Joe Biden on Israel-Hamas War : इस्राइल-हमास युद्धादरम्यान जो बायडन यांचं मोठं वक्तव्य, इस्राइलचं टेन्शन वाढलं

Joe Biden News : पॅलेस्टिनी राज्याचा मार्गही मोकळा झाला पाहिजे, असंही बायडन यांनी म्हटलं.
joe Biden
joe Biden Saam Tv
Published On

Israel-Hamas War :

अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष जो बायडन यांनी इस्रायल आणि हमास यांच्यात सुरू असलेल्या युद्धादरम्यान मोठं वक्तव्य केले आहे. इस्रायलने गाझा पुन्हा ताब्यात घेणे ही मोठी चूक ठरेल, असा इशारा बायडन यांनी दिला आहे. बायडन यांच्या वक्तव्यानंतर इस्राइलची देखील चिंता वाढली आहे. हमासला पूर्णपणे संपवणे आवश्यक आहे. पॅलेस्टिनी राज्याचा मार्गही मोकळा झाला पाहिजे, असंही बायडन यांनी म्हटलं.

जो बायडन यांनी एका मुलाखतीत म्हटलं की, इस्रायलने गाझावर पुन्हा ताबा मिळवला तर ही मोठी चूक असेल. गाझामध्ये जे घडते त्याला हमास आणि हमासचे अतिरेकी जबाबदार आहेत. सर्व पॅलेस्टिनींना यासाठी जबाबदार धरणे योग्य नाही. त्यामुळे मला वाटते की गाझा परत घेणे इस्रायलसाठी चूक होईल. याआधी 1967 च्या मध्यपूर्व युद्धात इस्रायलने वेस्ट बँक, गाझा आणि पूर्व जेरुसलेमवर कब्जा केला होता. (Latest Marathi News)

joe Biden
Israel-Palestine War : युद्धाची भारतीयांना झळ, टीव्ही फ्रिजसह जीवनावश्यक वस्तू महागणार

हजारो लोकांना मृत्यू होऊ शकतो

हमासच्या हल्ल्यानंतर इस्राइलने गाझा येथील वीज आणि अन्नपुरवठा बंद केला आहे. त्यामुळे गाझाच्या लाखो नागरिकांना अन्न, पाणी आणि सुरक्षिततेसाठी भयंकर सामना करावा लागत आहे. गाझामधील डॉक्टरांनी रविवारी इशारा दिला की, रुग्णालयांमध्ये अनेक जखमी लोक आहे. त्यामुळे रुग्णालयांमध्ये मूलभूत गोष्टींचा पुरवठा संपल्यास हजारो लोकांचा मृत्यू होऊ शकतो.

joe Biden
Israel-Hamas War: इस्राइलकडून गाझापट्टीत एअर स्ट्राईक; २४ तासात ३२४ पॅलेस्टाईन नागरिक ठार

4000 हून अधिक मृत्यू

हमासन 7 ऑक्टोबरला इस्राइलवर मोठा रॉकेट हल्ला केला. यात 1,400 हून अधिक इस्रायली नागरिकांचा मृत्यू झाला. तर हमासने काही इस्रायली नागरिकांना ओलीस देखील ठेवलं आहे. तर इस्राइलने केलेल्या हल्ल्यात 10 दिवसांत 2670 लोकांचा मृत्यू झाला आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com