Vidya Balan Birthday: विद्या बालनची संपत्ती माहिती का? संपत्ती जाणून व्हाल थक्क...

विद्या बालनचे चित्रपट प्रेक्षकांना फार आवडतात. विद्याचे चित्रपट कमाईच्या बाबतीत नेहमीच अग्रेसर असतात. ती एका चित्रपटासाठीही भरमसाठ फी घेते.
vidya balan instagram
vidya balan instagramSaam Tv
Published On

Vidya Balan Birthday: बॉलिवूड अभिनेत्री विद्या बालन आपल्या उत्कृष्ट अभिनय शैलीमुळे लोकांच्या मनावर राज्य करते. चित्रपटांत कोणतीही भूमिका असू देत अगदी लिलया पार पाडते. प्रामुख्याने विद्याला गंभीर पात्रांच्या अभिनयामुळे बॉलिवूडमध्ये एक वेगळी ओळख मिळाली होती. विद्या बालनचे अनेक चित्रपट तिच्या अभिनयानेच हिट ठरले आहेत.

विद्या बालनचे चित्रपट प्रेक्षकांना फार आवडतात. विद्याचे चित्रपट कमाईच्या बाबतीत नेहमीच अग्रेसर असतात. ती एका चित्रपटासाठी भरमसाठ फी घेते.

vidya balan instagram
Karan Johar: करणने चाहत्यांना दिली नव्या वर्षाची भेट, ७ वर्षांनी करणार दिग्दर्शन, पहिली झलक पाहून चाहत्यांचा आनंद द्विगुणित...

चित्रपटांमध्ये गंभीर अभिनयासाठी ओळखल्या जाणाऱ्या विद्या बालनचा जन्म १ जानेवारी १९७९ रोजी मुंबईत झाला. विद्या बालन शाळेत असतानाच तिचे अभिनेत्री बनण्याचे स्वप्न होते. माधुरी दीक्षितला 'तेजाब' चित्रपटात नृत्य करताना पाहून तिने अभिनेत्री होण्याचे स्वप्न पाहिले होते.

विद्याने वयाच्या अवघ्या १६ व्या वर्षी एकता कपूरच्या 'हम पांच' या टीव्ही मालिकेतून तिच्या करिअरची सुरुवात केली. पण विद्याला चित्रपटात काम करायचे होते. विद्याने अनेक मल्याळम आणि तमिळ चित्रपटांमध्ये बरेच प्रयत्न केले, पण यश मिळाले नाही.

vidya balan instagram
Vidya Balan: टीका, वाद आणि अपयश: तरीही आज आहे चाहत्यांची सर्वोत्कृष्ट अभिनेत्री

बॉलिवूड अभिनेत्री विद्या बालनच्या नेट वर्थबद्दल बोलायचे तर तिचा पती सिद्धार्थ रॉय कपूरची एकूण संपत्ती 32 अब्ज रुपये आहे. पती सिद्धार्थच्या कमाई बरोबर ती सुद्धा मागे नाही. विद्या बालनने स्वतःच्या बळावर अनेक करोडोंची संपत्ती कमावली आहे. मीडिया रिपोर्ट्सनुसार विद्या बालनची एकूण संपत्ती 188 कोटींच्या आसपास आहे. विद्या अनेक ब्रँड्सचे प्रमोशनही करते ज्यातून ती भरपूर पैसे कमवते.

vidya balan instagram
Majhi Tujhi Reshimgath: 'माझी तुझी रेशीमगाठ' घेणार चाहत्यांचा निरोप?, येणार 'ही' नवी मालिका...

अभिनेत्री विद्या बालन सध्या तिच्या कुटुंबासोबत एका अपार्टमेंटमध्ये राहते. विद्याने मुंबई आणि खारमध्ये काही अलिशान घर देखील खरेदी केले आहेत. पती सिद्धार्थ रॉय कपूरने 14 कोटींचं एक अलिशान घर देखील गिफ्ट केले आहे. विद्या बालननेही 8 कोटी रुपयांचा फ्लॅट खरेदी केला आहे.

यासोबतच ती देशातील अनेक रिअल इस्टेटची मालकीण आहे. विद्या बालन बॉलिवूड इंडस्ट्रीतील श्रीमंत अभिनेत्रींपैकी एक आहे. तिलाही अलिशान गाड्यांचा शौक आहे, सोबतच तिच्याकडे अनेक महागड्या गाड्यांचे कलेक्शन आहे. विद्याकडे मर्सिडीज ई-क्लास, मर्सिडीज बेंझ आणि सेडानसारखी महागड्या गाड्या आहेत.

vidya balan instagram
Fawad Khan Movie: फवादचे भारत- पाकिस्तान संबंधांवर मोठे वक्तव्य, 'माझा चित्रपट भारतात प्रदर्शित झाला तर....'

विद्या बालनला तिच्या दमदार अभिनयासाठी 2014 मध्ये पद्मश्री पुरस्काराने सन्मानित करण्यात आले होते. अभिनेत्रीने 2012 मध्ये निर्माता सिद्धार्थ कपूरसोबत लग्न केले. विद्या आणि तिच्या पतीची संपत्ती जोडली तर ती कोट्यवधी रुपयांची मालकीण आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com