आजच्या प्रसिद्ध अभिनेत्री एकेकाळी कास्टिंग काउचच्या शिकार झाल्या आहेत. अभिनेत्रींनी अनेक मुलाखतींमध्ये कास्टिंग काउचचा धक्कादायक अनुभव सांगितला आहे. प्रसिद्ध अभिनेत्री मदालसा शर्माने तिच्यासोबत मुंबईत घडलेल्या कास्टिंग काउचचा धक्कादायक प्रसंग सांगितला.
मदालसा शर्माने 'द मेल फेमिनिस्ट' पॉडकास्टशी केलेल्या संवादात कास्टिंग काउचचा अनुभव सांगितला. ती म्हणाली, "एका चित्रपट निर्मात्याने मला मीटिंगसाठी बोलावले होते. त्यावेळी मी 19 वर्षांची होते. त्यांनी मला सांगितले की, 'आम्हाला बिकिनी घालणारी किंवा त्यात कंफर्टेबल असलेली मुलगी हवी आहे...' हे ऐकून मला वाटलं, 'ठीक आहे, यात एवढं काय विशेष आहे?' पण तो मला म्हणाला, 'मला तुला बिकिनीमध्ये बघायचं आहे. मला त्यात तुझी देहबोली बघायची आहे...' हे ऐकून मी म्हणाले, 'सॉरी, मी एक अभिनेत्री आहे. जर भूमिकेसाठी कॅमेऱ्यासमोर काही घालायची गरज असेल, तर मी , कारण ते माझ्या कामाचा भाग आहे. पण तुमच्यासमोर बिकिनी घालणं हे माझ्या कामाचा भाग नाही...असं बोलून ती तिथून निघून गेली...."
मीडिया रिपोर्टनुसार, मदालसा शर्माने २००९ मध्ये साऊथ चित्रपटसृष्टीतून आपल्या करिअरची सुरुवात केली. दाक्षिणात्य चित्रपटांनंतर तिने अनेक हिंदी चित्रपटांमध्येही काम केले. मात्र अभिनेत्रीला खरी ओळख 'अनुपमा' या मालिकेमुळे मिळाली. तिने आजवर आपल्या अभिनयाने प्रेक्षकांचे मनोरंजन केले आहे. मदालसा शर्मा ही बॉलिवूडचे ज्येष्ठ अभिनेते मिथुन चक्रवर्ती यांची सून आहे. २०१८ मध्ये मदालसा शर्माने महाअक्षय चक्रवर्ती (मिमोह चक्रवर्ती) यांच्याशी लग्नगाठ बांधली.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.