कोमल दामुद्रे
भेंडी बाजाराने मोहम्मद अली रोड ते खेतवाडी दरम्यानचा परिसर व्यापला.
सर्वात जवळचे मध्य आणि हार्बर मार्ग स्टेशन सँडहर्स्ट रोड आहे
सर्वात जवळचे पश्चिम रेल्वे स्थानक म्हणजे चर्नीरोड आणि ग्रँट रोड.
प्राचीन वस्तू, हार्डवेअर वस्तू आदींच्या खरेदीसाठी भेंडीबाजार प्रसिद्ध आहे.
भेंडी बाजाराच्या सभोवताली इतरही बऱ्याच बाजारपेठा आहेत - क्रॉफर्ड मार्केट, चोर बाजार, नळ बाजार आणि इतर लहानसहान बाजार.
भेंडी बाजार हे प्रामुख्याने मुस्लिम-वस्ती असलेले क्षेत्र आहे.
या मार्केटमधील दुकान-मालक आणि फेरीवाले सर्वधर्मीय आहेत.
भेंडी बाजार ही दक्षिण मुंबईतील एक मोठी बाजारपेठ आहे.
या नावाचे मूळ असे आहे की मुंबई किल्ल्यातील क्रॉफर्ड मार्केटच्या दक्षिणेस राहणाऱ्या ब्रिटीशांनी या भागाचा क्रॉफर्ड मार्केटच्या उत्तरेस म्हणजेच behind the bazaar किंवा "बाजाराच्या मागे"असा उल्लेख केला.
स्थानिक लोकांनी "बिहाइंड द बाजार" याचा अपभ्रंश "भेंडी बाजार" असा केला.