Kiara- Siddharth Wedding: कियारा- सिद्धार्थ लग्नबेढीत अडकणार, लवकरच तारीख करणार जाहीर

बॉलिवूडमध्ये कियारा आणि सिद्धार्थ आपल्या चाहत्यांना लग्नाची गोड बातमी देणार असून त्यांच्या रिलेशनशिपची चर्चा बॉलिवूडसह सर्वत्र होताना दिसत आहे.
Kiara Advani and sidharth malhotra image
Kiara Advani and sidharth malhotra image Saam Tv

Kiara- Siddharth Wedding: सध्या बॉलिवूडमध्ये बरेच कलाकार मंडळी आपल्या चाहत्यांना गुड न्युज देत आहेत. अनेकांनी गुड न्युज दिल्या आहेत, तर काही कलाकार देणार आहेत. त्यातच आता बॉलिवूडमध्ये कियारा आणि सिद्धार्थ आपल्या चाहत्यांना लग्नाची गोड बातमी देणार आहे. या दोघांच्याही रिलेशनशिपची चर्चा बॉलिवूड सह सर्वत्र होताना दिसत आहे.

Kiara Advani and sidharth malhotra image
Bigg Boss Marathi 4: पहिल्याच दिवशी राखीने उडवली स्पर्धकांची झोप, विकास सोबतचा वाद विकोपाला

कियारा आणि सिद्धार्थ या दोघांनाही पार्टी, सार्वजनिक ठिकाणी अनेकदा एकत्र स्पॉट करण्यात आले होते. आता कियारा-सिद्धार्थ लवकरच लग्न बंधनात अडकणार असल्याच्या चर्चांना उधाण आले आहे. गेल्या बऱ्याच दिवसांपासून दोघेही आपल्या लग्नासाठी हटके ठिकाण शोधत होते. त्यांना अखेर ठिकाण मिळाले असून लवकरच ते लग्नाची तारीखही जाहीर करणार असल्याचे बोलले जात आहे.

काही दिवसांपासून दोघांच्याही चाहत्यांना त्यांच्या लग्नाची बरीच घाई होती. कियारा अडवाणी नेहमी सोशल मीडियावर सक्रिय असते. तिच्या पोस्टची नेहमीच चर्चा होत असते. नुकतीच कियाराने एक व्हिडिओ शेअर केला आहे. त्या व्हिडिओत त्यांच्या लग्नाची तारीख जाहीर करण्यात आली आहे. नेहमीच दोघांच्याही फोटोंची चर्चा सोशल मीडियावर होत असते.

कियाराने नुकताच तिच्या इन्स्टाग्राम अकाउंटवरून तिचा एक व्हिडिओ शेअर केला. या व्हिडिओच्या कॅप्शनमध्ये तिने लग्नाची तारखेचा २ डिसेंबर असा उल्लेख केल्यामुळे बरीच चर्चा होत आहे. जाहीर केल्याप्रमाणे २ डिसेंबरला कियारा त्यांच्या लग्नाची तारीख जाहीर करणार असल्याची चर्चा सोशल मीडियावर रंगली आहे.

कियाराने शेअर केलेल्या या व्हिडीओत ती खूप आनंदात असल्याचे दिसून येत आहे. व्हिडीओ पोस्ट करत कियाराने लिहिले की, “गुपित अजून ताणून धरू शकत नाही. २ डिसेंबरची वाट पहा.” कियाराचा हा व्हिडीओ चाहत्यांमध्ये सध्या चांगलाच चर्चेचा विषय ठरला आहे. या व्हिडीओच्या खाली कमेंट बॉक्स मध्ये चाहते कमेंट करून आताच शुभेच्छा देत आहेत.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com