Tushar Deval Open New Hotel: श्रेया बुगडेनंतर आणखी एका सेलिब्रिटीची व्यवसायात एन्ट्री; 'चला हवा येऊ द्या' फेम कलाकाराचं मुंबईत नव हॉटेल

Tushar Deval News: ‘चला हवा येऊ द्या’मधील लोकप्रिय संगीत संयोजक आणि संगीतकार तुषार देवलने आणि त्याची पत्नी स्वाती देवलने स्वतःचा व्यवसाय सुरू केला आहे.
Tushar Deval And Swati Deval Open New Hotel
Tushar Deval And Swati Deval Open New HotelSaam Tv

Tushar Deval And Swati Deval Open New Hotel

अनेक मराठी सेलिब्रिटींचा अभिनयासोबतच व्यवसायाकडे सर्वाधिक कल आहे. हल्ली अनेक सेलिब्रिटी अभिनयासोबतच बिझनेसमध्येही आपलं नशीब आजमावू पाहाताय. गेल्या काही दिवसांपूर्वी सुप्रिया पाठारे यांनी व त्यांच्या मुलाने, भगरे गुरूजींची लेक अनघा भगरे हिने, अभिनेत्री श्रेया बुगडे यांनी अभिनयासोबतच हॉटेल व्यवसायामध्ये आपले नशीब आजमावले. अशातच श्रेयानंतर आणखी एका टेलिव्हिजन कपलने हॉटेल व्यवसाय सुरू केला आहे. ‘चला हवा येऊ द्या’मधील लोकप्रिय संगीत संयोजक आणि संगीतकार तुषार देवलने आणि त्याची पत्नी स्वाती देवलने स्वतःचा व्यवसाय सुरू केला आहे. (Marathi Actors)

Tushar Deval And Swati Deval Open New Hotel
Ankita Walawalkar On Vashi Toll Naka: 'भारत चंद्रावर पोहोचला पण तुमचे स्कॅनर नीट नाहीत.' ; अंकिता वालावलकर टोल प्रशासनावर संतापली

त्यांनी मुंबई नजीकच्या बोरिवलीमध्ये स्वत:चे हॉटेल सुरू केले आहे. यांच्या हॉटेलचे उद्घाटन केंद्रीय मंत्री पियुष गोयल यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी त्यांनी त्यांच्या हस्ते हॉटेलचे उद्घाटन करत दोघांनीही व्यवसायामध्ये यश मिळो, अशा शुभेच्छाही दिल्या. गेल्या काही दिवसांपूर्वी बोरिवली पुर्वेमध्ये, मनसेच्या वतीने मराठी खाद्यसंस्कृती जोपासण्याकरिता भव्य मिसळ महोत्सवाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी तुषार आणि स्वातीने दोघांनीही ‘देवल मिसळ’ स्टॉल लावला होता. त्यावेळी मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी दोघांचंही कौतुक केलं होतं. (Mumbai News)

तुषार आणि स्वाती एक टिव्ही कपल आहे. तुषार ‘चला हवा येऊ द्या’मध्ये लोकप्रिय संगीत संयोजक आणि संगीतकार आहे. तर त्याची पत्नी स्वाती देवल ही एक प्रसिद्ध टिव्ही अभिनेत्रीही आहे. या सेलिब्रिटी कपलने नुकतंच एक पाऊल पुढे टाकतं स्वतःचं हॉटेल सुरू केलं आहे. या कपलवर चाहत्यांसह, अनेक सेलिब्रिटींकडूनही कौतुकाचा वर्षाव होत आहे. स्वाती आणि तुषारच्या मित्र मंडळींनी आणि नातेवाईकांनी सोशल मीडियावर फोटो- व्हिडीओ शेअर करून दोघांनाही शुभेच्छा दिलेल्या आहेत. (Zee Marathi)

Tushar Deval And Swati Deval Open New Hotel
विजय देवरकोंडा आणि मृणाल ठाकूरची जोडी चाहत्यांना भावली, ‘Family Star’ने पहिल्याच दिवशी केली दमदार कमाई...

तुषार देवलने काही तासांपूर्वीच इन्स्टाग्रामवर एक पोस्ट शेअर केली. त्यापोस्टमध्ये त्याने त्याच्या दुकानाचे पोस्टर लावलेले पाहायला मिळत आहे. पोस्ट शेअर करताना अभिनेत्याने कॅप्शन दिले की, "आज माझं आणखी एक स्वप्न पूर्ण झालं, ते म्हणजे माझ्या (देवल मिसळ)चं आउटलेट चालू झालंय. केंद्रीय मंत्री पीयूष गोयल, गोपाळ शेट्टी, प्रवीण दरेकर, प्रकाश दरेकरजी, प्रकाश सुर्वे यांच्या उपस्थितीत देवल मिसळचे अनावरण झाले.... आपण सर्वांनी लवकरात लवकर मिसळचा आस्वाद घेण्यासाठी जरूर यावे... पत्ता; देवल मिसळ, नॅन्सी डेपोच्या समोर, नमस्कार हॉटेलच्या बाजूला" असं कॅप्शन देत अभिनेत्याने फोटो शेअर केलेत. इन्स्टाग्रामवर तुषार आणि स्वातीने उद्घाटना दरम्यानचे काही फोटोही शेअर केलेले आहेत. (Entertainment News)

Tushar Deval And Swati Deval Open New Hotel
Mylek Trailer: सोनाली खरेच्या 'मायलेक'चा जबरदस्त ट्रेलर रिलीज, आई -मुलीतील केमिस्ट्री उलगडणार

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com