. स्पेशल फोर्स ऑफिसर मेजर दीपेंद्र सिंग सेंगर यांच्या सत्यकथेवरून ही सिरिज प्रेरित आहे. हा चित्रपट वेगवेगळ्या टाइमलाइनमध्ये पसरलेला आहे. ज्यामध्ये त्याचे स्पेशल फोर्सेसचे कठोर प्रशिक्षण, अनेक लढाऊ मोहिमांमध्ये त्याचा असलेला सहभाग आणि कारगिल युद्धादरम्यान त्याला झालेल्या जीवनात बदल घडवणाऱ्या दुखापतींचे प्रदर्शन करण्यात आले आहे. अमित साधने मेजर दीप सिंग म्हणून एक शक्तिशाली कामगिरी बजावली आहे.
सकाळ+चे सदस्य व्हा
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.