HBD Kriti Sanon : अभिनेत्री ते बिजनेस वुमन.. क्रिती सेनन कोट्यावधींची मालकीण; चित्रपटापेक्षा जाहिरातीसाठी घेते जास्त मानधन

Kriti Sanon Net Worth : बॉलिवूडमध्ये यशस्वी ठरलेल्या क्रिती कोट्यवधींची मालकीण आहे.
Kriti Sanon Birthday Special
Kriti Sanon Birthday Special Saam TV
Published On

Bollywood actress Kriti Sanons birthday : बॉलिवूड अभिनेत्री क्रिती सेननचा आज वाढदिवस आहे. २७ जुलै १९९० साली दिल्लीमध्ये तिचा जन्म झाला. अभिनेत्रींच्या करियरची सुरुवात जाहिरातींपासून झाली. आता क्रिती बॉलिवूडच्या टॉपच्या अभिनेत्रींपैकी एक आहे.

क्रितीने तिच्या अभिनयाच्या जोरावर बॉलिवूडमध्ये तिचे पाय घट्ट रोवले आहेत. तसेच बॉलिवूडमध्ये स्वतःची जागा निर्माण केली आहे. बॉलिवूडमध्ये यशस्वी ठरलेल्या क्रिती कोट्यवधींची मालकीण आहे.

Kriti Sanon Birthday Special
Know About Mumbai's Bhendi Bazaar : मुंबईतील भेंडी बाजाराला 'भेंडी बाजार' का म्हणतात?

तेलुगू चित्रपटातून सुरुवात

क्रिती सेनन बॉलिवूडमधील सुपरस्टार आहे. परंतु तिला इथपर्यंत पोचण्यासाठी खूप मेहनत करावा लागली. क्रितीने तिच्या करिअरची सुरुवात तेलगू चित्रपटांपासून केली. साजिद नाडियाडवालाने क्रितीला हेरल आणि तिला बॉलिवूडमध्ये काम करण्याची संधी दिली. हिरोपंती चित्रपटातून क्रिती सेननबॉलिवूडमध्ये पदार्पण केले. (Latest Entertainment News)

क्रिती सेननची नेट वर्थ

मीडिया रिपोर्ट्सनुसार क्रितीची एकूण संपत्ती 74 करोड रुपये आहे. क्रिती सेनन एका चित्रपटासाठी २ करोड रूपये घ्यायची. पण आता ती ४ करोड रुपये इतके मानधन घेते.

चित्रपटांसह क्रिती ब्रँड एंडोर्समेंटच्या माध्यमातून देखील भरपूर कमाई करते. रिपोर्ट्सनुसार क्रिती सेनन बाटा, अर्बन क्लॅप, फेम, टायटन रागा या कंपन्यांची ब्रँड अॅम्बेसेडर आहे. या कमान्यांच्या जाहिरातीकरून तुला वर्षाला २ करोड रिपाई मिळतात.

क्रिती सेनन बॉलिवूडमध्ये ९ वर्ष पूर्ण केली आहेत. क्रिती सेनन अभिनेत्री असण्यासह एक बिजनेसवुमन देखील आहे. क्रिती सेननने तीन ट्रेनर्स आणि को फॉउंडर रॉबिन बहल, करण साव्हन आणि अनुष्का नांदणी यांच्यासोबत एक फिटनेस कम्युनिटी इव्हेंट केला आहे.

क्रिती सेननने ब्ल्यू बटरफ्लाय नावाने प्रॉडक्शन हाऊस देखील सुरु केले आहे. तसेच आज वाढदिवसानिमित्त 'एच'पासून सुरू होणार नवीन ब्रँड देखील लाँच करू शकते.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com