Rakhi Sawant JCB Video: ...अन् JCB वर चढून डान्स करू लागली राखी सावंत, 'ड्रामा क्वीन'चा VIDEO होतोय व्हायरल

Actress Rakhi Sawant: राखी सावंतचा असा व्हिडीओ व्हायरल होत आहे जो पाहून तुम्ही पोट धरून हसल्याशिवाय राहणार नाही.
Rakhi Sawant JCB Video
Rakhi Sawant JCB VideoSaam Tv
Published On

Rakhi Sawant Dance On JCB:

बॉलिवूडची (Bollywood) 'ड्रामा क्वीन' राखी सावंत (Rakhi Sawant)या नाही तर त्या कारणांमुळे नेहमी चर्चेत राहते. राखी सावंतचे व्हिडीओ आणि फोटो नेहमी व्हायरल होत असतात. लाइमलाइटमध्ये राहण्यासाठी राखी सावंत काहीही करते. सध्या राखी सावंतचा असा व्हिडीओ व्हायरल होत आहे जो पाहून तुम्ही पोट धरून हसल्याशिवाय राहणार नाही.

Rakhi Sawant JCB Video
Shivrayancha Chhava Announcement: 'सुभेदार'नंतर 'शिवरायांचा छावा' लवकरच येणार भेटीला, दिग्पाल लांजेकरांचा नवा चित्रपट 'या' तारखेला होणार प्रदर्शित

राखी सावंतला आतापर्यंत तुम्ही महागड्या कारमधून प्रवास करताना पाहिले आहे. पण यावेळी चक्क राखी सावंतने जेसीबीमधून प्रवास करत त्यावर उभं राहून डान्स केला आहे. ड्रामा क्वीनचा हा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे. जेसीबीच्या पुढे बँडबाजा वाजत आहे आणि राखी सावंतसोबत एक व्यक्ती जेसीबीवर उभं राहून डान्स करताना दिसत आहे.

Rakhi Sawant JCB Video
Parineeti Chopra Dupatta Photo: परिणीतीच्या लेहेंग्यावरील ओढणीवर लिहिला होता 'हा' खास शब्द, तुम्ही पाहिला का?

व्हायरल होणाऱ्या व्हिडीओमध्ये दिसत आहे की, राखी सावंत जेसीबीच्या पुढच्या भागामध्ये उभी आहे. तिने निळ्या रंगाचा कुर्ता आणि त्यावर पांढऱ्या रंगाची श्रग परिधान केली आहे. या ड्रेसिंगवर राखीने काळ्या रंगाचे शूज कॅरी केले आहेत. रस्त्यावरून हा जेसीबी चालत असून समोर बँडबाजावाले दिसत आहेत. राखी सावंतचा हा ड्रामा पाहून रस्त्यावरून जाणारे नागरिक देखील हसताना दिसत आहेत.

दरम्यान, राखी सावंतचे याआधी देखील अनेक व्हिडीओ व्हायरल झाले आहेत. राखी सावंत असे व्हिडीओ तयार करत असते ज्याची चर्चा होतेच. यापूर्वी राखी सावंतने आदिलच्या नावावर व्हिडीओ तयार केला होता. ज्यामध्ये ती 'ऊ लाला ऊ लाला…' गाणं गात आदिलवर निशाणा साधताना दिसली होती. राखी सावंतचे मुंबईतील रस्त्यावर ड्रामा करतानाचे अनेक व्हिडीओ याआधी व्हायरल झाले आहेत. महत्वाचे म्हणजे चाहत्यांना तिचे हे व्हिडीओ खूपच आवडतात. पापाराझी देखील राखी सावंतला आपल्या कॅमेऱ्यामध्ये कैद करायला मागे हटत नाहीत.

Rakhi Sawant JCB Video
Prathamesh Laghate Video: प्रथमेश लघाटेने बाप्पासाठी बनवला खास नैवेद्य; सोशल मीडियावर होतंय कौतुक

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com