Karan Johar: करणने चाहत्यांना दिली नव्या वर्षाची भेट, ७ वर्षांनी करणार दिग्दर्शन, पहिली झलक पाहून चाहत्यांचा आनंद द्विगुणित...

7 वर्षानंतर करण जोहर पुन्हा एकदा दिग्दर्शनाची धुरा सांभाळण्यासाठी सज्ज झाला आहे.
Karan Johar
Karan JoharSaam Tv

Karan Johar Upcoming Movie: बॉलिवूड चित्रपट निर्माता करण जोहरने अनेक उत्तम कलाकृतींची निर्मिती केली आहे. करण जोहरने दिग्दर्शित केलेले चित्रपट एव्हरग्रीन आहेत. करणचे चित्रपट नेहमीच हिट ठरतात. करण खूप फिल्मी आहे आणि त्याचंगे चित्रपटांवर खूप प्रेम आहे. चित्रपट निर्मिती करणं त्याची स्वप्न आहे. त्याचे हे स्वप्न घेऊन त्याला आयुष्यभर जगायचे आहे.

मात्र, गेल्या काही वर्षांपासून करण जोहर (Karan Johar) दिग्दर्शनापासून लांब आहे. करणने 2016 मध्ये 'ए दिल है मुश्किल' हा शेवटचा चित्रपट दिग्दर्शित केला होता. जो प्रेक्षकांना खूप आवडला होता. चित्रपटातील प्रत्येक गाण्यापासून ते संवादांपर्यंत सगळ्याच प्रेक्षकांनी भरभरून दाद दिली होती.

Karan Johar
Fawad Khan Movie: फवादचे भारत- पाकिस्तान संबंधांवर मोठे वक्तव्य, 'माझा चित्रपट भारतात प्रदर्शित झाला तर....'

दिग्दर्शनापासून दूर राहूनही करण सतत इंडस्ट्रीशी जोडलेला आहे. गेल्या काही वर्षांत करणने त्याच्या प्रोडक्शन हाऊस अंतर्गत अनेक चित्रपटांची निर्मिती केली आहे. पण 7 वर्षानंतर करण जोहर पुन्हा एकदा दिग्दर्शनाची धुरा सांभाळण्यासाठी सज्ज झाला आहे.

करण जोहरने त्याच्या सोशल मीडिया अकाउंटवर एक व्हिडिओ शेअर केला आहे. करणने हा व्हिडिओ त्याच्या खास चित्रपटांचे काही सीन दाखवत सुरू केला आहे. यामध्ये 'कभी खुशी कभी गम', 'कुछ कुछ होता है'सह करणच्या अनेक चित्रपटांची झलक पाहायला मिळत आहे. या व्हिडिओच्या माध्यमातून करणने त्याच्या आगामी 'रॉकी आणि रानी की प्रेम कहानी' या चित्रपटाची पहिली झलकही शेअर करत आहे. या पोस्टसह करण जोहरने सांगितले की, 7 वर्षांनी पुन्हा एकदा दिग्दर्शन करता आहे. (Movie)

हा व्हिडिओ शेअर करताना, करण जोहरने कॅप्शनमध्ये लिहिले की '2023 हे वर्ष माझ्या सर्वात आवडत्या गोष्टी भरून आणि कृतज्ञतेने भरून टाकणार आहे ... सिनेमा! या व्हिडिओमध्ये आलिया भट्ट, रणवीर सिंग आणि ज्येष्ठ कलाकार धर्मेंद्रही दिसत आहेत. 'रॉकी और रानी की प्रेम कहानी' या चित्रपटात रणवीर आणि आलिया मुख्य भूमिकेत दिसणार आहेत.

Read the latest Marathi news and watch Live Streaming on Saam TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education at Saam TV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv Marathi news Channel app for Android and IOS.

साम आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुकट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, साम टीव्हीच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Saam TV Marathi News | साम टीव्ही
saamtv.esakal.com