Jamal Kudu: सलमान खानने धर्मेंद्र यांच्यासोबत 'जमाल कुडू' गाण्यावर केला भन्नाट डान्स, कोणाला जमली बॉबी देओलची परफेक्ट स्टाइल?

Salman And Dharmendra Dance On Jamal Kudu Song: सलमान खानने बॉबी देओलचे वडील धर्मेंद्र यांच्यासोबत या गाण्यावर जबरदस्त डान्स केला. यावेळी सलमानसोबत मिका सिंग, अरबाज खान आणि सोहेल खान यांनी देखील बॉबी देओलची ही स्टेप करण्याचा प्रयत्न केला.
Salman  And Dharmendra Dance On Jamal Kudu Song:
Salman And Dharmendra Dance On Jamal Kudu Song: Saam Tv
Published On

Bigg Boss 17:

बॉलिवूड सुपरस्टार रणबीर कपूर (Ranbir Kapoor), बॉबी देओल, अनिल कपूर आणि रश्मिका मंदान्ना (Rashmika MAndana) स्टारर 'ॲनिमल' चित्रपट यावर्षातला सुपरहिट चित्रपट ठरला. हा चित्रपट बॉक्स ऑफिससोबत जगभरात धुमाकूळ घालत दमदार कमाई करत आहे. या चित्रपटातील बॉबी देओलचे 'जमाल कुडू' हे गाणं (Jamal Kudu Song) खूपच चर्चेत राहिले. बॉबी देओलच्या या एन्ट्री साँगने सध्या सर्वांना वेड लावले असून सोशल मीडियावर सेलिब्रिटींपासून ते सर्वसामान्यांपर्यंत सर्वजण रील्स तयार करताना दिसत आहेत.

नुकताच सलमान खानने बॉबी देओलचे वडील धर्मेंद्र यांच्यासोबत या गाण्यावर जबरदस्त डान्स केला. यावेळी सलमानसोबत मिका सिंग, अरबाज खान आणि सोहेल खान यांनी देखील बॉबी देओलची ही स्टेप करण्याचा प्रयत्न केला. बिग बॉस 17 च्या स्टेजवर या सेलिब्रिटींचा धम्माल करतानाचा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे.

बिग बॉस 17 च्या नव्या एपिसोडमध्ये नवीन वर्षाचे सेलिब्रेशन केले जाणार आहे. ज्यामध्ये 'वीकेंड का वार' मध्ये सलमान खानसोबत धर्मेंद्र, मिका सिंग आणि सलमान खानचा भाऊ सोहेल खान आणि अरबाज खान देखील उपस्थित राहिला आहे. शोच्या निर्मात्यांनी त्यांच्या सोशल मीडिया हँडलवर याचा एक प्रोमो व्हिडिओ शेअर केला आहे. ज्यामध्ये सलमान खानसोबत धर्मेंद्र हे बॉबी देओलच्या 'ॲनिमल' चित्रपटातील 'जमाल कुडू' या व्हायरल गाण्याची स्टेप ट्राय करताना दिसत आहेत. व्हिडिओमध्ये कृष्णा अभिषेकही अमिताभ बच्चन यांची नक्कल करत स्टेजवर सर्वांना हसवतो. 'जमाल कुडू' या गाण्यावर डान्स करत असताना धर्मेंद्र यांनी डोक्यावर नाही तर तोंडाने ग्लास धरून डान्स करण्याचा प्रयत्न केला.

व्हिडीओमध्ये दिसत आहे की, धर्मेंद्र यांच्यासोबत सलमान, अरबाज, सोहेल आणि मिका ग्लाससोबत जमाल कुडू गाण्यावर डान्स स्टेप करत आहेत. गाणं सुरू होताच धर्मेंद्र आधी काचेचे ग्लास तळहातावर ठेवून आणि नंतर तोंडामध्ये धरून डान्स करण्याचा प्रयत्न करतात. त्याचवेळी सलमानही डोक्यावर काचेचे ग्लॅस ठेवत बॉबी देओलच्या स्टाइलने डान्स करण्याचा प्रयत्न करतो. पण डान्स करता करता त्याच्या डोक्यावरील ग्लास खाली पडते. सोहेल, अरबाज आणि मिका सिंग देखील याच स्टाइलमध्ये डान्स करण्याचा प्रयत्न करतात. अशापद्धतीने या सर्व सेलिब्रिटींनी जमाल कुडू गाण्यावर डान्स करत धम्माल केली. या व्हिडीओमध्ये कृष्णा गंमतीत म्हणतो की, 'पंजाबींना रिकामा ग्लास कोण देतो?' आणि सर्वजण हसू लागतात.

Salman  And Dharmendra Dance On Jamal Kudu Song:
Aryan Arora: बॉलिवूड अभिनेत्यावर केअर टेकरने केला जीवघेणा हल्ला, रुग्णालयात उपचार सुरू; काय आहे प्रकरण?

दरम्यान, 'बिग बॉस 17' चा हा प्रोमो सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे. भरपूर जोक्स आणि मस्तींनी भरलेला बिग बॉसचा हा एपिसोड पाहण्यासाठी चाहतेही खूप उत्सुक आहेत. याआधीच्या बिग बॉसच्या एपिसोडमध्ये सलमान खान वीकेंड का वारमध्ये आयशा आणि मुनव्वरला फटकारताना दिसला होता. त्यानंतर शोमध्ये आएशा बेशुद्ध पडली आणि तिला रुग्णालयात दाखल करण्यात आले. नियमित तपासणीनंतर तिला घरी पाठवण्यात आले आहे. आएशाला चक्कर आल्याामुळे घरामध्ये एकच गोंधळ उडाला होता.

Salman  And Dharmendra Dance On Jamal Kudu Song:
Bhavani Shankar: प्रसिद्ध तबलावादक भवानी शंकर याचं हृदयविकाराच्या तीव्र झटक्याने निधन

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com