Nushrratt Bharuccha: प्रसिद्ध अभिनेत्रीचा परदेशात धक्कादायक अपघात; ऑक्सिजन सपोर्टवर, एअर ॲम्ब्युलन्सने मुंबईत दाखल

Nushrratt Bharuccha Health Update: बालीतील अपघातात नुसरत भरुचाच्या पाठीच्या कण्याला फ्रॅक्चर झाले. एअर ॲम्ब्युलन्सने तिला मुंबईत आणण्यात आले असून स्पाइन सर्जरी होणार आहे. तिचा ऑक्सिजन सपोर्टवरील व्हिडिओ समोर आला आहे.
Nushrratt Bharuccha Health Update
Nushrratt Bharuccha Health UpdateSaam Tv
Published On: 

बॉलिवूड अभिनेत्री नुसरत भरुचा हिच्याबाबत चाहत्यांसाठी चिंताजनक बातमी समोर आली आहे. बालीमध्ये झालेल्या अपघातात तिच्या पाठीच्या कण्याला फ्रॅक्चर झाले आहे. अपघातानंतर नुसरतला बालीतील रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. डॉक्टरांच्या तपासणीनंतर तिच्यावर पाठीच्या कण्याची शस्त्रक्रिया करण्याचा निर्णय घेण्यात आला. त्यासाठी तिला एअर ॲम्ब्युलन्सने मुंबईत आणण्यात आले.

एअर ॲम्ब्युलन्सने मुंबईत आणले

नुसरत भरुचा कामासाठी बालीला गेली होती. याचदरम्यान तिचा अपघात झाला. या दुर्घटनेत तिच्या पाठीच्या कण्याला दुखापत होऊन फ्रॅक्चर झाले. सुरुवातीला बालीतील रुग्णालयात तिच्यावर उपचार करण्यात आले. मात्र पुढील उपचार आणि शस्त्रक्रियेसाठी तिला मुंबईत एअर ॲम्ब्युलन्सने आणले गेले.

Nushrratt Bharuccha Health Update
Drishyam 3 Review: अजय देवगणचा 'दृश्यम ३' थिएटरमध्ये पास की फेल; प्रेक्षकांनी दिले रिव्ह्यू

स्ट्रेचरवरून नेण्यात आले, ऑक्सिजन सपोर्ट दिसला

मुंबईत दाखल झाल्यानंतर नुसरतचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर समोर आला. या व्हिडिओमध्ये ती स्ट्रेचरवर दिसत असून तिच्या नाकाला ऑक्सिजनची नळी लावलेली दिसते. तिला डॉक्टरांनी कॅन्युला दिसत आहे. या दृश्यांमुळे चाहत्यांमध्ये तिच्या प्रकृतीबाबत चिंता निर्माण झाली आहे.

Nushrratt Bharuccha Health Update
Aadi Anant: अशोक सराफ आणि संकर्षण कऱ्हाडे यांच्या नात्याची हृदयस्पर्शी गोष्ट; 'आदि अनंत'चे पहिले पोस्टर प्रदर्शित

आगामी कामांवर होणार परिणाम

तिला झालेली दुखापत आणि शस्त्रक्रियेमुळे नुसरतला पूर्णपणे बरे होण्यासाठी विश्रांतीची गरज आहे. त्यामुळे आगामी काही आठवड्यांत तिला विश्रांती घ्यावी लागल्याने सध्या कोणतीच काम करता येणार नाही असे टीमने सांगितले आहे. तसेच चाहत्यांनी आणि माध्यमांनी तिच्या गोपनीयतेचा आदर करावा, अशी विनंतीही टीमकडून करण्यात आली आहे.

टायगर श्रॉफसोबत दिसणार होती

नुसरत भरुचा लवकरच टायगर श्रॉफसोबत एका आगामी अॅक्शन चित्रपटात स्क्रीन शेअर करणार आहे. रेमो डिसूझा दिग्दर्शित या चित्रपटाचे अद्याप नाव जाहीर झालेलं नाही. या प्रोजेक्टमध्ये अभिषेक बॅनर्जी, एल्विश यादव आणि पश्मिना रोशन यांच्याही भूमिका असल्याची चर्चा सुरु आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com