Vidya Balan Birthday: अभिनेत्री विद्या बालन बॉलिवूडमध्ये महिलांच्या 'श्रेयवादा'वरुन जरा स्पष्टच बोलली...

अभिनेत्री विद्या बालन ही बॉलिवूडमधील प्रतिभावान अभिनेत्रींपैकी एक आहे.
Vidya Balan
Vidya BalanSaam Tv
Published On

Vidya Balan Birthday: अभिनेत्री विद्या बालन ही बॉलिवूडमधील प्रतिभावान अभिनेत्रींपैकी एक आहे. 'द डर्टी पिक्चर', 'पा', 'भूल भुलैया', 'बेगम जान' यांसारख्या अनेक चित्रपटांमधून आपल्या अभिनयाचे कौशल्य दाखवले. मात्र, इंडस्ट्रीत अनेक चित्रपट महिलांना मुख्य भूमिकेत घेऊन केले जातात, त्यात बऱ्याचदा त्यांना श्रेय दिले जात नाही.

अलीकडेच विद्या बालन 'ओ वुमनिया! 2022'मध्ये बॉलिवूडमधील निर्मात्यांबद्दल जरा स्पष्टच बोलली. बॉलिवूडमध्ये महिलांना त्यांचे क्रेडिट दिले जात नाही, यावर तिने वक्तव्य केले होते.

Vidya Balan
Vidya Balan Birthday: विद्या बालनची संपत्ती माहिती का? संपत्ती जाणून व्हाल थक्क...

मुलाखतीत विद्या बालनने 2019 मध्ये आलेल्या 'मिशन मंगल' चित्रपटाचे उदाहरण दिले. या चित्रपटाच्या यशाचं श्रेय अक्षय कुमारला कसं दिलं जातं, हे तिने सांगितलं होतं. विद्या म्हणते, या चित्रपटाने चांगला व्यवसाय केला, मात्र अक्षय कुमारचा चित्रपट म्हणून याकडे पाहिले गेले, हे अत्यंत दुर्दैवी आहे. चित्रपटात बाकीच्या स्त्री पात्रांनाही प्रमुख पात्र म्हणून पाहिले गेले नाही. खरं म्हणजे या चित्रपटाची कथा एकट्या अक्षय कुमारने सांगितली नव्हती. हा केवळ अक्षयचाच चित्रपट नव्हता.

Vidya Balan
Vidya Balan: टीका, वाद आणि अपयश: तरीही आज आहे चाहत्यांची सर्वोत्कृष्ट अभिनेत्री

सोबतच ती पुढे म्हणते, गेल्या काही दिवसांपूर्वी माझ्या हिट चित्रपटांविषयी माझ्यासोबत चर्चा सुरु होती, पण, त्यांनी 'मिशन मंगल' चित्रपटाचा उल्लेख केला नाही. ती व्यक्ती म्हणते, 'तो अक्षय कुमार...' मी म्हणाले, 'तुम्ही मला आणि इतर चार महिला कलाकारांना चित्रपटात पाहिलं नाही का?' 'मिशन मंगल'मध्ये अक्षय कुमार आणि विद्या बालन व्यतिरिक्त सोनाक्षी सिन्हा, तापसी पन्नू, नित्या मेनन आणि कीर्ती कुल्हारी आणि शर्मन जोशी देखील होते.

Vidya Balan
Karan Johar: करणने चाहत्यांना दिली नव्या वर्षाची भेट, ७ वर्षांनी करणार दिग्दर्शन, पहिली झलक पाहून चाहत्यांचा आनंद द्विगुणित...

शिवाय, विद्या बालन म्हणाली, लॉकडाऊन लोकांसाठी एक सोप्पं कारण ठरले आहे की, महिलांच्या नेतृत्वाखालील चित्रपट थिएटरमध्ये चालत नाहीत. पण, आपली इंडस्ट्री ज्या चढ-उतारातून जात आहे, त्यात अनेक चित्रपट खराब कामगिरी करत आहेत आणि ते चित्रपट काही विशिष्ट अभिनेत्यांचेच आहेत.

'गंगुबाई काठियावाडी'मध्ये पुरुष आघाडी नाही हे लोकांना कळत नाही. हा आलिया भट्टचा चित्रपट आहे आणि त्याने पुरुष नायकांसह सर्व चित्रपटांपेक्षा चांगले काम केले आहे. पण, तेवढे तर्क कोणी लावत नाही, हे अत्यंत निराशाजनक आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com