Fukrey 3 Song Mashoor Released: 'फुकरे ३'चं दुसरं गाणं रिलीज, 'मशहूर' गाण्याला मिळतेय पसंती

Fukrey 3 Mashoor Song Out: 'फुकरे ३' चित्रपटातील 'वे फुकरे' हे पहिलं गाणं काही दिवसांपूर्वी प्रदर्शित झालं होतं. या गाण्यापाठोपाठ आज दुसरं गाणं 'मशहूर' प्रदर्शित करण्यात आले आहे.
Fukrey 3 Mashoor Song Out
Fukrey 3 Mashoor Song OutSaam Tv
Published On

Fukrey 3 Movie:

कॉमेडी चित्रपट 'फुकरे ३'ची (fukrey 3 Movie) प्रेक्षक आतुरतेने वाट पाहत आहे. फुकरे फ्रँचायझीचा हा कॉमेडी ड्रामा चित्रपट आतापर्यंत प्रेक्षकांचे मनोरंजन करत आला आहे. या चित्रपटाचा तिसरा भाग म्हणजेच 'फुकरे ३' लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. 'फुकरे ३' चित्रपटातील 'वे फुकरे' हे पहिलं गाणं काही दिवसांपूर्वी प्रदर्शित झालं होतं. या गाण्यापाठोपाठ आज दुसरं गाणं 'मशहूर' प्रदर्शित करण्यात आले आहे.

Fukrey 3 Mashoor Song Out
Jilbi Movie Announcement: ‘वडापाव’नंतर प्रसाद ओक बनवणार ‘जिलबी’, ‘या’ तारखेपासून घेता येणार आस्वाद

नुकताच प्रदर्शित झालेल्या 'फुकरे- 3' च्या मशहूर या गाण्यात हनी आणि चुचा गँग प्रसिद्ध होण्यासाठी भोली पंजाबनशी भांडताना दिसत आहेत. यावेळी या चित्रपटाची कथा निवडणुकीवर आधारित असणार आहे. म्हणजेच आता लढा असेल सत्ता मिळवण्यासाठी नेता होण्यासाठी. फुकरे प्रसिद्ध गाण्यातही तेच करताना दिसत आहे. या गाण्यामध्ये दिसत आहे की, एकीकडे भोली पंजाबन तिच्या टीमसोबत या प्रसिद्ध गाण्याचे प्रमोशन करत आहे. तर दुसरीकडे चुचा आणि हनीही कोणतीही कसर सोडत नाहीत.

Fukrey 3 Mashoor Song Out
SRK Share Ritesh Kamble Video: मराठी मुलाच्या अ‍ॅक्टिंगची किंग खानला भूरळ, VIDEO शेअर करत म्हणाला - 'I Love You'

मात्र एकमेकांना पाहिल्यानंतर त्यांचा मूड खराब होतो. हनी, भोली पंजाबन, चुचा, लाली आणि पंडितजी सारखी मनोरंजक पात्रे फुकरे 3 मध्ये पुन्हा एकदा दिसणार आहेत. चित्रपटातील ही मजेदार पात्रे तुम्हाला रोलर कोस्टर राईडवर घेऊन जातील. आता हा चित्रपट मनोरंजन करू शकेल की नाही हे प्रदर्शित झाल्यानंतरच कळेल. फुकरे चित्रपट त्याच्या जबरदस्त पात्रांसाठी तसेच प्रभावी गाण्यांसाठी ओळखला जातो. या चित्रपटाने 'अंबर सरिया', 'बेडा पार' आणि 'करले जुगाड करले'सह अनेक सुपरहिट गाणी दिली आहेत. आता 'फुकरे ३' चित्रपटाबाबतही चाहते अशीच अपेक्षा करत आहेत. या चित्रपटातील गाणी देखील जबरदस्त असतील अशा आशा चाहते व्यक्त करत आहेत.

'फुकरे ३' च्या स्टार कास्टबद्दल सांगायचे झाले तर, या चित्रपटात पुलकित सम्राट, वरुण शर्मा, मनजोत सिंग, रिचा चढ्ढा आणि पंकज त्रिपाठी हे मुख्यू भूमिकेत आहेत. याशिवाय अली फजल देखील या चित्रपटात दिसणार आहे. पण अद्याप त्याच्याबद्दल कोणतेही अपडेट शेअर करण्यात आलेले नाही. फुकरे चित्रपटाच्या आधीच्या दोन भागांमध्ये अलीने महत्वाची भूमिका साकारली होती. आता या चित्रपटाच्या तिसऱ्या भागामध्ये अली सरप्राईज देऊन परत येणार का हे चित्रपट प्रदर्शित झाल्यानंतरच कळेल. फुकरे ३ चित्रपटाचे दिग्दर्शन मृहदीप सिंग लांबा यांनी केले आहे. हा चित्रपट येत्या २८ तारखेला प्रदर्शित होणार आहे.

Fukrey 3 Mashoor Song Out
Elvish Yadav On 25 Lakh Prize Money: काय सांगता... ‘बिग बॉस ओटीटी २’च्या विजेत्याला प्राईज मनी मिळाली नाही?, स्वत: एल्विश यादवनेच केला खुलासा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com