Parineeti Chopra - Raghav Chadha Seva : परिणीती-राघवने सुवर्ण मंदिरात दिली सेवा ; व्हिडिओ व्हायरल

Parineeti Chopra and Raghav Chadha : परिणीती आणि राघवचा मंदिरात सेवा करतानाचा व्हिडिओ व्हायरल होत आहे.
Parineeti- Raghav At Golden Temple Photos
Parineeti- Raghav At Golden Temple PhotosInstagram
Published On

Parineeti Chopra - Raghav Chadha At Golden Temple : परिणीती चोप्रा आणि राघव चड्ढा लवकरच विवाहबंधनात अडकणार आहेत. काही दिवसांपूर्वी दोघांनीही गोल्डन टेम्पलला भेट दिली होती. सध्या दोघेही त्यांच्या लागणीच्या तयारीत व्यस्त आहेत. दरम्यान त्यांच्या एक व्हिडिओ सध्या व्हायरल होत आहे.

परिणीती चोप्रा आणि राघव चड्ढा सध्या त्यांच्या लग्नासाठी व्हेन्यु ठरवत आहेत. दरम्यान, जोडप्याने अमृतसरमधील सुवर्ण मंदिराला भेट दिली. त्यांच्या सुवर्ण मंदिराला दिलेल्या भेटीचे काही फोटो आणि व्हिडिओ सोशल मीडियावर पाहायला मिळत होते. नुकत्याच व्हायरल होत असलेल्या व्हिडिओमध्ये परिणीती आणि राघवचा मंदिरात सेवा करतानाचा व्हिडिओ व्हायरल होत आहे. (Latest Entertainment News)

Parineeti- Raghav At Golden Temple Photos
Ranveer Singh Share Video : रणवीर सिंगने रिव्हील केलं मोठं सिक्रेट ; दीपिका - राम चरणला पाहून धक्का बसेल

परिणीती चोप्रा आणि राघव चड्ढा यांनी श्री हरमंदिर येथे दर्शन घेतल्यानंतर तिथे सेवा देखील दिली आहे. व्हायरल होत असलेल्या व्हिडिओमध्ये दोघेही भांडी घासताना दिसत आहेत. डोक्यावर ओढणी घेतलेली परिणीती मनापासून सेवा देत आहे. तर तिच्या बाजूला राघव चड्ढा देखील मंदिरात सेवा करताना दिसत आहे.

परिणीती चोप्रा आणि राघव चड्ढा यांनी श्री हरमंदिर साहिब दर्शन घेतल्यानंतर इंस्टाग्रामवर दोघांचे फोटो शेअर केले आहेत. सुवर्ण मंदिराला लांबून नमस्कार करताना दोघे दिसत आहेत. तर या फोटोला कॅप्शन देत परिणितीने लिहिले आहे, “यावेळी माझी भेट आणखी खास होती; त्याच्या साथीने. वाहेगुरू का खालसा"

या जोडप्याने या वर्षी 13 मे रोजी दिल्लीतील कपूरथला हाऊसमध्ये एंगेजमेंट केले होते. दोघांच्या एंगेजमेंटचे फोटो आणि व्हिडिओने चाहत्यांची मने जिंकली होती. आता हे कपल लवकरच लग्नबंधनात अडकणार आहे.

राघव आणि परिणीती डेस्टिनेशन वेडिंग करू शकतात, असे बोलले जात आहे. मात्र, अद्याप या जोडप्याकडून लग्नाची तारीख जाहीर करण्यात आलेली नाही किंवा लग्नाच्या ठिकाणाबाबत काहीही सांगण्यात आलेले नाही. (Celebrity)

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com