बॉलिवूडचा (Bollywood) अभिनेता आमिर खानची (Aamir Khan) मुलगी आयरा खान (Ira Khan) आज विवाहबंधनात अडकणार आहे. आयरा खान (Ira Khan) तिचा बॉयफ्रेंड नुपूर शिखरेसोबत (Nupur Shikhare) 3 जानेवारीला म्हणजे आज सात फेरे घेणार आहे. मुंबईतील हॉटल ताज लँड्स एंडमध्ये या कपलचे धुमधडाक्यात लग्न होणार आहे. या लग्नाला 900 पाहुणे हजर राहाणार आहेत. आयरा आणि नुपूरच्या लग्नाची सध्या सगळीकडे चर्चा होत आहे. दोघांच्याही घरी सध्या खूपच आनंदाचे वातावरण आहे.
'दैनिक भास्कर'च्या वृत्तानुसार, आयरा खानच्या लग्नाचे रिसेप्शनही होणार आहे. 3 जानेवारीला लग्नानंतर हे कपल मुंबईत एका ग्रँड रिसेप्शनचे आयोजन करणार आहेत. १३ जानेवारीला जिओ वर्ल्ड सेंटरमध्ये रिसेप्शन ठेवण्यात आले आहे. तर आयरा आणि नुपूरच्या लग्नाचे ठिकाण बांद्रा येथील बँडस्टँडमध्ये आहे. ज्याजवळ सलमान खान आणि शाहरुख खानचे घर आहे. हॉटल ताज लँड्स एंडमध्ये याआधी अनेक सेलिब्रिटींचे फंक्शन्स झाले आहेत. प्रियांका चोप्राचे रिसेप्शनही याच ठिकाणी आयोजित करण्यात आले होते.
मीडिया रिपोर्ट्सनुसार, जिओ वर्ल्ड सेंटरमध्ये 13 जानेवारीला रात्री 8 वाजता आयरा आणि नुपूरच्या लग्नानंतरच्या रिसेप्शन पार्चेटी आयोजन करण्यात आले आहे. रिसेप्शनसाठी निवडलेल्या बॉलरूममध्ये 3 हजार लोकांसाठी उभे राहण्याची जागा आहे. तसेच, ते तिसऱ्या मजल्यावर आहे. हे ठिकाण 32,280 स्क्वेअर फूटमध्ये पसरलेले आहे.
आयराच्या प्री-वेडिंग फंक्शन्स मंगळवारपासून म्हणजे २ जानेवारीपासून सुरू झाली होती. आमिर खानच्या एक्स वाइफ्स रीना दत्ता आणि किरण राव या दोघींनी या कार्यक्रमांना हजेरी लावली. आयरा आणि नुपूरच्या हळदीला रीना दत्ता आणि किरण राव दोघींनी नववारी साडी नेसली होती. यावेळी नुपूरची आई आणि बहिणी देखील मराठमोळ्या लूकमध्ये दिसल्या. आयरा आणि नुपूरचे लग्न महाराष्ट्रीय पद्धतीने होणार आहे. सध्या लग्नापूर्वीच्या सर्व विधींचे फोटो आणि व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत.
सकाळ+चे सदस्य व्हा
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.