Prabhas- Kriti: चित्रपटात दिसणारी 'ही' जोडी रियल लाईफमध्ये पण एकत्र दिसणार का ? वरुणने सांगितले स्पष्ट कारण

सर्वच कलाकारांच्या बाबातीत जाणून घ्यायला प्रत्येक चाहत्याला आवडत असते. त्यांच्या वैयक्तिक आयुष्यातील अनेक गोष्टी जाणून घेण्यास ते अधिक उत्सुक असतात.
Prabhas-Kriti Sanon Affair
Prabhas-Kriti Sanon Affair Saam Tv

Prabhas- Kriti: सर्वच कलाकारांच्या बाबातीत जाणून घ्यायला प्रत्येक चाहत्याला आवडत असते. त्यांच्या वैयक्तिक आयुष्यातील अनेक गोष्टी जाणून घेण्यास ते अधिक उत्सुक असतात. सोशल मीडियावर बरेच सिनेकलाकार हे सक्रिय असल्याचे आपल्याला पाहायला मिळते.

तसेच सध्या एक बॉलिवूड अभिनेत्री आपल्या काही अफेयर्समुळे चर्चेत आहे. ती दुसरी तिसरी कोणी नसून क्रिती सेनन आहे. तिच्या वैयक्तिक आयुष्याबाबत वरुण धवनने अलीकडेच सांगितले की, क्रितीच्या स्वप्नातील राजकुमार सध्या दीपिकासोबत आगामी चित्रपटाची शूटिंग करत आहे. यावरुन त्याचा अर्थ दाक्षिणात्य सुपरस्टार आणि बाहुबली फेम अभिनेता प्रभास असा होतो.

Prabhas-Kriti Sanon Affair
Kiara- Siddharth Wedding: कियारा- सिद्धार्थ लग्नबेढीत अडकणार, लवकरच तारीख करणार जाहीर

गेल्या अनेक दिवसांपासून क्रिती आणि प्रभासच्या नात्यांची चाहत्यांमध्ये चर्चा रंगत आहे. ओम राऊत दिग्दर्शित 'आदिपुरुष'मध्ये ही नवी जोडी प्रेक्षकांना दिसणार आहे. सध्या हा सवाल प्रत्येकालाच आहे की, चित्रपटात दिसणारी ही जोडी रियल लाईफमध्ये पण एकत्र दिसणार का ? ही जोडी खऱ्या आयुष्यात ही कपल आहेत की काय? त्यांच्या नात्याबद्दल भाष्य प्रभास किंवा क्रितीने दिले नसून वरुणने याचे उत्तर दिले आहे.

Prabhas-Kriti Sanon Affair
Bigg Boss Marathi 4: पहिल्याच दिवशी राखीने उडवली स्पर्धकांची झोप, विकास सोबतचा वाद विकोपाला

एका कार्यक्रमात वरुण धवन करण जोहरला प्रश्न विचारतो की, माधुरी दीक्षित शिवाय इतके सुंदर दिसण्याचा हक्क कुणाला आहे? यावर वरुणने करणला पर्याय दिले की- काजोल, राणी, आलिया, करीना आणि दीपिका. या प्रश्नावर करण उत्तर देत दीपिकाचे नाव उच्चारतो. पण नंतर करण विचारतो की, या दिलेल्या पर्यायांमध्ये क्रितीचे नाव का नाही? क्रितीही वरुणसमोर हाच प्रश्न उपस्थित करते.

Prabhas-Kriti Sanon Affair
Bigg Boss 16: टीना दत्ताला अश्रू अनावर; शिव ठाकरेला म्हणाली, "तुझ्यापेक्षा शत्रू बरे"

क्रितीच्या आणि करणच्या प्रश्नाला वरुणने दिलेले प्रत्युत्तर ऐकूण सर्वच आश्चर्यचकित होतात. वरुण म्हणतो, या यादीत क्रितीचे नाव नाही कारण ती कोणाच्या तरी प्रेमात पडली आहे. करणने त्याला ही नक्की व्यक्ती कोण? असा सवाल विचारला. त्यावर वरुण म्हणतो, एक व्यक्ती आहे, जो मुंबईत सध्या नाही. पण तो सध्या दीपिकासोबत शुटिंगमध्ये व्यग्र आहे. या उत्तराने क्रिती हसायला लागली असून करणला चांगलाच आश्चर्याचा धक्का बसला. गेल्या काही दिवसांपूर्वी क्रिती आपल्या एका वक्तव्याने चर्चेत आली होती.

Prabhas-Kriti Sanon Affair
Happy Birthday Yami: यामी गौतमी बनणार क्राईम रिपोर्टर, प्रकरण उलगडताना होईल का 'लॉस्ट'

क्रिती म्हणते, जर मला संधी मिळाली तर प्रभासशी लग्न नक्की करणार आहे. खरंतर सध्या ही जोडी एका आगामी चित्रपटामुळे बरीच चर्चेत आहे. तो चित्रपट मागे बराच चर्चेत होता. तो चित्रपट म्हणजे 'आदिपुरुष'. या चित्रपटात क्रिती सीतामातेच्या भूमिकेत तर प्रभास प्रभू श्रीरामांच्या भूमिकेत दिसणार आहे. त्यांच्या सोबत चित्रपटात सैफ अली खान रावणाच्या भूमिकेत दिसणार आहे. सोबतच इतर प्रमुख भूमिकेत सनी सिंह, देवदत्त नागे दिसणार आहेत.

Prabhas-Kriti Sanon Affair
Ved Marathi Movie: 'वेड' मधील पहिले रोमॅंटिक गाणे लीक, सोशल मीडिया सर्वत्र चर्चा

चित्रपटाचे दिग्दर्शक ओम राऊत यांनी चित्रपटातील अनेक महत्वाचे बदल करण्यासाठी चित्रपटाच्या प्रदर्शनाची तारीख पुढे ढकलली आहे. चित्रपटाला नेटकऱ्यांनी बरेच ट्रोल केले आहे. हा चित्रपट सुरुवातीला जानेवारी २०२३ मध्ये प्रदर्शित होणार होता, परंतू टीझरवरुन निर्माण झालेल्या वादानंतर हा सिनेमा जून २०२३ मध्ये दिग्दर्शक प्रदर्शित करण्याची शक्यता आहे.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com