Ananya Pandey Open Marriage Plans: काय बोलता... अनन्या- आदित्य लग्न करताय?; डेटिंगच्या चर्चांदरम्यान अभिनेत्रीचं सर्वात मोठं विधान

Ananya Pandey And Aditya Rai Kapoor Wedding Plan: दोघांच्याही रिलेशनच्या चर्चांना उधाण आले असून आता अनन्या पांडेने खुद्द तिच्या लग्नाबद्दल खुलासा केलाय.
Ananya Pandey And Aditya Rai Kapoor Wedding Plan
Ananya Pandey And Aditya Rai Kapoor Wedding PlanInstagram
Published On

Ananya Panday Wedding Plan Rumors: बॉलिवूडमध्ये सध्या असे अनेक सेलिब्रिटी कपल आहेत, ज्यांचे सुत जुळले आहे, तर काहींचे सुत जुळत असल्याची चर्चा आहे. गेल्या काही दिवसांपूर्वी सिद्धार्थ- कियाराचे लग्न मोठ्या धूमधडाक्यात पार पडले. त्यानंतर आता पुन्हा एका कपलची चर्चा सोशल मीडियावर होत आहे. ती जोडी म्हणजे, अनन्या पांडे आणि आदित्य रॉय कपूर. ही जोडी अनेकदा कॅमेऱ्यात एकत्र स्पॉट झाली आहे. दोघांच्याही रिलेशनच्या चर्चांना उधाण आले असून आता अनन्या पांडेने खुद्द तिच्या लग्नाबद्दल खुलासा केलाय.

Ananya Pandey And Aditya Rai Kapoor Wedding Plan
Parineeti Chopra - Raghav Chadha Seva : परिणीती-राघवने सुवर्ण मंदिरात दिली सेवा ; व्हिडिओ व्हायरल

एका इंग्रजी संकेतस्थळाला दिलेल्या मुलाखतीत अनन्या पांडेने तिच्या लग्नाच्या योजनांबद्दल खुलासा केलाय. अनन्या म्हणाली, “माझं लग्नासाठी खूप कमी वय आहे, त्यामुळे सध्या माझा लग्नाबद्दल कोणताही प्लॅन नाही.” अनन्या आणि आदित्यचं लवकरच सुत जुळेल अशी सर्वत्र चर्चा असताना, मात्र, अनन्याच्या या खुलाश्यानंतर सर्व चर्चांना आता पूर्णविराम मिळाला आहे.

आदित्य- अनन्याच्या रिलेशनची चर्चा गेल्या अनेक दिवसांपासून चर्चा होत होती. हे अनेकदा काही पार्ट्यांना, स्पेशल स्क्रिनिंगला आणि बऱ्याचदा डिनरला देखील एकत्र स्पॉट झाले आहेत. या जोडीच्या नात्याची सर्वाधिक चर्चा सिद्धार्थ कियाराच्या रिसेप्शन पार्टीला आणि क्रिती सेनॉनच्या दिवाळी पार्टीतही झाली होती.

अंगद बेदी आणि नेहा धुपिया यांनी ठेवलेल्या स्टोरीनंतर आदित्य- अनन्याच्या डेटींगच्या बातम्यांना चांगलाच जोर धरला होता. दरम्यान, या दोघांनी अद्याप त्यांच्या नात्याबद्दल कोणतेही भाष्य केलेलं नाही.

Ananya Pandey And Aditya Rai Kapoor Wedding Plan
72 Hoorain Screening At JNU: जेएनयू कॅम्पसमध्ये होणार ‘72 Hoorain’चे स्पेशल स्क्रीनिंग, नवा वाद उफाळण्याची शक्यता

अनन्याच्या वर्क फ्रंटबद्दल बोलायचे तर, अनन्या सध्या दिल्लीत तिच्या आगामी चित्रपटाचे शूटिंग करत आहे. अनन्याचा लवकरच आयुष्मान खुरानासोबत ‘ड्रीमगर्ल २’ एकत्र दिसणार आहे. सोबतच अनन्या सिद्धांत चतुर्वेदीबरोबर ‘खो गए हम कहाँ’ या चित्रपटात देखील दिसणार आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com