Pathaan: २०२२ मध्ये सर्वाधिक गाजलेला चित्रपट म्हणजे 'पठान'. चित्रपटातील गाणी अवघ्या काही दिवसांपूर्वीच प्रदर्शित झाले होते. अवघ्या काही दिवसातच नेटकऱ्यांनी चित्रपटातील दोन्ही गाण्यांना जबरदस्त ट्रोल केले. त्यातील 'बेशरम रंग' या गाण्यावर बऱ्याच राजकीय नेत्यांनी टिका केली. चित्रपटातील दीपिकाच्या बिकिनीचा वाद हा भारताच्या कानाकोपऱ्यात पेटला आहे. अनेक जणांनी शहरातील विविध कानाकोपऱ्यांत चित्रपटाविरोधात आंदोलन छेडली होती.
तर काहींनी शाहरुखला जिवंत मारण्याची ही धमकी दिली होती, त्याला दिलेल्या धमकीवरुन चित्रपटाच्या प्रदर्शनाचा मोठा प्रश्न उद्भवु लागला होता. सोबतच काहींनी तर ज्या चित्रपटगृहात 'पठान'चित्रपट प्रदर्शित होईल त्या थिएटरला जाळून टाकू असा आवाज उठवला होता. गेल्या काही दिवसांपूर्वी सेन्सॉर बोर्डाने चित्रपटातील काही दृश्यांवर कात्रीही लावण्यास सांगितली होती. त्यामुळे पुन्हा एकदा हा चित्रपट प्रेक्षकांच्या चर्चेत आला आहे.
चित्रपट अभिनेता आणि समीक्षक केआरकेने केलेल्या एका ट्वीटमुळे पुन्हा एकदा चित्रपटाचे भवितव्य कदाचित धोक्यात आले आहे. त्याने चित्रपट फ्लॉप होण्याचे काल पाच प्रमुख कारणं सांगितले होते. त्या ट्वीटमध्ये केआरकेने नमुद केले होते की, शाहरुखला मी त्याच्या चित्रपटाचे समीक्षण करणार असल्यामुळे त्याचा चित्रपट त्याला फ्लॉप होण्याची भिती वाटत आहे.
नुकतेच केलेल्या ट्वीटप्रमाणे, केआरकेनं दावा केलाय की पठाण सिनेमाचं नाव आणि रिलीज डेट बदलली जाऊ शकते. त्यानं त्याच्या ट्वीटमध्ये नमुद केलं की,"ब्रेकिंग न्यूज: आदित्य चोप्रा आणि शाहरुख खान पठाण सिनेमाचं नाव आणि रिलीज डेट बदलण्याच्या तयारीत आहेत. यासंदर्भात अधिकृत माहिती सोमवारी म्हणजे २ जानेवारी रोजी दिली जाऊ शकते".
केआरकेच्या ट्वीटनंतर अनेक प्रश्न आता निर्माण झाले आहेत, खरंच शाहरुख आणि निर्माते चित्रपटाचे नाव आणि प्रदर्शनाची तारीख बदलणार का असा प्रश्न आता उद्भवत आहे. कोलकाता फिल्म फेस्टिव्हलमध्ये शाहरुखने आपल्या विरोधकांना इशारा देत खडेबोल सुनावले होते.
त्याच्या खास शैलीत भर कार्यक्रमात तो म्हणतो, 'जगात काहीही घडो, पण तुमच्यात -माझ्यात असलेली सकारात्मक उर्जा आपल्याला पुढे जायला मदत करेल.' चित्रपटातील दोन्हीही गाण्यांना नेटकऱ्यांनी कमालीचा विरोध दर्शवला होता.
दिग्दर्शक सिद्धार्थ आनंदने 'पठान' चित्रपटाच्या प्रदर्शनाची धुरा सांभाळली आहे. चित्रपटात मुख्य भूमिकेत शाहरुख खान, दीपिका पदुकोण आणि जॉन अब्राहम दिसणार आहेत. सध्या तरी सोशल मीडियावर होत असलेल्या चर्चेप्रमाणे, सलमानदेखील या चित्रपाटातून कॅमियो करण्याची शक्यता आहे. केआरके करत असलेल्या संदर्भात किती तथ्य आहे, हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे. मुख्य बाब म्हणजे दिग्दर्शक सिद्धार्थ आनंदने 'वॉर'सारख्या जबरदस्त अॅक्शन आणि सुपरहिट चित्रपटाचे दिग्दर्शन केले होते.
सकाळ+चे सदस्य व्हा
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.