सोशल मीडिया एन्फ्लूएंसर आणि युट्यूब ब्लॉगर एल्विश यादव ‘बिग बॉस ओटीटी २’चा विजेता ठरला. बिग बॉसच्या दुसऱ्या सीझनचा विजेता ठरल्यापासून त्याची चाहत्यांमध्ये क्रेझ कायम आहे. सोशल मीडियावर त्याच्या चाहत्यांमध्ये चांगलीच वाढ सुद्धा झाली आहे. ‘बिग बॉस ओटीटी २’च्या विजेत्याची ट्रॉफी जिंकल्यानंतर वाईल्ड कार्ड स्पर्धक म्हणून त्याची प्रचंड चर्चा होऊ लागली.
नुकतंच त्याचं युट्यूबवर ‘हम तो दिवाने’ हे गाणं प्रदर्शित झालं आहे. त्याच्या गाण्याची फक्त चाहत्यांमध्येच नाही तर, अनेक सेलिब्रिटींमध्येही चर्चा होत आहे. एल्विशने शहनाज गिलच्या युट्यूब चॅनलला नुकतीच एक मुलाखत दिली. यावेळी त्याने मुलाखतीत बिग बॉसमध्ये प्राईज मनी मिळाली नसल्याचं सांगितलं आहे.
अलीकडेच एल्विश यादवने ‘बिग बॉस १३’ फेम शहनाज गिलच्या चॅट शो देसी वाईब्समध्ये हजेरी लावली होती. यावेळी एल्विश यादवने एक धक्कादायक खुलासा केला आहे. खुलासा करताना तो म्हणाला की, “ज्यावेळी मी विजेतेपदाच्या शर्यतीत होतो, तेव्हा मला वाटायचं की, वाईल्ड कार्ड स्पर्धकाला विजेतेपद देणार नाहीत, असा नियम असेल. ज्यावेळी मला एन्ट्री मिळाली, तेव्हा मी शंभर वेळा विचारलं, नक्की हे वोट्सच आहेत ना?, मला आशा आहे की असा काही नियम नसेल की, वाईल्ड कार्ड स्पर्धकाला मतं मिळूनही तो जिंकू शकणार नाही. त्यावेळी मला वोट मिळाले तर, वाईल्ड कार्डही जिंकशील, असं सांगितलं होतं.”
सोबतच यावेळी मुलाखतीमध्ये शहनाजने एल्विशला तिसरा मोबाईल कधी घेणार? असा प्रश्न विचारला होता. यावर एल्विश म्हणाला की, “माझ्याकडे आधीपासूनच तीन मोबाईल आहेत. लवकरच ‘बिग बॉस ओटीटी २’च्या जेतेपदाचे २५ लाख मिळाले की मी चौथाही फोन घेणार आहे.” यावर शहनाजने “हे तर चुकीचे आहे. ” अशी प्रतिक्रिया दिली आहे.
बिग बॉसच्या इतिहासात पहिल्यांदाच एका वाईल्ड कार्ड स्पर्धकाने बिग बॉसची ट्रॉफी जिंकली आहे. फिनाले एपिसोडमध्ये त्याने, १५ मिनिटांत २८ कोटी व्होट्स मिळाल्याचे सांगितले. बिग बॉसची ट्रॉफी एल्विश जिंकेल याची कोणालाच शाश्वती नव्हती. एल्विशनंतर अभिषेक मल्हानहा फर्स्ट रनर अप स्पर्धक ठरला होता. तर मनीषा राणी, पूजा भट्ट आणि बाबिका धुर्वे हे स्पर्धकही ‘बिग बॉस ओटीटी २’मधील टॉप ५ स्पर्धकांमध्ये होते.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.