Sajani Shinde Ka Viral Video Trailer: 'सजनी शिंदे का व्हायरल व्हिडिओ'चा ट्रेलर आऊट, सुबोध भावे आणि चिन्मय मांडलेकरनेच खाल्ला जास्त भाव

Sajani Shinde Ka Viral Video Movie: या चित्रपटाच्या ट्रेलरमध्ये सुबोध भावे आणि चिन्मय मांडलेकरच्या भूमिकांनीच जास्त भाव खाल्ला. सध्या या दोघांचीच जास्त चर्चा होत आहे.
Sajani Shinde Ka Viral Video Trailer
Sajani Shinde Ka Viral Video TrailerSaam TV

Bollywood Actress Bhagyashree Movie:

बॉलिवूड अभिनेत्री भाग्यश्री (Actress Bhagyashree) लवकरच एका नव्या चित्रपटाच्या माध्यमातून प्रेक्षकांच्या भेटीला येण्यासाठी सज्ज झाली आहे. भाग्यश्रीची मुख्य भूमिकेत असलेला 'सजनी शिंदे का व्हायरल व्हिडिओ' (Sajani Shinde Ka Viral Video Movie) हा चित्रपट येत्या २७ ऑक्टोबरला प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. या चित्रपटाबाबत भाग्यश्रीचे चाहते खूपच उत्सुक आहेत. नुकताच या चित्रपटाचा ट्रेलर रिलीज झाला असून त्याने सर्वांचे लक्ष वेधून घेतलं आहे.

Sajani Shinde Ka Viral Video Trailer
Bhairavi Vaidya Passes Away: 'ताल' फेम अभिनेत्रीचं निधन, सलमान खान आणि ऐश्वर्या रायसोबत केलं होतं काम

या चित्रपटामध्ये भाग्यश्रीसोबत बऱ्याच मराठी कलाकारांनी काम केले आहे. भाग्यश्रीसोबत राधिका मदान आणि निम्रत कौर हे देखील मुख्य भूमिकेत आहेत. त्याचसोबत मराठमोळा अभिनेता सुबोध भावे आणि चिन्मय मांडलेकरने देखील या चित्रपटात दमदार भूमिका साकारल्या आहेत. या चित्रपटाचा ट्रेलर नुकताच रिलीज झाला. या ट्रेलरमध्ये सुबोध भावे आणि चिन्मय मांडलेकरच्या भूमिकांनीच जास्त भाव खाल्ला. सध्या या दोघांचीच जास्त चर्चा होत आहे.

'सजनी शिंदे का व्हायरल व्हिडिओ'चा १ मिनिट ३८ सेकंदाचा ट्रेलर अतिशय रोमांचक आणि अनोखा आहे. ट्रेलरमध्ये सजनी शिंदे उर्फ ​​अभिनेत्री राधिका मदन कशी आणि का गायब झाली, तिच्या बेपत्ता होण्यास जबाबदार कोण? तो तुम्हाला अंदाज लावत राहतो. एकूणच या चित्रपटाचा ट्रेलर लोकांमध्ये आतापासूनच चर्चेचा विषय बनला आहे. सध्या सोशल मीडियावर या ट्रेलरची चर्चा होत आहे.

Sajani Shinde Ka Viral Video Trailer
Aarya 3 Trailer Released: 'कधी कधी मुलांचे रक्षण करण्यासाठी आईला राक्षस बनावे लागते', 'आर्या ३'चा थरारक ट्रेलर पाहिलात का?

भाग्यश्री 'सजिनी शिंदे का व्हायरल व्हिडिओ' या चित्रपटात मुख्य भूमिकेत दिसणार आहे. या चित्रपटात तिच्यासोबत अभिनेता सुबोध भावे स्क्रिन शेअर करत आहे. त्यामुळे चाहत्यांमध्ये उत्सुकता वाढली आहे. या चित्रपटामध्ये राधिका मदन ही शिक्षिका दाखवण्यात आली आहे. राधिका अचानक गायब होते. राधिका नेमकी गेली कुठं?, तिने टोकाचे पाऊल उचलले तर नाही ना?, ती जिवंत आहे की नाही?, तिची हत्या तर झाली नाही ना?, पोलिस अधिकारी झालेल्या निम्रत कौरला या प्रकरणाचा छडा लावता येतो का? या सर्व प्रश्नांची उत्तरं हा चित्रपट प्रदर्शित झाल्यानंतरच मिळतील.

दरम्यान, 'सजिनी शिंदे का व्हायरल व्हिडिओ' दिनेश विजान यांनी या चित्रपटाची निर्मिती केली आहे. त्यांनी 'स्त्री', 'भेडिया' आणि 'बदलापूर' यांसारख्या चित्रपटांची निर्मिती केली आहे. 'सजिनी शिंदे का व्हायरल व्हिडिओ' या चित्रपटाचे दिग्दर्शन निखिल मुसळे यांनी केले आहे. हा चित्रपट येत्या २७ ऑक्टोबर रोजी प्रदर्शित होणार आहे.

Sajani Shinde Ka Viral Video Trailer
Tharla Tar Mag TRP: 'ठरलं तर मग'ची TRP मध्ये रेकॉर्डब्रेक कामगिरी: जुई गडकरीसह मालिकेच्या टीमचा जल्लोष

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com