Crew 8th Day Collection: दुसऱ्या आठवड्यातही 'क्रू'चा वर्ल्डवाईड बॉक्स ऑफिसवर दंगा, एकूण कमाई किती ?

Crew Box Office Collection: करीना आणि क्रितीच्या ‘क्रू’ चित्रपटाची चाहत्यांमध्ये जोरदार चर्चा पाहायला मिळत आहे. चित्रपटाने दुसऱ्या आठवड्याच्या शनिवारीही दमदार कमाई केलेली आहे. जाणून घेऊया चित्रपटाच्या कमाईबद्दल...
Crew Movie Collection
Crew Movie CollectionSaam Tv

Crew 8th Day Box Office Collection

गेल्या आठवड्यामध्ये थिएटरमध्ये रिलीज झालेल्या करीना आणि क्रितीच्या ‘क्रू’ चित्रपटाची चाहत्यांमध्ये जोरदार चर्चा पाहायला मिळत आहे. चित्रपटामध्ये प्रमुख भूमिकेत, करीना कपूर खान, क्रिती सेनन, तब्बू ही तगडी स्टारकास्ट पाहायला मिळत आहे.

प्रदर्शनाच्या आधीपासूनच प्रेक्षकांमध्ये चित्रपटाची जोरदार क्रेझ पाहायला मिळत आहे. चित्रपटाने पहिल्या आठवड्यामध्ये भरघोस कमाई करत यशस्वीपणे दुसऱ्या आठवड्यामध्ये एन्ट्री केली आहे. चित्रपटाने दुसऱ्या आठवड्याच्या शनिवारीही दमदार कमाई केलेली आहे. जाणून घेऊया चित्रपटाच्या कमाईबद्दल... (Bollywood)

Crew Movie Collection
Tushar Deval Open New Hotel: श्रेया बुगडेनंतर आणखी एका सेलिब्रिटीची व्यवसायात एन्ट्री; 'चला हवा येऊ द्या' फेम कलाकाराचं मुंबईत नव हॉटेल

करीना, क्रिती आणि तब्बूच्या या बहुचर्चित चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर दमदार कमाई करत सर्वांचे लक्ष वेधले. चित्रपटाने एका आठवड्यामध्ये देशभरामध्ये, ४५ कोटींच्या आसपासची कमाई केलेली आहे. तर जगभरामध्ये चित्रपटाने ८२ कोटींची कमाई केलेली आहे. चित्रपटाने प्रदर्शनाच्या आठव्या दिवशी ३.६० कोटींची कमाई केलेली आहे. करीना, क्रिती आणि तब्बू या तिघींच्याही अभिनयावर प्रेक्षक भरभरून प्रेम देताना दिसत आहेत. हा एक कॉमेडी चित्रपट आहे. हा चित्रपट प्रेक्षकांचे चांगलेच मनोरंजन करताना दिसत आहे. (Bollywood Film)

Crew Movie Collection
Tushar Deval Open New Hotel: श्रेया बुगडेनंतर आणखी एका सेलिब्रिटीची व्यवसायात एन्ट्री; 'चला हवा येऊ द्या' फेम कलाकाराचं मुंबईत नव हॉटेल

चित्रपटाची कथा प्रेक्षकांना आवडत आहे. तसंच हा चित्रपट देखील प्रेक्षकांचे मनोरंजन करण्याची संधी सोडत नाही. या चित्रपटाने मार्केटमध्ये आपली पकड धरून ठेवली आहे. या चित्रपटाने पहिल्याच दिवशी अपेक्षेपेक्षा जास्त कमाई केली होती. (Bollywood Actress)

चित्रपट लवकरच १०० कोटींच्या क्लबमध्ये एन्ट्री करेल. १०० कोटींच्या क्लबमध्ये पोहचण्यासाठी चित्रपटाला १७ कोटींपेक्षा जास्त कमाई करावी लागेल. तब्बू, करीना कपूर आणि क्रिती सेनॉन व्यतिरिक्त चित्रपटामध्ये, दिलजीत दोसांझ, कॉमेडियन कपिल शर्मा, सास्वता चॅटर्जी, राजेश शर्मा आणि कुलभूषण खरबंदा यांचाही समावेश आहे. चित्रपटाचे दिग्दर्शन राजेश ए कृष्णन यांनी केले आहे. (Bollywood News)

Crew Movie Collection
विजय देवरकोंडा आणि मृणाल ठाकूरची जोडी चाहत्यांना भावली, ‘Family Star’ने पहिल्याच दिवशी केली दमदार कमाई...

'क्रू' चित्रपटाचे कथानक, एका दिवाळखोर विमान कंपनीत काम करणाऱ्या तीन एअर होस्टेसचे कथानक आहे. तिघेही आपापल्या आयुष्यातील समस्यांमध्ये अडकले आहेत. विमान कंपनीमध्ये काम करूनही पगार मिळत नाही. त्या तिघीही जेव्हा चुकीचं काम करतात, त्यावेळी कथेमध्ये एक वेगळाच ट्वीस्ट येतो. त्या तिघीही काय चुकीचं काम करतात?, ते काम केल्याने त्यांच्या अडचणीत कशी वाढ होते? हे सगळं चित्रपट पाहिल्यावरंच कळतं. (Entertainment News)

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com