Arbaaz Khan: दुसऱ्या लग्नानंतर अरबाज खानचे सिनेसृष्टीत कमबॅक, साऊथच्या 'या' सुपरस्टारसोबत करणार स्किन शेअर

Arbaaz Khan Comeback In Film Industry: दुसऱ्या लग्नानंतर अरबाज खान पुन्हा एकदा मोठ्या पडद्यावर कमबॅक करणार आहे. समोर आलेल्या वृत्तांवर विश्वास ठेवला तर, अरबाज खान अश्विन बाबूच्या आगामी अनटाइटल्ड चित्रपटात दिसणार आहे.
Arbaaz Khan
Arbaaz Khan Saam Tv
Published On

Arbaaz Khan Upcoming Movie:

बॉलिवूड (Bollywood) अभिनेता अरबाज खान (Arbaaz Khan) सध्या दुसऱ्या लग्नामुळे चांगलाच चर्चेत आहे. अरबाज खानने 24 डिसेंबर 2023 ला गर्लफ्रेंड शूरा खानशी दुसरे लग्न केले. सोशल मीडियावर सतत अरबाज खान आणि त्याची पत्नी शूरा खानचे फोटो आणि व्हिडीओ व्हायरल होत असतात. अरबाज खान हा गेल्या अनेक वर्षांपासून मोठ्या पडद्यापासून दूर आहे.

पण आता दुसऱ्या लग्नानंतर अरबाज खान पुन्हा एकदा मोठ्या पडद्यावर कमबॅक करणार आहे. समोर आलेल्या वृत्तांवर विश्वास ठेवला तर, अरबाज खान अश्विन बाबूच्या आगामी अनटाइटल्ड चित्रपटात दिसणार आहे. या चित्रपटात अरबाज खान महत्वाच्या भूमिकेत असणार असल्याचे बोलले जात आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, अश्विन बाबूच्या आगामी चित्रपटात अरबाज खानला महत्त्वाची भूमिका मिळाली आहे. चित्रपटाचे निर्माते महेश्वर रेड्डी यांनी नुकताच माध्यमांशी संवाद साधताना ही माहिती दिली. त्यांनी सांगितले की, 'हा चित्रपट पूर्णपणे वेगळ्या कथेवर तयार करण्यात येत आहे. हा नवीन काळातील चित्रपट असेल ज्याची कथा आणि पटकथा थोडी वेगळी असेल.'

महेश्वर रेड्डी यांनी पुढे सांगितले की, 'गंगा एंटरटेनमेंट बॅनरखाली तयार होणाऱ्या आमच्या पहिल्या प्रॉडक्शनमध्ये अरबाज खानसोबत काम करणार असल्यामुळे आम्हाला खूप आनंद होत आहे. या चित्रपटात तो महत्त्वाची भूमिका साकारत असून आजपासून तो सेटवर रुजू होणार आहे. अनेक टॅलेंटेड एक्टर्स आणि टेक्निशियन या चित्रपटाचा एक भाग आहेत. आम्ही लवकरच याबाबतचे सर्व डिटेल्स सांगू.'

Arbaaz Khan
Boney Kapoor: बोनी कपूर उत्तर प्रदेशमध्ये फिल्म सिटी उभारणार, कुठे आहे लोकेशन आणि कसा असणार प्लॅन?

अश्विन बाबूच्या अनटाइटेड चित्रपटात अरबाज खानसोबत दिगांगना सूर्यवंशी, हायपर आदी महत्त्वाच्या भूमिकेत दिसणार आहेत. हनुमान आणि मंगलावरम यांचे सेंसेशनल सिनेमाटोग्राफर या चित्रपटाचा भाग असणार आहे. दरम्यान, अरबाज खानच्या वर्कफ्रंटबद्दल सांगायचे झाले तर, अरबाज खान नुकताच छोटा भाऊ सोहेल खानसोबत बिग बॉस 17 च्या विकेंड का वारमध्ये दिसला होता. यापूर्वी अरबाज खान सोनी लिव्हची वेब सीरिज 'तनाव' मध्ये काम केले आहे.

Arbaaz Khan
Bigg Boss 17: मुनव्वर फारुकीच्या विजय रॅलीत ड्रोनचा वापर, डोंगरी पोलिसांनी दाखल केला गुन्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com